पुरस्कार,गौरव
साखरे ट्रस्टचे पूरस्कार दोन जणांना प्रदान,कोपरगावात सोहळा संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील बाळासाहेब साखरे ट्रस्टचे पुरस्कार नुकतेच प्रदान करण्यात आले असून त्यात स्व.भास्करराव होन व कांतीलाल अग्रवाल आदींना पुरस्कार प्रदान करण्यात आले असल्याची माहिती ट्रस्टचे सचिव प्रदीप साखरे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सदर प्रसंगी स्व.भास्करराव दौलतराव होन यांना मरणोप्रांत पुरस्कार जाहीर झाला असून त्यांच्या वतीने प्रशांत होन व निलेश होन यांनी स्वीकारला आहे.तर दुसरा पुरस्कार हा कांतिशेठ अग्रवाल यांनी स्वीकारला आहे.पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह व मानपत्र असे होते.
कोपरगाव शहरातील बाळासाहेब साखरे ट्रस्ट हे सामाजिक ट्रस्ट म्हणून ओळखले जाते.त्यांच्या माध्यमातून समाजातील विविध लक्षवेधी कार्य करणाऱ्या घटकांना,’बाळासाहेब साखरे विशेष पुरस्कारा’ने गौरवले जाते.त्याच्या वतीने नुकताच हा पुरस्कार सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात संपन्न झाला आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे हे होते.
सदर प्रसंगी कोपरगाव पीपल्स बँकेचे अध्यक्ष कैलास ठोळे,माजी अध्यक्ष सत्येन मुंदडा,लायन्स क्लबचे अध्यक्ष परेश उडावंत,प्रीतम बंब,गिरीश सोनेकर,अमोल राजूरकर,किराणा मर्चन्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र बंब,अरविंद भन्साळी आदी मान्यवरांसह बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.
सदर प्रसंगी पुरस्कार जाहीर झालेले स्व.भास्करराव दौलतराव होन यांना मरणोप्रांत जाहीर झाला असून त्यांच्या वतीने प्रशांत होन व निलेश होन यांनी स्वीकारला आहे.तर दुसरा पुरस्कार हा कांतिशेठ अग्रवाल यांनी स्वीकारला आहे.पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह व मानपत्र असे होते.
सदर प्रसंगी प्रास्तविक ‘साखरे स्टील’चे संचालक प्रदीप साखरे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.शैलेंद्र बनसोडे यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी मानले आहे.