सण-उत्सव
…या पक्षाचे वतीने कोपरगावात शिवजयंती उत्सवाचे आयोजन-माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने रविवार दि.१९ रोजी शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शिवजयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष शैलेश साबळे यांनी दिली आहे.
१८६९ साली महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड येथील समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर सर्व प्रथम प्रदीर्घ पोवाडा लिहिला.रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीची व्यवस्था सरकारने स्वतःकडे घ्यावी असा अर्ज ज्योतिबांनी केला होता.१८७० साली महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली “शिवजयंती ” साजरी केली.त्यानंतर १८९५ मधे लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला होता तो तह्यात सुरु आहे.
शैलेश साबळे यांनी सांगितले की,तीन दिवसावर येवून ठेपलेल्या शिवजयंतीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.सर्वत्र शिवजयंती उत्सवाची तयारी सुरु असून आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरात शिवजयंती उत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे.यामध्ये रविवारी सकाळी ९ वाजता मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.हि रॅली जब्रेश्वर मंदिरापासून सुरु होवून गांधीनगर,मार्केट यार्ड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ येणार आहे.
सदर प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विधिवत पूजन करण्यात येणार आहे.या फेरीत महिला पुरुष व शिवप्रेमी युवक युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवजयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष साबळे यांनी शेवटी केले आहे.