पुरस्कार,गौरव
कोपरगाव पीपल्स बँक तर्फे…या माजी नगराध्यक्षांचा सत्कार

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील सहकारी बँकेत अग्रणी असलेल्या दि.कोपरगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी संचालक माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी त्यांच्या काळात केलेल्या शहर विकासासाठीच्या कामासाठी त्यांचा जेष्ठ संचालक कैलास ठोळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.
कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी आपल्या कार्यकाळात कोपरगाव शहराच्या येसगाव येथील ५ नंबर तळ्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन केले होते.या केलेल्या आंदोलनासाठी व ते करत असलेल्या सामाजीक कामासाठी त्यांना एका उद्योग समूहाच्या तर्फे ‘महाराष्ट्र आयोडॉल’ पुरस्कराने सन्मानीत केले आहे.त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी आपल्या कार्यकाळात कोपरगाव शहराच्या येसगाव येथील ५ नंबर तळ्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन केले होते.या केलेल्या आंदोलनासाठी व ते करत असलेल्या सामाजीक कामासाठी त्यांना एका उद्योग समूहाच्या तर्फे ‘महाराष्ट्र आयोडॉल’ पुरस्कराने सन्मानीत केले आहे.त्या बद्धल बँकेच्या नुकत्याच संपन्न झालेल्या ७४ व्या सर्वसाधारण सभे मध्ये जेष्ठ संचालक कैलास ठोळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी पीपल्स बँकेचे अध्यक्ष सत्यन मुंदडा सर्व संचालक,जनरल मॅनेजर श्री एकबोटे,रवींद्र छाजेड सर्व कर्मचारी वृंद,सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.