पुरस्कार,गौरव
कोपरगावात उप-अभियंता पवार यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
नगर जिल्हा परिषदेचे उपविभागीय अभियंता कोपरगाव पंचायत समिती अभियंता उत्तमराव पवार यांच्या सेवापूर्ती सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून त्या वेळी श्री साई संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी त्यांचा सत्कार केला आहे.
कोपरगाव उपविभागीय अभियंता उत्तमराव पवार यांनी संगमनेर,राहाता,श्रीरामपूर आदी ठिकाणी आपली सेवा चोखपणे बजावली होती.ते नुकतेच सेवानिवृत्त होत झाले आहे.त्यांच्या बाबत अनेकांनी आपले अनुभव विषद केले आहे.व त्यांना भावी आयुष्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
सदर प्रसंगी संगमनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे,कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिनज सूर्यवंशी,कोसाकाचे माजी उपाध्यक्ष कारभारी आगवन,कोपरगाव पंचायत समीतीचे माजी पंचायत समिती उपसभापती अर्जुन काळे,माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे,माजी पंचायत समिती सदस्य मधुकर टेके,श्रावण आसने,बाळासाहेब रहाणे,कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,राहुल रोहमारे,रोहिदास होन,दिलीप दाणे,सोपानराव गवळी,सुनील देवकर,नितीन औताडे,नारायण कार्ले आदींसह पंचायत समितीचे अधिकारी,कर्मचारी,तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच,सदस्य,ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.