जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पुरस्कार,गौरव

स्थापत्य अभियंता यांचा सत्कार संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  कोपरगाव विधानसभा मतदार संघातील चांदेकसारे येथील सर्वसामान्य कुटुंबातील कु.स्वाती नामदेव होन यांनी एम.पी.एस.सी.मधून घेण्यात आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परीक्षेत उत्तीर्ण होवून त्यांची सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट पदी निवड झाली आहे त्याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी कु.स्वाती होन सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत.

  

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे गावची रहिवासी असलेल्या कु. स्वाती होन हिचे माध्यमिक शिक्षण सुरेगाव-गौतमनगर येथील राधाबाई काळे माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात झाले.एस.एस.जी.एम.महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेवून पुढे इंजिनिअरिंग मधून सिव्हिल इंजिनिअर पदवी मिळविणाऱ्या स्वातीला शिक्षणाची आणि अभ्यासाची उपजतच आवड असल्यामुळे तिला अनेक खाजगी कंपनीत चालून आलेल्या नोकरीच्या संधी नाकारत स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासावर भर देवून त्यांनी आपले ध्येय साध्य केले आहे.

कु.स्वाती होन हिने मिळविलेल्या या दैदिप्यमान यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत असून आ.काळे यांनी देखील त्यांचा कोपरगाव तहसील कार्यालयात सत्कार केला आहे.

फोटो सार्वजनिक बांधकाम विभागात सिव्हिल इंजिनिअर असिस्टंटपदी निवड झाल्याबद्दल कु. स्वाती होन यांचा सत्कार करतांना आ. आशुतोष काळे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close