जाहिरात-9423439946
संपादकीय

काडीमोड झाल्यानंतरचा प्रपंच ?

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)


      
  आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे पहिल्यांदाच मुंबई बाहेर पडले असून.पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या कोकणातून त्यांनी आपल्या जनसंवाद दौऱ्याची सुरवात केली असून त्यांनी त्या पाठोपाठ रायगड जिल्ह्यातील सभा उरकून त्यांनी आता उत्तर अ.नगर जिल्ह्यात आपला दौरा निश्चित झाला असून बुधवार दि.१४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता कोपरगावात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर हि ‘जनसंवाद यात्रा’ संपन्न होणार असून त्याचा आढावा आज सकाळी सेनेचे संपर्क प्रमुख आ.सुनील शिंदे यांनी घेतला आहे व हा दौरा यशस्वी होणार असल्याचा विश्वास आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला असला तरी आगामी काळातील त्यांची धोरणे कशी ठरतात त्यावर सर्व काही अवलंबून आहे.

आगामी कोपरगाव दौऱ्यात सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात सेनेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे,संजय सातभाई,प्रवीण शिंदे,शहराध्यक्ष सनी वाघ,माजी शहराध्यक्ष कलविंदर दडियाल,एस.टी.सेनेचे अध्यक्ष भरत मोरे,जिल्हा उपाध्यक्ष कैलास जाधव,अध्यक्ष सर्व गटतट यात सामील झाल्याचे दिसून आले असल्याने हा सेनेसाठी शुभशकुन समजला जात आहे.एरव्ही हा पक्ष संघर्षशील आणि राकट असताना स्थानिक नेत्यांनी त्यांचे रूपांतर शेळीत केले असे अनेक निवडणुकांत दिसून आले आहे.

    देशाच्या लोकसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत.त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहे.त्याला शिवसेना हा महाआघाडीचा घटक पक्ष अपवाद नाही.त्यांनीहि आपले अस्त्रशस्र बाहेर काढले आहे.व भाजपला रोखण्यासाठी तयार झाले असून त्याची सुरुवात त्यांनी रायगड पासून केली असून त्यात त्यांनी आपल्या पारंपरिक कडवट हिंदूत्वाचा त्यागकरून शिवसेना ठाकरे गटाने राष्ट्रीयत्वाकडे वाटचाल सरू केल्याचे या निमित्ताने दिसून आले आहे.मुस्लिम समाजाला शिवसेनेच्या प्रवाहात जोडण्याचा प्रयत्न जनवसंवाद दौऱ्या दरम्यान करण्यात आला.यात बऱ्याच प्रमाणात ते यशस्वी होत आहे.आता ते उत्तर नगर जिल्ह्यात प्रवेश करत असून त्यांचं  या जिल्ह्यात कसे स्वागत होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.त्यासाठी त्यांनी आपले सरदार तथा संपर्क प्रमुख आ.सुनील शिंदे यांना चाचपणी करण्यासाठी व आगामी दौऱ्यासाठी तयारीला लागण्यासाठी आवश्यक तंग-तोबरा,नाल,मेख दारुगोळा यांचा आढावा घेण्यासाठी पाठवले असून त्यांना या दौऱ्यात चांगले संकेत मिळत आहेत.सर्व प्रथम माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे,संजय सातभाई,शहराध्यक्ष सनी वाघ,माजी शहराध्यक्ष कलविंदर दडियाल,एस.टी.सेनेचे अध्यक्ष भरत मोरे,जिल्हा उपाध्यक्ष कैलास जाधव,अध्यक्ष सर्व गटतट यात सामील झाल्याचे दिसून आले असल्याचे हा सेनेसाठी शुभशकुन समजला जात आहे.एरव्ही हा पक्ष संघर्षशील आणि राकट असताना स्थानिक नेत्यांनी त्यांचे रूपांतर शेळीत केले असे अनेक निवडणुकांत दिसून आले आहे.थोडे मधाचे बोट त्यासाठी पुरेसे हि सेनेची नवी ओळख त्यामुळे निर्माण झाली होती.त्याचे रूपांतरण सेनेची दहशत संपली असा संकेत प्रस्थापित काळे-कोल्हे,विखे-थोरात आदींना गेला होता व ते या सेनेस वाकुल्या दाखवू लागले होते.याला सर्वस्वी स्थानिक नेतेच जबाबदार आहे असा त्याचा अर्थ नव्हता.तर बहुतांशी वरिष्ठ नेते आपल्या तिजोऱ्या भरण्यासाठी संघटनेचा वापर करताना दिसत होते.उमेदवारी देताना,’निवडून येतच नाही तर मग कर हात साफ’अशी पद्धत सेनेच्या वरिष्ठ नेत्याना चांगलीच अंगलट आली होती.त्यातून मराठवाड्यात आणि विदर्भात आणखी विधानसभा जागा लढवता येतील हे त्यांचे लंगडे समर्थन.त्यामुळे सेनेच्या नगर जिल्ह्यातील नेत्यांना खुबी माहिती झाली होती.त्यामुळे उभ्या आयुष्यात टाचा घासूनही काहीच उपयोग होत नाही हे ओळखून सेनेचे सैनिक हतबल झाल्याचे दिसून आले होते.

दहा वर्षांपूर्वी त्यांनी भाजप छाप खा.सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी आपल्या पायावर धोंडा पडून घेतला होता तो नुकताच एकनाथ सेनेमुळे आपोआप दूर झाला आहे.या पहिलवानाने आगामी लोकसभा निवडणूक आल्यावरच दोन्ही वेळी मतदारांना तोंड दाखवले आहे.एरव्ही वर्तमानपत्रात त्यांची हरवल्याची जाहिरात नागरिकांना वाचावयास मिळत असे.यावेळीही लोकसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती एकनाथ सेनेकडून होत असली तरी दोन-तिन्ही चाचणीत ते सपशेल नापास झाले आहे.त्यामुळे त्यांच्यासाठी आगामी कळत प्रतिकूल आहे.

      दहा वर्षांपूर्वी त्यांनी भाजप छाप खा.सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी आपल्या पायावर धोंडा पडून घेतला होता तो नुकताच एकनाथ सेनेमुळे आपोआप दूर झाला आहे.या पहिलवानाने आगामी लोकसभा निवडणूक आल्यावरच दोन्ही वेळी मतदारांना तोंड दाखवले आहे.एरव्ही वर्तमानपत्रात त्यांची हरवल्याची जाहिरात नागरिकांना वाचावयास मिळत असे.यावेळीही लोकसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती एकनाथ सेनेकडून होत असली तरी दोन-तिन्ही चाचणीत ते सपशेल नापास झाले आहे.त्यामुळे त्यांच्यासाठी आगामी कळत प्रतिकूल आहे.त्यामुळे हि संधी उबाठा सेनेसाठी महत्वाची मानली आहे.होत असली तर माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे हे सेनेचे निष्ठावान नसले तरी त्यांची कामाची ओळख सेनेला विजयापर्यंत नेणार हे ओघाने आलेच त्यामुळे हि त्यांच्या दृष्टीने शिरजोर झालेल्या भाजपच्या उरावर हि संधी त्यांना इच्छा असताना डावलता येणार नाही हे उघड आहे.मात्र विधानसभा आणि जिल्हा परिषद,पंचायत समितीत काय हा प्रश्न आगामी काळात त्यांना सोडावा लागणार आहे.व निष्ठावानांना न्याय द्यावा लागणार आहे.

नगर जिह्यातील सेना सहकारात असलेल्या धेंडांना निमंत्रित करुन ते आपले उरलेसुरले वाटोळे करत आहे.आताच एकाने राजीनामा नाट्य सादर केले आहे.सहकारातील हे पहिलवान या शिवसैनिकांत रमत नाही हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे.तरी तो अंक पुन्हा- पुन्हा सादर होतो.त्यांचे संस्था मिळवून देणारे सहकारी ‘एकनाथ’वासी झाल्याने ते फार काळ तग धरणार नव्हतेच.आता त्यांच्या समर्थक तालुका अध्यक्षांचे काय होणार ? असा सवाल निर्माण झाला आहे.

    जिल्हा पातळीवर असलेल्या सेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी हि बाब वरिष्ठ नेत्यांच्या अनेक वेळा कानी घातली असतांना त्यांनी त्याकडे काना डोळा केलेला हे सर्वज्ञात आहे.त्यात त्यांनी आपल्या सैनिकांचे खच्चीकरण केले आहे.त्यामुळे आता उर्वरित काळात किती काळ दम धरायचा ? हा प्रश्न सेनेच्या पदाधिकारी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांचे डोके खात आहे.कधी कोल्हे गटाबरोबर तर कधी काळे गटाबरोबर यात सेनेची अपरिमित हानी झाली आहे.त्यात कोपरगाव स्थानिक भाजपची तीच गत आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.असंगाशी संग त्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. ‘ढेकणाच्या संगे हिरा भंगला’ अशी ती अवस्था सेनेची झाली आहे.कौतुकाचा सोहळा तोपर्यंत साजरा,केला जातो,जो पर्यंत तुमची गरज असते.एकदा का “गरज” संपली की, वेळात वेळ काढून “निंदेची खिरापत” घरोघरी वाटली जाते.याचा दाहक अनुभव आता त्यांच्या गाठी आला आहे.त्यातून त्यांनी शहाणपण घेतला तर बरे.म्हणूनच मनुष्य ओळखता आलाच पाहिजे.त्या पातळीवर शिवसेना सपशेल नापास झालेली आहे.अजूनही सहकारात असलेल्या धेंडांना निमंत्रित करुन ते आपले उरलेसुरले वाटोळे करत आहे.आताच एकाने राजीनामा नाट्य सादर केले आहे.सहकारातील हे पहिलवान या शिवसैनिकांत रमत नाही हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे.तरीही तो अंक पुन्हा पुन्हा सादर होतो.त्यांचे संस्था मिळवून देणारे सहकारी ‘एकनाथ’वासी झाल्याने ते फार काळ तग धरणार नव्हतेच.आता त्यांच्या समर्थक तालुका अध्यक्षांचे काय असा सवाल निर्माण झाला आहे.सेनेला विश्वास असला तरी त्यांनी केलेले उपकृतपणाचे ओझे ते कसे डोक्यावरून खांद्यावर आणणार हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.त्यातून आगामी काळात सेनेचे नेतृत्व काही बोध घेणार आहे का हा खरा सवाल आहे.

नशिबाच्या सगळ्याच सोंगट्या आपल्या मनाप्रमाणे पडतीलच असे नाही.पण जशा पडतील तशाही परीस्थितीत आयुष्याचा डाव जिंकण्याची जिद्द असलीच पाहिजे.त्यामुळे तो डाव सिद्ध करण्यासाठी हि उबाठा सेनेस उत्तम संधी आहे.शिर्डी लोकसभा मतदार संघात अद्यापही त्यांचे संघटन चांगले आहे त्याच्या जोडीला माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या सारखा कामाचा माणूस उमेदवार म्हणून मिळाला आहे.हि त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे.

   कोणत्याही राजकीय पक्षाला जीवनात संघर्ष करूनच यश मिळवावे लागत असते.तसेच आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला,तरी संघर्षाला कधीही दुर्दैव म्हणून पळ काढू नका.कारण संघर्ष हेच प्रगतीचे आमंत्रण असते.जो ते स्वीकारतो तोच जीवनात यशस्वी होत असतो.सेनेला संघर्ष नवा नाही.मात्र त्यांना भाजपने टेकओव्हर केले आहे.त्यामुळे त्यांना आता पुन्हा पूर्वीची स्थिती खरेच साध्य होईल हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे.भाजपशी काडीमोड घेतल्यावर सेनेने आता मुस्लिम मतदारांना चुचकारण्यास सुरुवात केली आहे.तो चांगला संकेत मानला पाहिजे मात्र त्यात काँग्रेस सारखी अवस्था न झाली मग मिळवली.कारण भाजपने हिंदू मतांवर चांगल्यापैकी कब्जा केला आहे.त्यामुळे त्यांना दलित आणि मुस्लिम मतांकडे लक्ष द्यावे लागणार आहे.त्या पातळवीर ते किती पास होणार हे आगामी काळ ठरवणार आहे.थैलीशहांशी संगत शेजेवर केवळ वेळ निभावण्यापूरतीच असते हे सेनेला किती समजले त्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.लोकसभा निवडणुकीची चांगली सुरुवात म्हणून या कडे पाहावयास हरकत नाही.त्यातच येत्या १४ फेब्रुवारी ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी हा कार्यक्रम यशस्वी झाला तर पुढील वाटचाल सोपी राहणार म्हणून हे उघड आहे.नशिबाच्या सगळ्याच सोंगट्या आपल्या मनाप्रमाणे पडतीलच असे नाही.पण जशा पडतील तशाही परीस्थितीत आयुष्याचा डाव जिंकण्याची जिद्द असलीच पाहिजे.त्यामुळे तो डाव सिद्ध करण्यासाठी हि उबाठा सेनेस उत्तम संधी आहे.शिर्डी लोकसभा मतदार संघात अद्यापही त्यांचे संघटन चांगले आहे हि त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे.तरीही काडीमोड झाल्यानंतर शिर्डी मतदार संघातील मतदार उबाठा सेनेकडे कसा पाहतो हे आगामी काळात समजणार आहे.त्यावरून आगामी विधानसभेचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होणार हे ओघाने आलेच.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close