पुरस्कार,गौरव
पत्रकार कुताळ यांना,…’हा’ पुरस्कार’ प्रदान
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
श्रीरामपूर येथील पत्रकार व वात्रटिकाकार नवनाथ कुताळ यांना दिल्ली सरकारच्या ओबीसी कमिशनच्या वतीने ‘कलम के सिपाही राष्ट्रीय एकता पुरस्कार’ अध्यक्ष जगदीश यादव यांचे हस्ते नुकताच मोठ्या उत्साहात प्रदान करण्यात आला आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
दरम्यान पत्रकार नवनाथ कुताळ यांना हा पुरस्कार मिळाल्या बद्दल शेतकरी अंघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे,जेष्ठ संपादक किसन हासे,नगर जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व मध्यरेल्वे सोलापूर विभागाचे सल्लागार समितीचे माजी सदस्य नानासाहेब जवरे,निळवंडे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले,कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,सोनीबापू उऱ्हे,सचिव कैलास गव्हाणे,पत्रकार संघाचे माजी तालुकाध्यक्ष शिवाजी गायकवाड,पत्रकार पंढरीनाथ पगार,योगेश डोखे,आदींनी अभिनंदन केले आहे.
यावेळी डॉ.भारत झा,अनुप चावला,दिल्लीचे सहायक जीएसटी आयुक्त डॉ.सारांश महाजन,दिल्लीचे सेवानिवृत्त मुख्य अग्निशमन अधिकारी डॉ.धर्मपाल भारद्वाज,इंदोर घराण्याचे शास्त्रीय संगीतकार पं.बलदेवराज,जसपीर करारा,संदीप शर्मा आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना यादव म्हणाले,”नागरिकांकडून आपण कररूपाने जेवढा घेतो तो सर्व पैसा जनतेच्या विकासासाठी वापरला गेला पाहिजे.आपण आपल्या देशात आपण रामराज्य आणण्याची स्वप्न बघत आहोत.पण प्रत्यक्षात देशात तशी सामाजिक परिस्थिती नाही.महाराष्ट्रात श्री शनी शिंगणापूर येथे असणाऱ्या घरांना दरवाजे नाहीत,त्यामुळे कडी कोयंडे नाही.तरीही चोऱ्या होत नाहीत.कारण तेथील लोकांची नियत साफ आहे.तशीच नियत देशातील सर्व लोकांची झाली पाहिजे.देशातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सामाजिक एकात्मतेला तडा जातो की काय अशी स्थिती निर्माण होत असून देशाची अखंडता आणि एकता अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वच राजकीय पक्षांची असून यामध्ये माध्यमांची आणि पत्रकारांची पत्रकारांची सामाजिक प्रबोधनाची भूमिका महत्वाची असल्याचे अध्यक्ष जगदीश यादव यांनी शेवटी सांगितले आहे.दरम्यान यावेळी अनेक मान्यवरांचाही गौरव करण्यात आला आहे.
दरम्यान पत्रकार नवनाथ कुताळ यांना हा पुरस्कार मिळाल्या बद्दल शेतकरी अंघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे,जेष्ठ संपादक किसन हासे,नगर जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नानासाहेब जवरे,निळवंडे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले,कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,सोनीबापू उऱ्हे,सचिव कैलास गव्हाणे,पत्रकार संघाचे माजी तालुकाध्यक्ष शिवाजी गायकवाड,पत्रकार पंढरीनाथ पगार,योगेश डोखे,आदींनी अभिनंदन केले आहे.