न्यायिक वृत्त
‘त्या’ आरोपीस अटक पूर्व जामीन मंजूर,कोपरगाव जिल्हा न्यायालयाचा निर्णय

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जानेवारी महिन्यात संपन्न झालेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित झेंडा वंदन प्रसंगी,”गुटखा खाऊन झेंडा वंदन करू नका” म्हणाल्याचा राग येऊन प्रहारचे माजी तालुकाध्यक्ष यांनी कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार येथील आरोपी उपसरपंच यांचेसह आठ जणांविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असता फिर्यादी संदीप क्षीरसागर याचे विरुद्ध तेथील शिक्षिका श्रीमती मेघा खंडांगळे यांनीं सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.यात आरोपी क्षीरसागर यांनीं कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने अर्ज दाखल केला होता.त्यानुसार त्यांना अटक पूर्ण जामीन मंजुर झाला असल्याची माहिती अड्.योगेश खालकर यांनी दिली आहे.
दरम्यान या सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी अड्.योगेश खालकर यांनी सामाजिक बांधिलकी पत्करून संदीप क्षीरसागर यांचा हा खटला चालवला आहे.त्यांचे या प्रकरणी कोपरगाव तालुक्यात कौतुक होत आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,देशभरात २६ जानेवारी हा दिवस,’संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो.कोपरगाव तालुक्यातही तो मोठ्या उत्साहात संपन्न झाला असताना सांगवी भुसार ग्रामपंचायतीचा अपवाद झाला होता.त्या ठिकाणी दोन गटात वाद निर्माण झाला होता.फिर्यादी प्रहार संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष संदीप क्षीरसागर यांनी आरोपी तान्हाजी जाधव यांचेसह नेमक्या २६ जानेवारी रोजी सकाळी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण प्रसंगी सकाळी ९.१० वाजेच्या सुमारास आरोपी उपसरपंच तान्हाजी जाधव,विजय जाधव,विलास कासार जाधव,किशोर बबन जाधव,हरिभाऊ शिंदे,साहेबराव जाधव,भाऊसाहेब संपत जाधव,सुनील प्रभात बंदे यांचेसह आदींना गुटखा खाऊन झेंडा वंदन करण्यास हरकत घेतली होती.त्यावरून अपमान झाल्याने फिर्यादी क्षीरसागर यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.त्यामुळे विरोधी गट दुखावला गेला होता.
दरम्यान त्यानंतर तेथिल शिक्षिका श्रीमती मेघा खंडांगळे या महिला शिक्षिकेने संदीप क्षिसागर यांचे विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणला म्हणून भा.द.वि.कलम ३५३,५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल केला होता.त्या विरोधात फिर्यादी यांनी कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालय यांचे कडे ५९/२०२३ नुसार अटक पूर्व जामीन मिळावा म्हणून अर्ज दाखल केला होता.
त्यात फिर्यादीच्या वतीने अड्.खालकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की,”फिर्यादी यांनी या पूर्वी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज देऊन वेळोवेळी माहिती मागितली होती.त्या द्वेषातून हा गुन्हा दाखल केला आहे.जिल्हा व सत्र न्यायालयाने हा युक्तिवाद गृहीत घरून हा जामीन आरोपीस मंजूर केला आहे.सदर आदेशाने खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या अपप्रवृत्तीस चाप बसण्यास मदत होणार आहे.
दरम्यान या प्रकरणी अड्.योगेश खालकर यांनी सामाजिक बांधिलकी पत्करून हा खटला चालवला आहे.त्यांचे या प्रकरणी कोपरगाव तालुक्यात कौतुक होत आहे.