जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
क्रीडा विभाग

कोपरगाव तालुक्यात व्हॉलीबॉल स्पर्धा होणार संपन्न

जाहिरात-9423439946

   

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलच्या भव्य मैदानावर संस्थेचे मागर्दर्शक व विश्वस्त आ.आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.

    

नगर नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या संस्थेचे दर्शन घडविण्यासाठी गौतम पब्लिक स्कूलमध्ये आ.आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित दि.३ व ४ ऑगस्ट रोजी क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

क्रीडा क्षेत्रात दबदबा ठेवणाऱ्या गौतम पब्लिक स्कूलने जिल्ह्यात नव्हे तर राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.नगर नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या संस्थेचे दर्शन घडविण्यासाठी गौतम पब्लिक स्कूलमध्ये आ.आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित दि.३ व ४ ऑगस्ट रोजी क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या क्रीडा महोत्सवाचे उदघाटन संस्थेच्या सचिव चैताली काळे यांच्या हस्ते व विश्वात्मक जंगली महाराज ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत (दि.०३) ऑगस्ट रोजी होणार असून बक्षीस वितरण सोहळा आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते होणार आहे. सदर क्रीडा महोत्सवात फुटबॉल,हॉकी व मुलींचे हॉलीबॉलच्या सामन्यांचा थरार क्रीडा प्रेमीना  अनुभववास मिळणार आहे. या क्रीडा महोत्सवात अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील अनेक मैदाने गाजविणारे मातब्बर संघ सहभागी होणार असून यासाठी गौतम पब्लिक स्कूलचे फुटबॉल,हॉकी व हॉलीबॉल सर्व सुविधा असलेले भव्य-दिव्य मैदाने सज्ज करण्यात आली आहेत.

 क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी शाळेचे प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा संचालक सुधाकर निलक,हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे,फुटबॉल प्रशिक्षक राजेंद्र आढाव,हॉलीबॉल प्रशिक्षक इसाक सय्यद,सर्व हाऊस मास्टर्स व शिक्षक आपली जबाबदारी पार पाडत आहेत.सहभागी खेळाडू व प्रशिक्षकांची जेवणाची सोय शाळेकडून करण्यात आलेली आहे.जिल्ह्यातील जास्तीत जास्त संघांनी क्रीडा महोत्सवात सहभाग नोंदवावा असे आवाहन तालुक्यातील क्रीडा मार्गदर्शक व क्रीडा शिक्षक यांना केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close