जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

१३ ऑगस्टला…या न्यायालयामध्ये लोक अदालतचे आयोजन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

सर्वच न्यायालयात दाखल होणाऱ्या प्रकरणांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे न्यायदानास विलंब होत आहे.अशा परिस्थितीत,लोक न्यायालयामध्ये वादपूर्व,प्रलंबित खटले निकाली काढणे हा सर्वोत्तम पर्याय आहे त्यासाठी आगामी १३ ऑगष्ट रोजी कोपरगावसह जिल्ह्यातील सर्व जिल्हा व तालुका न्यायालयात लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी दिली आहे.

विविध वाद आणि वादपूर्व प्रकरणं सामंजस्याने तसंच सुसंवादाने आणि तडजोडीने निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचं आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वकील संघाच्या वतीने करण्यात येते.त्यामुळे नागरिकांचा वेळ,पैसा,श्रम या तिन्ही बाबींची बचत होत असते.न्यायालयीन खटला लढवण्यासाठी लागणारा पैसा व श्रम या दोघांचाही वापर विधायक कार्यासाठी करण्याची संधी पक्षकारांना मिळत असते म्हणून या अदालतीला विशेष महत्व आहे.

विविध वाद आणि वादपूर्व प्रकरणं सामंजस्याने तसंच सुसंवादाने आणि तडजोडीने निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचं आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वकील संघाच्या वतीने करण्यात येते.त्यामुळे नागरिकांचा वेळ,पैसा,श्रम या तिन्ही बाबींची बचत होत असते.न्यायालयीन खटला लढवण्यासाठी लागणारा पैसा व श्रम या दोघांचाही वापर विधायक कार्यासाठी करण्याची संधी पक्षकारांना मिळते.म्हणूनच जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली व अहमदनगर जिल्हा न्यायालयातील दोन्ही वकील संघाच्या सहकार्याने आणि अ.नगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने मागील तीन लोक अदालतमध्ये राज्यात दुसरा क्रमांक पटकावलेला आहे.त्यामुळे,अ.नगर या ठिकाणी झालेल्या लोक अदालतीपैकी मागीलतीन लोक अदालत या लक्षवेधी ठरलेल्या आहेत.या नगर जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश,विधीज्ञ,पक्षकार व कर्मचाऱ्यांचे ह्या यशामध्ये मोठे योगदान आहे.त्यांच्याच मार्गदर्शनाखाली दि.१३ ऑगस्ट रोजी जिल्हा न्यायालय अ,नगर व सर्व तालुका न्यायालयामध्ये लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या लोक अदालतीमध्ये तडजोड योग्य प्रकरणे,अर्थात चोरीची प्रकरणे,किरकोळ मारहाणीची प्रकरणे,बँकेची व वित्तीयसंस्थेशी संलग्न प्रकरणे,धनादेशाचीम्हणजे चेकची प्रकरणे,यांचा समावेश होतो.महानगरपालिका,नगरपंचायत ग्रामपंचायत यांच्याकडील मालमत्ता कर,पाणीपट्टी,घरपट्टी आणि महावितरण यांचे कडील प्रलंबित विज देयके,अशा स्वरूपाची प्रकरणे,लोक अदालतमध्ये तडजोडीने निकाली काढण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

बँकेकडील व पतसंस्थेकडील प्रकरणांमध्ये व्याजदरात सूट अथवा व्याजदरात माफी मिळून काही प्रमाणात फायदा होतो. पर्यायाने प्रलंबित व वाद पूर्व खटल्यांची संख्याकमी होऊन न्यायव्यवस्थेवरील ताण कमी होतो.त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून दि.१३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या लोक अदालत मध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवून फायदा घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष व जिल्हा व सत्र न्यायाधीश यार्लगड्डा व जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या नवनियुक्त सचिव भाग्यश्री पाटील यांनी केलेले आहे.चौकशीसाठी जिल्हा विधी सेवाप्राधिकरण या ठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close