न्यायिक वृत्त
कोपरगाव बाजार समितीवर पुन्हा सभापतींची नियुक्ती,उच्च न्यायालयाचा निर्णय
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची कामधेनू म्हणून ओळख असलेल्या कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खण्डपीठाच्या एका याचिकेद्वारे आज पुन्हा प्रशासक तथा सहाय्यक निबंधक एन.जी.ठोंबळ यांना आपला पदभार सोडावा लागला असून त्या जागेवर पुन्हा सभापती संभाजीराव रक्ताटे यांची नियुक्ती झाली असून आता कोरोना काळात निर्णय घेण्यास पुन्हा एकदा गती मिळेल असा आशावाद तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
देशात गत वर्षी मार्च महिन्यात कोरोनाच्या साथीने कहर केला होता त्यामुळे राज्यातील सहकारी संस्थासंह राज्यातील सहकारी साखर कारखाने,बाजार समित्यांच्या निवडणुका सहा महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आल्या होता.त्यांना पुन्हा एकदा कोरोनाच्या अनिश्चित संकटामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या.व या आगामी काळासाठी त्या जागेचा कार्यभार तथा प्रशासक म्हणून कोपरगाव तालुक्याचे सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक यांची नियुक्ती सरकारने दि.७ डिसेंबर २०२० रोजी केली होती.
सदरचे सविस्तर वृत असे की,कोपरगाव बाजार समितीच्या संचालक मंडळाचा पाच वर्षाचा कालावधी ऑक्टोबर २०२० मध्ये संपला होता.मात्र राज्यात व देशात गत वर्षी मार्च महिन्यात कोरोनाच्या साथीने कहर केला होता त्यामुळे राज्यातील सहकारी संस्थासंह राज्यातील सहकारी साखर कारखाने,बाजार समित्यांच्या निवडणुका सहा महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आल्या होता.त्यांना पुन्हा एकदा कोरोनाच्या अनिश्चित संकटामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या.व या आगामी काळासाठी त्या जागेचा कार्यभार तथा प्रशासक म्हणून कोपरगाव तालुक्याचे सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक यांची नियुक्ती सरकारने दि.७ डिसेंबर २०२० रोजी केली होती.त्या विरोधात मुदत संपलेले सभापती संभाजी रक्ताटे,उपसभापती राजेंद्र निकोले आदींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या अ औरंगाबाद खण्डपीठात याचिका दाखल केली होती.त्याची सुनावणी नुकतीच पार पडली असून त्या बाबत न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले होते.व त्या नंतर दि.०९ एप्रिल रोजी बाजार समितीस आपला निकाल पाठवला असून त्यात त्यांनी विद्यमान प्रशासक एन.जी.ठोंबळ यांना आपला पदभार सोडण्यास सांगण्यात आले आहे.त्या प्रमाणे सभापती पदी पुन्हा एकदा बोनस मिळत सभापती संभाजीराव रक्ताटे,तर उपसभापती राजेंद्र निकोले यांना पदाची संधी मिळाली आहे.त्यांच्या निवडीचे तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वागत केले असून त्यांनी या पदाचा कोविड काळात शेतकऱ्यांच्या हितासाठी उपयोग करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.