निवड
…यांची कोपरगाव तालुका संघटकपदी निवड
न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
श्री संत सावता माळी युवक संघाच्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका संघटकपदी अमोल माळवदे यांची नुकतीच झालेल्या बैठकीत संघाचे अध्यक्ष सचिन गुलदगड,जिल्हाध्यक्ष मुकुंद काळे यांच्या उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर प्रसंगी यावेळी कोपरगाव तालुकाध्यक्ष अशोक माळवदे,सचिव योगेश ससाणे,धोत्रे पोलीस पाटील देवेश माळवदे,रामदास माळवदे,मनोज माळवदे,पवन माळवदे,रोशन माळवदे,नवनाथ माळवदे आदि मान्यवर उपस्थित होते.
कोपरगाव संजीवनी पतसंसंस्थेचे अध्यक्ष प्रदीप नवले,संतोष रांधव,डाॅ.मनोज भुजबळ,संदीप डोखे,अनंत वाकचौरे, शेखर बोरावके,मनोज चोपडे,ओकांर वढणे,दीपक हीवाळे आदीनी अभिनंदन केले आहे.