जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

पत्रकारांची नव्याने व्याख्या ठरवण्याची वेळ !

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूर येथील अर्जुन भाऊसाहेब गुरुळे यांना तोतया पत्रकाराकडून त्रास दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.स्वतःला पत्रकार असल्याचे भासवून बातमी न लावण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली असून पैसे न दिल्यामुळे शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची तक्रार कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दि.०२ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आली आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पत्रकार जनजागृती करतात,सामाजिक न्याय आणि राजकीय जबाबदारी जपतात, समाजाला जागरूक करतात,तसेच आर्थिक व सांस्कृतिक प्रभाव वाढवतात.ते समाजातील सत्य समोर आणण्याचे महत्त्वाचे कार्य करतात आणि लोकांना योग्य निर्णय घेण्यासाठी आवश्यक माहिती पुरवतात.मात्र आज सोशल मीडियाच्या वेगवान जगात पत्रकारांची व्याख्या बदलत चालली आहे.एक मोबाईल,एक डायरी आणि एक पेन एवढे हाती असले आणि एक दोन आयत्या प्रेसनोट टपालमनसारख्या पाठवल्या की पत्रकार म्हणून घ्यायला माणूस मोकळा होतो.परिणामी या व्यवसायाचे पावित्र्य धोक्यात आले आहे.

  पत्रकारांचे समाजातील महत्त्व अनमोल आहे, कारण ते लोकांना माहिती,शिक्षण आणि त्यांचे मनोरंजन करतात,जे लोकशाहीचा आधारस्तंभ आहेत.पत्रकार जनजागृती करतात,सामाजिक न्याय आणि राजकीय जबाबदारी जपतात, समाजाला जागरूक करतात,तसेच आर्थिक व सांस्कृतिक प्रभाव वाढवतात.ते समाजातील सत्य समोर आणण्याचे महत्त्वाचे कार्य करतात आणि लोकांना योग्य निर्णय घेण्यासाठी आवश्यक माहिती पुरवतात.मात्र आज सोशल मीडियाच्या वेगवान जगात पत्रकारांची व्याख्या बदलत चालली आहे.एक मोबाईल,एक डायरी आणि एक पेन एवढे हाती असले आणि एक दोन आयत्या प्रेसनोट टपालमनसारख्या पाठवल्या की पत्रकार म्हणून घ्यायला माणूस मोकळा होतो.परिणामी या व्यवसायाचे पावित्र्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नेमस्त पत्रकारांची कोंडी होऊन श्वास गुदमरण्याचा अनास्था प्रसंग ओढवू लागला आहे.राजकीय नेत्यांना अशा भरताड पत्रकारांची आवश्यकता वाटू लागली असून आपले पोवाडे आणि आरत्या जनतेत पसरविण्यास ही मंडळी पूरक ठरत असल्याने त्यांचे दहा ही बोटे तुपात असल्याचे दिसत आहे. मात्र अपप्रवृत्तीचा त्रास मात्र सामान्य माणसास होऊ शकतो.याचे अनेक उदाहरणे कोपरगाव तालुक्यातील अनेक घटनांतून वारंवार समोर येत आहेत.काही घटनांमध्ये तर अशा घटकांना अवैध व्यावसायिकांकडून मार खाण्याचे अनास्था प्रसंगही ओढवले आहेत.अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे.कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीत ही बाब उघड झाली आहे.

  सदर फिर्यादी अर्जुन गुरुळे हे कुंभारी येथील राघवेश्वर देवस्थानात दर्शनासाठी जात असताना कुंभारी पुलाजवळ आरोपी नाम नवनाथ पांडुरंग वाघ याने त्यांना अडवले होते.
यावेळी वाघ यांने स्वतःला पत्रकार असल्याचे सांगत,बातमी लावायची नसेल तर ५० हजार रुपये द्यावे लागतील,अशी मागणी केली. फिर्यादी गुरुळे यांनी तुम्ही कोणत्या चॅनलचे पत्रकार आहात ? असा सवाल केल्यावर वाघ संतापून शिवीगाळ करू लागला व जीवे मारण्याची धमकी दिली.या प्रकाराने त्रस्त झालेल्या अर्जुन गुरुळे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत वाघ यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे.


या तक्रारीवरून पोलिसांनी पैशांची मागणी,
शिवीगाळ व दमबाजी संबंधी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.कोपरगाव तालुका परिसरात बोगस पत्रकारांचा सुळसुळाट झाल्याची माहिती मिळते आहे. अवैध व्यवसाय करणाऱ्यांकडून व्हिडिओ काढून पैसे उकळणे,खोट्या ओळखपत्रांचा वापर करून अधिकाऱ्यांना धमकावणे असे प्रकार सर्रास सुरू असल्याची तक्रार वारंवार समोर येत आहे.


  दरम्यान याबाबत खरे तर पत्रकारांची व्याख्या नव्याने करण्याची वेळ आली आहे. सदर घटनेचा अदखलपात्र गुन्ह्याचा तपास पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close