निवड
प्रहारच्या…त्या ठिकाणच्या नूतन शहराध्यक्षांची निवड..
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
‘प्रहार जनशक्ती’ पक्षाचे देवळाली प्रवरा नूतन शहराध्यक्षपदी किरण भगवान पंडित यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असल्याची माहिती श्रीरामपूर येथील विधानसभा अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
नाशिक पदवीधर निवडणुकीत प्रहार संघटनेने कोणतीही भूमिका जाहीर केलेली नव्हती.त्या पक्षाचे नेते व अध्यक्ष बच्चू कडू यांनी तसे कोणतेही आदेश दिलेले नसताना देवळाली प्रवरा येथील शहराध्यक्ष विजय कुमावत यांनी थेट शिवसेनेच्या उमेदवाराच्या मांडीवर बसण्याचा प्रयोग केला होता तो प्रहार संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता.त्यामुळे त्यांनी तातडीने कारवाई करत सदर शहराध्यक्ष कुमावत यांस श्रीरामपूर विधानसभा अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांना आदेश देऊन तातडीने निलंबित केले होते त्यांच्या जागी किरण पंडित यांची निवड झाली आहे.
विधान परिषदेच्या पाच जागांसाठी काल निवडणूक मोठ्या उत्साहात संपन्न झाली असून,नाशिक पदवीधर मतदारसंघात नेमके काय घडलंय ? आणि त्यामुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील राजकारण मोठ्या प्रमाणात ढवळून निघालं होतं हे सगळ्यांनीच पाहिलं आहे.मात्र,या सगळ्यात सर्वांच्या नजरा होत्या,त्या भाजपकडे.अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या सत्यजित तांबेंनी ना भाजपला पाठिंबा मागितलाय ना भाजपने सत्यजित तांबेंना जाहीरपणे पाठिंबा दिला होता.मात्र,नेत्यांच्या विधानांतून भाजप नेमकं कुणाच्या बाजूने असणार आहेत,याचे संकेत मिळाले होते.त्यानंतर भाजपने थेट महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांना अधिकार देऊन सदर घटनेची जबाबदारी त्यांच्या माथी मारली होती.
दरम्यान या निवडणुकीत प्रहार संघटनेने कोणतीही भूमिका जाहीर केलेली नव्हती.त्या पक्षाचे नेते व अध्यक्ष बच्चू कडू यांनी तसे कोणतेही आदेश दिलेले नसताना देवळाली प्रवरा येथील शहराध्यक्ष विजय कुमावत यांनी थेट शिवसेनेच्या उमेदवाराच्या मांडीवर बसण्याचा प्रयोग केला होता तो प्रहार संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता.त्यामुळे त्यांनी तातडीने कारवाई करत सदर शहराध्यक्ष कुमावत यांस श्रीरामपूर विधानसभा अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांना आदेश देऊन तातडीने निलंबित केले होते.व सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास देवळाली प्रवरा येथे बैठक घेऊन नूतन अध्यक्ष निवड करण्याचा घाट घातला होता.त्यानुसार हि बैठक काल सायंकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाली असून नूतन अध्यक्ष पदी किरण भगवान पंडित यांची निवड केली आहे.
सदर बैठकीस प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढूस,प्रहार श्रमिक सेवा संघाचे सचिव बाळासाहेब कराळे,प्रहारचे राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष शरद वाळुंज,उपाध्यक्ष एकनाथ वाणी,गणेश भालके,प्रहार दिव्यांग सेलचे देवळाली प्रवरा शहराध्यक्ष सलीम शेख,प्रहार श्रमिक सेवा संघाचे देवळाली प्रवराचे शहराध्यक्ष नवनाथ चव्हाण,प्रहारचे देवळाली प्रवरा संघटक सुनील कदम,फिरोज शेख,किरण पंडित,विजय कल्हापुरे, अमोल साळवे,संतोष ढेपे आदी पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
दरम्यान किरण पंडित यांना श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अप्पासाहेब ढूस यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सदर प्रसंगी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी किरण पंडित यांचे अभिनंदन केले तर प्रहार श्रमिक सेवा संघाचे सचिव बाळासाहेब कराळे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले आहे.