निवड
वारकरी साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी…यांची निवड

न्यूजसेवा
संवत्सर- (वार्ताहर)
महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेच्या कोपरगांव तालुकाध्यक्षपदी संवत्सर (लक्ष्मणवाडी) येथील भिकनराव उर्फ भाऊसाहेब नामदेवराव कर्पे यांची निवड करण्यात आली असल्याचे अधिकृत पत्र वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल पाटील,नगर जिल्हाध्यक्ष ह.भ.प.आण्णासाहेब महाराज शिंदे यांनी नुकतेच दिले आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

“भाऊसाहेब कर्पे पाटील यांची कोपरगांव तालुक्याच्या वारकरी साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी झालेली निवड भुषणावह गोष्ट आहे.संवत्सर परिसर मुळातच धार्मिक,आध्यात्मिकदृष्ट्या प्रगत असून आध्यात्मिक संस्कृतीमध्ये अधिकाधिक वाढ होण्यासाठी श्री कर्पे हे आपले योगदान देतील यात शंका नाही.वारकरी साहित्य परिषदेच्या कार्यासाठी त्यांना संवत्सर गावाच्यावतीने योग्य ते सहकार्य केले जाईल”राजेश पर जाणे”-अध्यक्ष,गोदावरी नामदेवराव परजणे तालुका सहकारी दूध संघ,कोपरगाव.
या निवडीबद्दल भाऊसाहेब कर्पे यांचा संवत्सर येथील लक्ष्मणवाडी परिसरातील श्री हनुमान मंदिराच्या सभागृहामध्ये भजनी मंडळ व परिसराच्यावतीने शॉल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी संजय भाकरे,रमेश गायकवाड,लहानू गुंड,जगनाथ पेकळे,भाऊसाहेब पवार,काशिनाथ बाभळे यांच्यासह लक्ष्मणवाडी परिसरातील अनेक रहिवासी व भजनी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

कर्पे यांच्या निवडीचे गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पा.तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,कोपरगांव पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे,संवत्सरचे उपसरपंच विवेक परजणे,माजी केंद्रप्रमुख दिलीप ढेपले,शिवाजी गायकवाड,लक्ष्मणराव साबळे,सोमनाथ निरगुडे,शैलेश जोशी,दिलीप परजणे,दिलीप तिरमखे,हबीब तांबोळी आदिनी यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.श्री कर्पे यांचा गौरव म्हणून कोपरगांव तालुक्याच्या वारकरी साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल कोपरगांव तालुक्यातील वारकरी बांधव तसेच भजनी मंडळांनी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले आहे.



