निवड
…या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवड संपन्न

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या चांदेकसारे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया नुकतीच संपन्न होवून आ.आशुतोष काळे गटाचे वसीम सय्यदनूर शेख यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सदर प्रसंगी उपसरपंच पदासाठी वसीम सय्यदनूर शेख यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत असेलल्या ग्रामसेवक संजय दुशिंग यांनी वसीम शेख यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली असल्याचे जाहीर केले आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
चांदेकसारे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सचिन होन यांनी ठरलेल्या आवर्तनानुसार आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे सदर पद रिक्त झाले होते.परिणामी सरपंच किरण होन यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली आहे.
यावेळी उपसरपंच पदासाठी वसीम सय्यदनूर शेख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.त्यावेळी उपसरपंच पदासाठी वसीम सय्यदनूर शेख यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत असेलल्या ग्रामसेवक संजय दुशिंग यांनी वसीम शेख यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली असल्याचे जाहीर केले आहे.
यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच वसीम सय्यदनूर शेख म्हणाले की,”चांदेकसारे गावच्या सर्वांगीण विकासासाठी आ.काळे यांनी विश्वासाने दिलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडू. सरपंच व सर्व सदस्यांना सोबत घेऊन विकासाचे जास्तीत जास्त प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.नवनिर्वाचित उपसरपंच वसीम सय्यदनूर शेख यांचे माजी आ.अशोक काळे,आ.आशुतोष काळे आदींनी अभिनंदन केले आहे.
याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण,आनंदराव चव्हाण,गौतम बँकेचे संचालक शरद होन,सरपंच किरण होन,मावळते उपसरपंच सचिन होन ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ सोळसे,अशोक होन,गंगुबाई होन,नंदाबाई होन,सुनिता खरात,जरीना शेख,रेखा गायकवाड,सुवर्णा होन,सुनिल माळी,कुंदाबाई खंडिझोड,तसेच माजी सरपंच मतीन शेख,विलास चव्हाण,रवींद्र खरात,जयद्रथ होन,अभिजीत झगडे,राजेंद्र होन,गणेश खरात,युनूस शेख,दगुभाई शेख,सुनील होन, आदी उपस्थित होते.