जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

….या संशोधकास अमेरिकेत पेटंट प्राप्त !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   मूळ सावळीविहिर येथील रहिवासी मात्र वर्तमानात कोपरगाव येथे अधिवास असलेले जलसंपदाचे माजी उपविभागीय अभियंता भास्कर सुरळे यांचे चिरंजीव डॉ.हेमंत भास्कर सुरळे हे आंतरराष्ट्रीय मेटा कंपनीत (फेसबुक) संशोधक म्हणून कार्यरत असून त्यांनी कॉम्प्युटर सायन्स मधील भविष्यातील संवर्धित वास्तविकता,आभासी वास्तविकता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयांवर सहका-यांबरोबर वेगवेगळे संशोधन प्रकल्प पार पाडले असून याअंतर्गत त्यांनी आपल्या नावावर अमेरिकेत एक नवीन पेटंट नोंदवले असून त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

  

डॉ.हेमंत सुरळे यांनी कॉम्प्युटर सायन्स मधील भविष्यातील Augmented Reality ( संवर्धित वास्तविकता ( Augmented Reality) व आभासी वास्तविकता (Virtual Reality) आणि कृत्रिम बुद्धिमत्ता(Artifitial Inteligence) या विषयांवर सहका-यांबरोबर  वेगवेगळे संशोधन केले होते.त्यामुळे त्यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”डॉ.हेमंत भास्कर सुरळे यांचे प्राथमिक शिक्षण एस.जी.विद्यालय झाले असून त्यांनी पुढील माध्यमिक शिक्षण येवल्यातील स्वामी मुक्तानंद विद्यालयात केले होते.सन-२०१० साली त्यांनी संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातून आय.टी.इंजिनीरिंग पदवी मिळवून नंतर बिर्ला इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी पिलानी,गोवा येथे कॉम्प्युटर सायन्स मध्ये प्रथम क्रमांक मिळवला होता.तद नंतर बंगलोर येथे एक वर्ष नोकरी केली.मात्र शिक्षणाची ओढ असल्याने कॅनडा येथील वॉटरलू विद्यापीठातून त्यांनी विशेष प्राविण्यासह कॉम्प्युटर सायन्स मध्ये डॉक्टरेट मिळवली होती.

 

  दरम्यान पी.एच.डी.करीत असताना त्यांचे तीन शोध निबंध आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिध्द झाले होते.परिणामी त्यांना अमेरिकेतील प्रसिद्ध कंपनी स्नॅप फाउंडेशन यांची फेलोशिप सन-२०१९ मध्ये प्राप्त झाली होती.तेथे त्यांनी कॉम्प्युटर सायन्स मधील भविष्यातील Augmented Reality ( संवर्धित वास्तविकता ( Augmented Reality) व आभासी वास्तविकता (Virtual Reality) आणि कृत्रिम बुद्धिमत्ता(Artifitial Inteligence) या विषयांवर सहका-यांबरोबर  वेगवेगळे संशोधन केले होते.

   त्याअंतर्गत त्यांनी एक नवीन स्वामित्व प्रणाली (पेटंट) विकसित केली आहे.ज्यामुळे स्मार्टचष्मे (Smartglass) वापरून विविध वापरकर्त्यांमध्ये आभासी संवादाचे (Virtual communication) सत्र आयोजित केले जाऊ शकणार आहे.या प्रणालीमध्ये एका वापरकर्त्याच्या चष्म्यातील कॅमेरा आणि डिस्प्ले वापरून इतर वापरकर्त्यांशी वास्तविक वेळेत संवाद साधता येतो.वापरकर्ते आभासी माध्यम वस्तूंचा वापर करून संवाद साधू शकतात,ज्यामुळे वास्तविक जगातील वातावरणात आभासी वस्तू समाविष्ट करता येतात. या तंत्रज्ञानाने आभासी संवाद अधिक वास्तविक वाटण्यास मदत होणार आहे.ज्यामुळे वापरकर्त्यांचा अनुभव अधिक समृद्ध होणार आहे.

   हे तंत्रज्ञान भविष्यात शिक्षण,व्यवसाय,सामाजिक संवाद,शिक्षण क्षेत्रासह विद्यार्थी आणि शिक्षक आदींना महत्वपूर्ण ठरणार आहे.या घटकांना आभासी वर्गात अधिक प्रभावी संवाद साधण्यास मदत होणार आहे.या नवीन संशोधनाने व्यवसाय क्षेत्रासह कंपन्याना उपयुक्त ठरणार आहे.परिणामी त्यांची वेळ आणि खर्चाची बचत होण्यास मदत होणार आहे.सामाजिक संवादासाठी हे तंत्रज्ञान लोकांना त्यांच्या मित्र-परिवारासोबत अधिक जिव्हाळ्याचा अनुभव देऊ शकणार असल्याचा त्यांचा दावा आहे.

  त्यांच्या या नवीनतम संशोधनास दिनांक १४ मे २०२४ रोजी अमेरिकन पेटंट प्राप्त झाले आहे.नजीकच्या भविष्यात अजून तीन पेटंट मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याची त्यांनी माहिती दिली आहे.

         सध्याचे हे पेटंट अमेरिकेत प्रकाशित झाले असून लवकरच ते युरोप,कोरिया आणि चीनमध्ये देखील प्रकाशित होणार आहे. भारतीय विद्यार्थ्यांसाठी आणि त्यातल्या त्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही गौरवाची बाब मानली जात आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close