निवडणूक
गणेश सहकारी कारखान्याची लढाई सुरु,विविध गटांकडून तयारी !

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांची कामधेनू समजल्या जाणाऱ्या गणेश सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून नामनिर्देशन पत्र भरण्यात दि.१५ मे पासून सुरुवात होणार असून ते भरण्याचा अखेरचा दिवस दि.१९ मे सकाळी ११ ते दुपारी ०३ पर्यंत असून आलेल्या अर्जाची छाननी दि.२२ मे रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होणार असून नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा दि.२३ मे ते ०६ जून २०२३ पर्यंत दुपारी ०३ वाजे पर्यंत आहेत तर निवडणूक दि.१७ जून रोजी सकाळी ०८ ते दुपारी ०५ वाजे पर्यँत संपन्न होणार असल्याची माहिती पुणे येथील राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ.बी.एल.खंडांगळे यांनी वृत्तपत्रात जाहीर केले आहे.त्यामुळे राजकीय क्षेत्रांत नेत्यांनी आपल्या संघटन बांधणीस प्रारंभ केला आहे.
“प्रस्थापितांच्या ताब्यात गणेश दिला असताना सदर कारखाना तोट्यात कसा गेला ? शेतकरी संघटना जेथे जेथे शेतकरी कामगार यांच्यावर अन्याय होईल त्या त्या ठिकाणी जाणार आहे.जिल्ह्यातील नेते सहकारी संस्था वाटून खाण्यात समाधान मानतात.प्रवरेच्या माध्यमातून ८७ कोटींचा ११० तोटा तो विक्रमी तोट्यात घातला असून इतर देणी धरून ३७५ कोटी देणे आहे.ज्यांचा डॉ.विखे कारखाना ८७५ कोटींनी तोट्यात त्यांना गणेश सहकारी साखर कारखाना चालविण्यास दिलाच कसा ? शेतकरी संघटनेने अगस्ती कारखान्यात ७५ कोटींचा घोटाळा उघड केला आहे.राहुरीचे संचालक मंडळ हलवले,मुळा-प्रवरा वीज वितरण कंपनीवर प्रशासक आणले आहे.गणेश सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे रक्कम द्यायला लावली आहे.निवडणूकीत आपण हे प्रश्न सभासदासमोर आणणार आहे”-अड्.अजित काळे,प्रदेश उपाध्यक्ष,शेतकरी संघटना.
अड्.अजित काळे,प्रदेश उपाध्यक्ष,शेतकरी संघटना.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,राज्यातील सहकारी संस्थांच्या सहाव्या टप्प्यातील निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले असून राज्यातील २० हजार ६४२ सहकारी संस्थांच्या निडणुकांचा धडाका सुरु झाला आहे.त्यासाठी ०१ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीतील पात्र कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था वगळता इतर सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका मार्च २०२३ पासून ते ३० जून २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त यांनी दिले आहेत.त्यामुळे राज्यातील सर्वच सहकारी संस्थांचे नेते आणि कार्यकर्ते कामास लागले आहेत.त्याला गणेश सहकारी साखर कारखाना आणि या कार्यक्षेत्रातील शेतकरी आणि सभासद अपवाद नाही.गत सन-२००६ व २०१६ च्या निवडणुकीत डॉ.एकनाथ गोंदकर यांच्या पॅनेलने तत्कालीन केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे विरोधात पॅनल देऊन त्यांना मोठी टक्कर देण्याचा प्रयत्न केला होता.
“सदर निवडणुकीत आपण गणेश सहकारी साखर कारखाना सर्व गटागटांना एकत्र घेऊन लढणार आहे.या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना नजीकच्या कारखान्या प्रमाणे भाव मिळत नाही.कामगारांना त्यांचे वेतन व सेवानिवृत्ती नंतरच्या रकमा मिळत नाही.कारखान्याचा तोटा वाढला असून तो कमी करण्यासाठी आपण माजी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांना बरोबर घेऊन संगमनेर कारखान्याच्या बरोबरीने भाव देऊ या आश्वासना प्रमाणे शेतकऱ्यांना न्याय देणार आहे.त्यामुळे हि निवडणूक शेतकरी संघटनेसह समविचारी पक्षांसह सर्व उपेक्षित घटकाना बरोबर घेऊन लढणार आहोत”-डॉ.एकनाथ गोंदकर,श्री गणेश शेतकरी परिवर्तन मंडळ,गणेश सहकारी साखर कारखाना.
डॉ.एकनाथ गोंदकर.श्री गणेश शेतकरी परिवर्तन मंडळ.
दरम्यान गत वर्षी अशोक सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली सभासदांनी मोठा प्रतिसाद दिल्याने शेतकरी संघटनेच्या नेत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.त्यांनी या वेळी श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत लक्षवेधी कामगिरी केली आहे.त्यामुळे त्यांच्याकडून या निवडणुकीत सभासदांना मोठी अपेक्षा आहे.त्यामुळे त्यांनी गणेश सहकारी साखर कारखान्यात आपले भविष्य आजमविण्याचे ठरवलेले दिसत आहे.त्यासाठी सभासदांनी त्यांना आग्रह केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यानुसार त्यांनी राहाता तालुक्यातील श्री क्षेत्र वाकडी येथील प्रसिद्ध खंडोबा देवस्थान येथील सभागृहात व राहाता येथील एकनाथ मंगल कार्यालयात नुकतीच शेतकऱ्याच्या जनजागृती सभेचे आयोजन केले होते.तर दुसरीकडे साईबाबा विश्वस्त व्यवस्थेचे माजी विश्वस्त डॉ.एकनाथ गोंदकर यांनी यावेळी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सहकार्याने या लढाईत आपले अस्रे-शस्रे शमीच्या झाडावरून खाली खेचली आहे.त्यामुळे हि लढाई आता शेतकरी संघटना व काँग्रेस व कोपरगावचे आ.आशुतोष काळे,व माजी आ.स्नेहलता कोल्हे यांना बरोबर घेऊन होणार की केवळ शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांना घेऊन लढली जाणार याकडे शेतकरी व सभासद यांचे लक्ष लागून आहे.मात्र विरोधकांनी सर्वांनी एकत्र येऊन हि लढाई लढली तर यश मिळणे सोयीस्कर ठरणार असल्याची सभासदांची धारणा आहे.
दरम्यान सदर निवडणूकीत निवडणूक आयोगाने सभासदांना आपले नामनिर्देशन भरण्यास चार दिवसांचा असा अत्यंत कमी वेळ दिला आहे.शिवाय सहकार विभागाने पाच वर्षात किमान तीन वेळा ऊस दिलेला असला पाहिजे अशांना सभासद पात्र ठरवले आहे.त्यामुळे या किचकट अटीमुळे अनेकांची इच्छा असूनही निवडणूक संधी हुकणार आहे.तर अनेक मयत सभासदांच्या वारसांच्या नोंदी कारखाना व्यवस्थापन जाणीवपूर्वक कुटील उद्देशाने घेत नाही.व त्यांना जाणीवपूर्वक टाळले जाते हा प्रश्न उत्तर नगर जिल्ह्यातील सर्वच सहकारी साखर कारखान्यात तीव्र आहे.त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.हा सभासदांसाठी आखलेला कट असल्याची भावना सभासदांत निर्माण झाली आहे.त्यामुळे पात्र सभासद काय भूमिका घेणार याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागून आहे.
कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंद करा.