जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

कोपरगाव बाजार समितीत प्रस्थापित आघाडी पुन्हा स्थानापन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा


कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची मतमोजणी सायंकाळी ५.३० वाजता सुरू झाली असून त्यात सोसायटी,ग्रामपंचायत व अन्य सर्वसाधारण मतदार संघाची एकूण १२ टेबलद्वारे मतमोजणी संपन्न झाली असून या लढाईत प्रस्थापित आ.आशुतोष काळे,माजी आ.कोल्हे,राजेश परजणे, औताडे सेनेने बाजी मारली असून सर्वच्या सर्व १८ जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या आहे.तर शिवसेनेसह विरोधकांनी त्यांना मतदारापर्यंत जायला भाग पाडले असल्याचे मानले जात आहे.विजयी उमेदवारांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निकाल घोषित करताना निवडणूक अधिकारी नामदेव ठोंबळ व त्यांचे सहकारी दिसत आहे.

सोसायटी मतदार संघातील मते मिळालेले उमेदवार पुढील प्रमाणे-

आसने कैलास भीमा-१९,गव्हाणे रंगनाथ सोपान-१२९,गवळी राहुल सुरेश-१२४,गोर्डे बाळासाहेब गंगाधर-९४०,(विजयी,कोल्हे)चांदगुडे किरण मधुकर-१३१,जाधव विजय सुधाकर-१३०,टेके रावसाहेब चांगदेव-१२७,देवकर शिवाजी बापूराव-९६७,(विजयी,काळे) परजणे गोवर्धन बाबासाहेब-१०९८,(विजयी,काळे)पवार धनराज मनसुख-४४,पवार विष्णू नानासाहेब-३८,रोहोम साहेबराव किसन-१११२,(सर्वाधिक मते विजयी,कोल्हे) लामखडे साहेबराव शिवराम-११०३,(विजयी,कोल्हे)शिंदे लक्ष्मण विश्वनाथ-११०५,(विजयी,परजणे)शिंदे संजय माधवराव-१०८३,(विजयी,काळे)हेगडमल देवराम रामभाऊ-४० आदी मते मिळाली आहे.या खेरीज अवैध मते संख्या-७१ आहे.

दरम्यान या लढाईत विरोधी गटाकडून उद्धव सेनेचे उत्तर जिल्हाध्यक्ष प्रमोद लबडे,तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे,काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नितीन शिंदे,ऍड.दिलीप लासुरे यांनी ही खिंड लढवली आहे.त्यांना आगामी काळात तालुक्यातील जनतेचा विश्वास संपादन करावा लागणार आहे.मात्र त्यांनी सत्ताधाऱ्यांना पंधरा वर्षांनी प्रथम झुंजायला व मतदारांसमोर जायला भाग पाडले व कोपरगाव तालुक्यात लयाला जात असलेली व कपाटात बंदिस्त करून ठेवलेली लोकशाही जिवंत ठेवली हेही नसे थोडके.त्यामुळे तालुक्यातू त्यांचे कौतुक होत आहे.

दरम्यान महिला मतदार संघ मतमोजणी संपन्न झाली असून त्यात कदम मीरा सर्जेराव-११४७,(विजयी-औताडे सेना)जावळे गयाबाई धर्मा-१७१,डांगे माधुरी विजय-११३१,(विजयी-कोल्हेगट)बारहाते हिराबाई रावसाहेब-९०,आदी मते मिळाली आहे.यात अवैध मते-१३ आहे.

दरम्यान सोसायटी मतदार संघात काळे गटास-०३ कोल्हे गटास-०४,परजणे गटास – ०२ तर औताडे सेनेस-०१ जागा मिळाल्या आहे.

तर इतर मागासवर्ग मतदार संघ –

पवार गिरीधर दिनकर-१५३,फेफाळे खंडू पुंजाबा-१११०,(विजयी,भाजप,परजणे)बिडवे दत्ता नामदेव-२१ आदी मते मिळाली आहे.यात अवैध मते २३आहे.

दरम्यान या सोसायटी मतदार संघात काळे-कोल्हे,परजणे,औताडे आघाडी पुढे राहणार असल्याचे दिसू लागले आहे.पारंपरिक मतपत्रिका असल्याने जुळवणी व मोजणी नोंदणी यात अधिकारी कर्मचारी यांचा जास्त वेळ जात आहे.

यात आता टेबल क्रं.१-५ ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ तर व्यापारी मतदार संघ मतमोजणी सुरू झाली आहे.त्याचे निकाल हाती आले असून याची आकडेवारी पुढील प्रमाणे-गोर्डे प्रकाश नामदेव-६३१,(विजयी,कोल्हे गट)दंडवते संजय काशीनाथ-८८,निकोले राजेंद्र शंकर-६०८,(विजयी,काळे गट)पाडेकर विष्णू एकनाथ-८१ आदी मते मिळाली आहे.

व्यापारी मतदार संघाची आकडेवारी समोर आली असून यात उमेदवार निहाय मिळालेली मते पुढील प्रमाणे-

कोठारी सुनीलकुमार गोकुलचंद-१०,खान नदीम महंमद रियाज अहमद-१५,ठक्कर संतोष मंगलदास-३१,धाडीवाल ललीतकुमार तेजपाल-६७,निकम रेवणनाथ श्रीरंग-६९,(विजयी सदर उमेदवार कोल्हे गटाचा असल्याचे मानले जात आहे)भट्टड संजय श्यामलाल-३०,शाह मनीष जयंतीलाल-५३,सांगळे ऋषिकेश मोहन-१०६,(विजयी काळे गट)आदी मते मिळाली असून यात अवैध मते-०१आहे.

दरम्यान हमाल,मापाडी मतदार संघ उमेदवार निहाय मिळालेली मते पुढील प्रमाणे-

मरसाळे अर्जुन भगवान-१७,शेळके जलदीप भाऊसाहेब -२१,साळुंके रामचंद्र नामदेव-४७ विजयी (कोल्हे गट)

दरम्यान या पूर्वी निवडणूक अर्ज माघार घेण्याच्या वेळी बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पुढील प्रमाणे-

केकाण रामदास भिकाजी,(काळे गट) नवले अशोक सोपान,(औताडे सेना),मोकळं रावसाहेब रंगनाथ (काळे गट) येणे प्रमाणे जाहीर झालेले आहे.

विजयी उमेदवारांचे कोपरगाव तालुक्याचे आ.आशुतोष काळे,माजी आ.स्नेहलता कोल्हे,संजीवनीचे अध्यक्ष विवेक कोल्हे,महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे,आदींसह तालुक्यातील अनेकांनी अभिनंदन केले आहे.

दरम्यान कोपरगाव पीपल्स बँकेच्या सभागृहात संपन्न झालेल्या या मतमोजणीस कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांनी आपल्या सहकाऱ्यासंमवेत चोख बंदोबस्त ठेवला होता.मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.निकाल जाहीर होताच उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलाल उधळून जल्लोष केला आहे.

दरम्यान काळे गटाचे -०७ विजयी उमेदवार असून कोल्हे गटाचे-०७,परजणे गटाचे ०२ तर औताडे सेनेचे-२,विजयी झाले असून अपेक्षे प्रमाणे तालुक्यातील निवडक ग्रामपंचायत, सोसायटी मतदार संघातील मतदार असल्याने हा विजय मानला गेला आहे. भाजपने शेतकऱ्यांना जाहीर करूनही मतदान नाकारल्याने व केवळ उभे राहण्यास अनुमती दिल्याने हे निकाल अपेक्षित होते. चारही गट पहिल्यांदा एकत्र आल्याने हा विजय नक्की मानला जात होता.मात्र शिवसेना इतर असंतुष्ट गटांना एकत्र घेऊन प्रथमच स्वतःच्या पायावर उभी राहून सामोरी गेल्याने त्यांचे संघटन वाढले असून आगामी पंचायत समिती,जिल्हा परिषद,कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत सेना व भाजप हे निष्ठावान गट पाय रोवून उभे राहिले तर सत्ताधाऱ्यांना जड जाणार आहे हे उघड गुपित आहे.मधील काळात आ.काळे,माजी आ.कोल्हे यांचे उंट सेनेच्या तंबूत येऊन गेल्याने यांचे मोठे नुकसान झाले आहे.त्यांना आता नव्याने उभे राहावे लागणार आहे.

दरम्यान या लढाईत विरोधी गटाकडून उद्धव सेनेचे उत्तर जिल्हाध्यक्ष प्रमोद लबडे,तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे,माजी शहराध्यक्ष भरत मोरे,अस्लम शेख,काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नितीन शिंदे,ऍड.दिलीप लासुरे यांनी ही खिंड लढवली आहे.त्यांना आगामी काळात तालुक्यातील जनतेचा विश्वास संपादन करावा लागणार आहे.मात्र त्यांनी सत्ताधाऱ्यांना पंधरा वर्षांनी प्रथम झुंजायला व मतदारांसमोर जायला भाग पाडले व कोपरगाव तालुक्यात लयाला जात असलेली व कपाटात बंदीस्त केलेली लोकशाही अस्तित्वात ठेवली हेही नसे थोडके.त्यामुळे तालुक्यातून त्यांचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close