निवडणूक
कोपरगाव वकील संघात पदाधिकारी मुद्तवाढीवरून बेदिली,प्रतिसभा संपन्न !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव वकिल संघाच्या वर्तमान पदाधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण सभेत अवैध रित्या घेतलेल्या मुद्तवाढीस बहुसंख्य वकिलांनी हरकत घेतली आहे.व त्या विरोधात आज विरोधी गटाच्या सदस्यांची सर्वसाधारण सभा घेतली असून जेष्ठ वकिलांच्या समितीच्या समेटाने समस्या सुटली नाही तर पुढील निवडणूक जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती वकील संघाचे जेष्ठ सदस्य दिलीप लासुरे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार वकील संघात सत्ताधारी आमदारांना मानणारा एक एक गट असून दुसरा त्यांना विरोध करणारा दुसरा गट निर्माण झाला असून त्यातून हा वाद निर्माण झाला असल्याचे बोलले जात आहे.मात्र कोपरगाव वकील संघ हा तालुक्यातील जनतेला विकासात्मक नवीन विचार प्रदान करणारा प्रभावी गट मानला जात असून तो आज पर्यंत कोणत्याही राजकीय गटाला शरणवश झालेला नसताना हि घटना धक्कादायक व आक्रीत मानली जात आहे.त्यावर तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव वकिल संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच अध्यक्ष विद्यासागर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली असून त्यांनी त्या सभेत आपल्या कार्यकरिणीस मुदतवाढ घेतली होती.त्यावरून वकील संघटनेत बेदिली माजली असून विरोधी गटाने त्यास हरकत घेतली असून त्या निर्णयाविरोधात दुसरी सर्वसाधारण सभा सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घेतली आहे.त्यावेळी मोठ्या संख्यने सदस्य हजर होते.
त्यावेळी संपन्न झालेल्या सभेत वर्तमान पदाधिकाऱ्यांची मुदत वाढ फेटाळून लावण्यात आली असून ती अवैध रित्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.व अशी मुदत वाढ घेताच येत नाही असा दावा केला आहे.त्यावर उतारा म्हणून वर्तमान पदाधिकारी व वकील संघात फूट पडू नये म्हणून अध्यक्ष विद्यासागर शिंदे यांना समज देण्यासाठी वाटाघाटी करणार आहे.
त्यासाठी सहा जेष्ठ विधीज्ञ सदस्य नेमण्यात आले आहे.त्यात अड्.देव.अड्.मच्छीन्द्र खिलारी,अड्.रक्ताटे.अड्.टेके.अड्.एम.पी.येवले आदी मान्यवर अध्यक्ष शिंदे यांचेशी बोलणार असल्याची माहिती अड्.लासुरे यांनी दिली आहे.त्यांनी या उपरही ऐकले नाही तर त्या साठी निवडणूक अधिकारी म्हणून अड्.वाय.एन.जाधव,सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून अड्.एस.एस.खैरनार यांना नेमण्यात आले आहे.व आगामी निवडणूक आगामी ०८ जुलै रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे.व आमच्या बरोबर जास्त वकील संघाचे सदस्य असल्याचा दावा केला आहे.
दरम्यान या बाबत आमच्या प्रतिनिधीने वकील संघाचे विद्यमान अध्यक्ष विद्यासागर शिंदे यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी,”वकील संघाच्या सभेत ‘तसा’ निर्णय केला होता यास दुजोरा दिला आहे.मात्र विरोधी गट सभा घेणार असल्याचे समजले होते मात्र त्यांनी काय निर्णय घेतला त्याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे” सांगून हात वर केले आहे.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार वकील संघात सत्ताधारी आमदारांना मानणारा एक एक गट असून दुसरा त्यांना विरोध करणारा दुसरा गट निर्माण झाला असून त्यातून हा वाद निर्माण झाला असल्याचे बोलले जात आहे.मात्र कोपरगाव वकील संघ हा तालुक्यातील जनतेला विकासात्मक नवीन विचार प्रदान करणारा प्रभावी गट मानला जात असून तो आज पर्यंत कोणत्याही राजकीय गटाला शरणवश झालेला नसताना हि घटना धक्कादायक व आक्रीत मानली जात आहे.त्यावर तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.