निवडणूक
शिर्डी वि.का.स.संस्थेच्या निवडणुक प्रचारफेरीस सभासदांचा मोठा प्रतिसाद
न्यूजसेवा
शिर्डी-(प्रतिनिधी)
शिर्डी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचा सन-२०२२-२७ निवडणूक प्रचार अंतिम टप्यात आला असून आज आयोजित केलेल्या प्रचारफेरीस सभासदांनी मोठा प्रतिसाद दिला असल्याचे सिद्ध झाले आहे.
या प्रचार फेरीच्या वेळी अनेक सभासद सत्त्ताधारी वर्गाचे वाभाडे काढताना दिसत होते.जुन्या अनेक घटनांना उजाळा देताना दिसत होते.अनेकांनी आपल्याला सभासद होताना येणाऱ्या अडचणींचा पाढा वाचला तर अनेक सभासदानी आपल्याला कर्ज घेताना कसा स्वाभिमान दुखावला याचे दाखले दिले आहे.आगामी काळात सत्तेवर आल्यावर परिवर्तन पॅनलच्या नेत्यांना कर्जदारांना सभासद करून घेण्याचा आग्रह करताना दिसत होते.या पूर्वी दिलेल्या लढ्यातील अनेक अग्रणी जेष्ठ कार्यकर्ते यांना सत्ताधाऱ्यांनी दिलेले चटके बोलून दाखवताना दिसत होते.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”राज्यातील सहकारी सेवा संस्थांच्या निवडणूका संपन्न होत असून यात राहाता तालुक्यातील शिर्डी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था हि राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाची मानली जात आहे.तीची पंचवार्षिक निवडणूक येत्या १४ मे रोजी संपन्न होत आहे.त्यासाठी राजकीय आखाड्यात भाजप समर्थक आ.विखे समर्थक व राष्ट्रवादी समर्थक रणांगणात आहेत त्यांना कडवे आव्हान देण्यासाठी साई संस्थानचे विश्वस्त डॉ.एकनाथ गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली वीरभद्र परिवर्तन पॅनेल उभा ठाकला आहे.त्यांचा प्रचाराचा शुभारंभ नुकताच बिरोबा बन येथे श्री वीरभद्र मंदिरात संपन्न झाला आहे. त्यानंतर प्रचार मोठ्या उत्साहात सुरु असून त्यावरून सभासदांत घराणेशाही व त्यातील तेच ते चेहरे व विकास कामांचा अभाव,सभासादांशी दुर्व्यवहार यावर उलटसुलट चर्चा सुरु आहे.दरम्यान आज परिवर्तन पॅनलच्या वतीने आज सभासदांना भेटीगाठीं घेण्यासाठी आज सकाळी प्रचार फेरीचे आयोजन केले होते.त्याला सभासदांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान या प्रचार फेरीत परिवर्तन पॅनलचे नेते साई संस्थानचे विश्वस्त डॉ.एकनाथ गोंदकर,शिर्डी शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन पाराजी कोते,शिर्डी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक नितीन शेळके,मनसेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कोते,सेनेचे माजी शहराध्यक्ष संजय शिंदे,रामराव शेळके,दिलीप कोते,नानासाहेब शिंदे,काकासाहेब शिंदे,माधव शिंदे,कमलेश लोढा,रमेश जगताप,गंगाधर कोते,राजेंद्र बनकर,नानासाहेब काटकर,राजेंद्र वाघ आदी कार्यकर्ते व त्यांचे सहकारी झोकून देऊन काम करत आहेत.
दरम्यान या प्रचारफेरीस सभासदांचा मोठा उत्साह व आगत-स्वागत या नेत्यांचे मनोधैर्य वाढवत होता असे दिसून आले आहे.यावेळी अनेक सभासद सत्त्ताधारी वर्गाचे वाभाडे काढताना दिसत होते.जुन्या अनेक घटनांना उजाळा देताना दिसत होते.अनेकांनी आपल्याला सभासद होताना येणाऱ्या अडचणींचा पाढा वाचला तर अनेक सभासदानी आपल्याला कर्ज घेताना कसा स्वाभिमान दुखावला याचे दाखले दिले आहे.आगामी काळात सत्तेवर आल्यावर परिवर्तन पॅनलच्या नेत्यांना कर्जदारांना सभासद करून घेण्याचा आग्रह करताना दिसत होते.या पूर्वी दिलेल्या लढ्यातील अनेक अग्रणी जेष्ठ कार्यकर्ते यांना सत्ताधाऱ्यांनी दिलेले चटके बोलून दाखवताना दिसत होते.
सदर प्रकरणी डॉ.गोंदकर,साई नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक कोते,शिर्डी शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन पाराजी कोते,शिर्डी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक नितीन शेळके,मनसेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कोते आदींनी सभासदांचे दुःख ऐकूण घेताना दिसत होते.व त्यांचा उत्साह वाढवताना दिसत होते.