निवडणूक
कोपरगाव तालुक्यातील…या सोसायटीत कोल्हे गटाचा धुव्वा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या वारी सहकारी सोसायटीची निवडणुक नुकतीच संपन्न झाली असून या निवडणुकीत १३ पैकी १२ जागा जिंकत कोल्हे गटाचा दारुण पराभव करून वारी सेवा सोसायटी ताब्यात घेतलीआहे.नूतन संचालकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
जिल्ह्यातील सेवा सहकारी संस्थांचे संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे मतदार असतात.त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका घेण्यापूर्वी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुका शक्य तितक्या लवकर घ्याव्यात असे खंडपीठाचे आदेश आहेत.पात्र विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत असून कोपरगाव तालुका त्याला अपवाद नाही.वारी सोसायटीची निवडणूक मोठ्या उत्साहात पार पडली आहे.
या निवडणुकीत काळे गटाचे निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे नवनाथ छबुराव जाधव, वाल्मिक खंडू जाधव,मधुकर निवृत्ती टेके,संजय सुभाष जाधव,मच्छिंद्र शंकर टेके,आप्पासाहेब बाजीराव मलिक,चांगदेव शुकलेश्वर शिरसाठ,गोकुळ ताराचंद पलघडमळ,लता सुधाकर टेके, लताबाई मधुकर गोर्डे,रावसाहेब चांगदेव टेके,दीपक कचरू गायकवाड यांचा समावेश आहे.
वारी सोसायटीत निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित उमेदवारांचे व निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे माजी आ.अशोक काळे व श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले आहे.