कृषी विभाग
..या गावचा जनावरे आठवडे बाजार होणार सुरु !

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर गत सात महिन्यापासून बंद असलेला पशुधना ची खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध असलेला कोपरगावचा आठवडे बाजार सोमवार दि.१९ ऑक्टोबर पासून पूर्ववत सुरू होत असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संभाजी रक्ताटे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोरोना साथीत तालुक्यातील ३७ नागरिकांचा बळी घेतला आहे.तर ०२ हजार ०७६ नागरिकांना या साथीने दंश केला आहे.तर उपचारानंतर ०१ हजार ९८७ नागरिक उपचारानंतर सावरले आहे.त्यामुळे अनेक नागरिक,शेतकरी यांची गैरसोय झाली.उद्योग बंद ठेवण्यात आले.त्यामुळे नागरिकांची,मजुरांची आर्थिक कुचंबणा झाली.अनेकांच्या नोकऱ्या गेल्या अनेकांचे रोजगार बुडाले तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यकक्षेत असणारे आठवडे बाजार नाईलाजाने बंद ठेवावे लागले होते.ते पूर्ववत सुरु होणार आहे-संभाजी रक्ताटे-सभापती,कोपरगाव बाजार समिती.
देशभरात कोरोना साथीला प्रतिबंध करण्यासाठी देशात पहिल्यांदा २२ मार्च रोजी पहिली जनता टाळेबंदी सरकारने जाहीर केली होती.त्या नंतर अधिकृत टाळेबंदी २४ मार्च रोजी जाहीर केली होती त्यानंतर सलग दोन महिने देश पंधरा दिवसाच्या टप्प्याने अत्यावश्यक सेवा वगळता बंद ठेवण्यात आला होता.या साथीत तालुक्यातील ३७ नागरिकांचा बळी घेतला आहे.तर ०२ हजार ०७६ नागरिकांना या साथीने दंश केला आहे.तर उपचारानंतर ०१ हजार ९८७ नागरिक उपचारानंतर सावरले आहे.त्यामुळे अनेक नागरिक,शेतकरी यांची गैरसोय झाली.उद्योग बंद ठेवण्यात आले.त्यामुळे नागरिकांची,मजुरांची आर्थिक कुचंबणा झाली.अनेकांच्या नोकऱ्या गेल्या अनेकांचे रोजगार बुडाले तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यकक्षेत असणारे आठवडे बाजार नाईलाजाने बंद ठेवावे लागले होते.त्याला कोपरगावची कृषी उत्पन्न बाजार समिती अपवाद नव्हती.सरकारच्या निर्णयानुसार या बाजार समितीतील व्यवहार बंद ठेवल्याने पशुधनाची खरेदी-विक्री बंद ठेवण्यात आली होती.त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेच पण हमाल,मापाडी,व्यापारी,वाहन चालक,दलाल,हॉटेल चालक यांचेही आर्थिक चक्र रुतून बसले होते.वर्तमानात कोरोनाच्या संकटाची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली असली तरी कोरोना संकट अद्याप संपलेले नाही. त्यामुळे जनावरे बाजारात जनावरे विक्रीसाठी व खरेदीसाठी येणाऱ्या शेतकरी व्यापारी तसेच दलाल,ट्रक,टेम्पो,पिक अप,रिक्षा चालक,हातगाडीवाले,हॉटेल वाले यांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे तसेच एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवावे तसेच तोंडाला मुखपट्या असल्याशिवाय बाजारात प्रवेश मिळणार नाही.ज्या व्यक्तीच्या तोंडास मुखपट्टी अथवा रुमाल बांधलेला नसेल त्या व्यक्तीस जागेवर पाचशे रुपयाचा दंड तत्काळ भरावा लागेल अन्यथा पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे.त्याच प्रमाणे बाजार आवारात पान,गुटका,तंबाखू खाऊन थुंकण्यास मनाई केली आहे,तसेच पान,गुटखा,तंबाखूचे स्टॉल लावण्यास मनाई करण्यात आली आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी व कोरोनाचा प्रसार होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र निकोले यांनी केले आहे.