निवडणूक
जिल्हा बॅंकेसाठी कोपरगावात मोठी आर्थिक उलाढाल संपन्न
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या २१ उमेदवारांपैकी १७ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून उर्वरित चार जागांसाठी कोपरगावात नुकतेच मतदान पार पडले आहे.
कोपरगाव तालुक्यात या निवडणुकीसाठी१६७ मतदान होते.बहुतांशी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क वाजवला आहे.यात मोठी आर्थिक उलाढाल संपन्न झाली असून एका मतासाठी साधारण पंचवीस ते तीस हजार रुपये मोजले गेल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
कोपरगाव येथे कोपरगाव नगरपालिकेच्या सहा नंबर शाळेतील मतदान केंद्रावर जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक आ. आशुतोष काळे व जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांनी मतदान केले आहे. जिल्हा बँकेच्या चार सदस्य निवडीसाठी हि मतदान प्रक्रिया पार पडली आहे.कोपरगाव तालुक्यात या निवडणुकीसाठी१६७ मतदान होते.बहुतांशी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क वाजवला आहे.यात मोठी आर्थिक उलाढाल संपन्न झाली असून एका मतासाठी साधारण पंचवीस ते तीस हजार रुपये मोजले गेल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.त्यातून जवळपास पन्नास लाखाहून अधिक उलाढाल निव्वळ कोपरगाव तालुक्यात झाली आहे.
यावेळी कारभारी आगवन,सतीश कृष्णाणी,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगूले,राजेंद्र जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.