निवडणूक
..या तालुक्यात एकही ग्रामपंचायत बिनविरोध नाही
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संपन्न होणाऱ्या २९ ग्रामपंचायतींची निवडणुकीची आज नामनिर्देशन मागे घेण्याची शेवटी तारीख होती त्यात आज छाननीतून शिल्लक राहिलेल्या ९७५ अर्जापैकी आज ३५३ उमेदवारांनी माघार घेतली असून सात जणांची बिनविरोध निवड झाली आहे तर आता निवडणुकीच्या फडात २७२ जागांसाठी ६११ पहिलवान रिंगणात राहिले असले तरी एकही ग्रामपंचायत बिनविरोध संपन्न झाली नसल्याने आगामी काळात ग्रामपंचायतीचा शिमगा जोरात संपन्न होणार अल्सयाचे चित्र स्पष्ट झाले आहे.
माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी जेऊर कुंभारी येथील प्रभाग क्रमांक तीन मधील पवार सुवर्णा सतीश,सांगवी भुसार येथील प्रभाग क्रमांक एक मधील माळी दीपक,प्रभाग क्रमांक तीन मधून नामदेव,माळी सुनंदा भास्कर,प्रभाग क्रमांक चार मधील शिंदे वंदना नानासाहेब,प्रभाग क्रमांक दोन मधील मेहेरखांब लहानुबाई पुंडलिक, प्रभाग क्रमांक तीन मधील सर्वसाधारण जागेत कासार मोहन अशोक,पुष्पां बाबासाहेब जाधव आदी सात जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.मात्र एकही ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आली नाही हे विशेष !
राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींची निवडणूक आगामी १५ जानेवारी रोजी संपन्न होत आहे.त्यांचे नामनिर्देशन पात्र मागे घेण्याची आज शेवटची तारीख होती.त्यात आज निवडणूक रिंगणातून आपला गाशा गुंडाळण्याची आज अखेरची तारीख होती.त्यामुळे राजकीय निरीक्षक व गावोगावच्या कार्यकर्त्यांच्या या माघारीकडे लक्ष लागून होते.त्यामुळे आता निवडणुकीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले असून बहुतेक ठिकाणी राष्ट्रवादी काळे गट व भाजप कोल्हे गट यांच्यात निवडणूक दुरंगी होत आहे.आज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी जेऊर कुंभारी येथील प्रभाग क्रमांक तीन मधील पवार सुवर्णा सतीश,सांगवी भुसार येथील प्रभाग क्रमांक एक मधील माळी दीपक,प्रभाग क्रमांक तीन मधून नामदेव,माळी सुनंदा भास्कर,प्रभाग क्रमांक चार मधील शिंदे वंदना नानासाहेब,प्रभाग क्रमांक दोन मधील मेहेरखांब लहानुबाई पुंडलिक, प्रभाग क्रमांक तीन मधील सर्वसाधारण जागेत कासार मोहन अशोक,पुष्पां बाबासाहेब जाधव आदी सात जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.मात्र एकही ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आली नाही.त्यामुळे हि धुरवड आता पंधरा जानेवारीपर्यंत संपन्न होणार आहे.या निवडणुकीचा निकाल त्या नंतर दि.१८ जानेवारी रोजी जाहीर होणार आहे.असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी योगेश चंद्रे यांनी दिली आहे.