निवडणूक
कोपरगावात शेवटच्या दिवशी विक्रमी अर्ज दाखल !
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यात ३४ जिल्ह्यांमधील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे.ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी इच्छुकांनी मोठी गर्दी केलेली आढळून आली असून कोपरगाव तालुक्यात आज अखेर २४४ पुरुष तर २९६ महिला असे एकूण ५४० विक्रमी अर्ज दाखल केले असून आज अखेर २९ ग्रामपंचायतीसाठी आठव्या दिवशी एकूण ४७३ पुरुष व ५२३ महिला असे ९९६ नागरिकांनी आपले नामनिर्देशन दाखल केले असल्याची माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी आमच्या प्रतिनिधींस दिली आहे.
नामनिर्देशन भरण्याची अखेरची मुदत आज संपली असून उद्या त्यांची छाननी ३१ डिसेंबर रोजी होईल.नामनिर्देशनपत्रे ०४ जानेवारी २०२१ पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल.मतदान १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ०५.३० या वेळेत होईल.मतमोजणी १८ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे.ऑफलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियने उशीर झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
राज्यातील १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान तर १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे.शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी,भाजप,मनसे या सर्वच प्रमुख पक्षांनी ग्रामपंचायत निवडणुकांच्या रिंगणात उडी घेतली आहे.त्यामुळे गाव पातळीवरील निवडणुका रंगतदार होणार आहे.मात्र सरपंचाचे आरक्षण नंतर जाहीर होणार आहे.या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत स्वीकारले जात होते आज अखेरचा दिवस होता. मध्ये तीन दिवस सलग सुट्या आल्याने शेवटच्या दोन दिवशी नागरिकांनी गर्दी केलेली आढळून आली आहे.तिला आज आठच्या दिवशी मोठी गती आली होती तरी अनेक अर्ज ऑफलाईन घ्यावे लागल्याने उशीर झाला असल्याचे पाहायला मिळाले आहे.आज दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रात आज प्राप्त अर्ज पुरुष व पुढे स्रिया व एकूण अर्ज दर्शविल्या असून पुढे आठ दिवसातील एकूण पुरुष व स्रियांचे आज अखेरची बेरीज दर्शवली आहे.
उक्कडगाव-१०-०८-१८,२०-१८-३८,तीळवणी-००-०१-०१,०८-१३-२१,अंजनापूर-११-१७-२८,११-१७-२८,घारी-१५-१६-३१,१७-१७-३४,मनेगाव-०८-१२-२०,१२-१३-२५,मळेगाव थडी-०७-०१४-२१,१५,२१,३६,सांगवी भुसार-१५-१७-३२-१५,१७,३२,वेळापूर-०५-०४-०९,१७,१५,३२,जेऊर पाटोदा-०६-०५-११,१६,१९,३४,काकडी-२०-१६-३६,२०,१६,३६,नाटेगाव-१०-११-२१,१०,११,२१,कासली-०९-१३-२२,०९,१६,२५,ओगदी-०६-०९-१५,०९,१३,२२,अंचलगाव-०४-०६-१०,१०,१३,२३,कोळगाव थडी -१९-१७-३६,३१,२७,५८,मायगाव देवी-११-१०-२१,१४,१३,२७,हिंगणी-०४-०५-०९,१२,१५,२७,रवंदे-०१,-००-०१,१३,१४,२७,संवत्सर-२१-२१-४२,६३,५४,११७,देर्डे चांदवड-०२-०-०२,१०,-१०-२०,मढी खुर्द-०७-०९-१६,१४,१६,३०,मढी बुद्रुक-००-०१-०१,१५-१८-३३,धोंडेवाडी-०८-२०-२८,०९-२२-३१,सोनारी-०९-१२-२१,०९-१२-२१,आपेगाव-१०-१०-२०-,१६-१८-३४,येसगाव-०७-१४-२१,१३-२३-३६,टाकळी-१०-०७-१७,-२१-१४-३५,कोकमठाण-०४-०७-११,-२९-२९-५८,जेऊर कुंभारी-०५-१४-१९-१५-२०-३५, असे एकूण २४४ पुरुषांनी तर २९६ महिला असे एकूण ५४० जणांनी अर्ज दाखल केले आहे तर एकूण आज अखेर ४७३ पुरुष,५२३महिला असे एकूण ९९६ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यानी दिली आहे.
नामनिर्देशन भरण्याची अखेरची मुदत आज संपली असून उद्या त्यांची छाननी ३१ डिसेंबर रोजी होईल.नामनिर्देशनपत्रे ०४ जानेवारी २०२१ पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल.मतदान १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ०५.३० या वेळेत होईल.मतमोजणी १८ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे.