निवडणूक

…या नगरपरिषदेत मताचा घटलेला टक्का कोणाला भोवणार !

न्यूजसेवा

कोपरगाव- (नानासाहेब जवरे)


      राज्यातील न्यायालयीन प्रक्रियेमुळे प्रलंबित झालेल्या व राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार,जिल्ह्यातील प्रलंबित राहिलेल्या तीन नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी आज,शनिवारी २० डिसेंबर सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदानाला उत्साहात सुरुवात झाली होती.यामध्ये कोपरगावसह,देवळाली प्रवरा,पाथर्डी या नगरपालिकांसह नेवासा नगरपंचायतीचा समावेश आहे.तसेच,जिल्ह्यातील सात नगरपालिकांमधील रिक्त असलेल्या नगरसेवकांच्या १२ जागांसाठीही आजच मतदान प्रक्रिया पार पडली आहे.मात्र या निवडणुकीत अर्थपूर्ण कारणामुळे मतदारांत उत्साह आढळून आला नाही त्यामुळे कोपरगाव नगरपरिषदेत जेमतेम 60- 65 टक्के मतदान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.प्रभाग क्रं.06 मधील नाभिक समाज मंदिरात उशिरा म्हणजेच पाच वाजता मोठी रांग असल्याने एकूण मतदानाची आकडेवाडी येण्यास उशीर होण्याची चिन्हे आहेत.

राष्ट्रवादीचे आ.आशुतोष काळे यांनी शहरातील मतदान केंद्रांना आपल्या कार्यकर्त्यासंह दिलेल्या भेटीत दिसत आहेत.

 

दरम्यान आज आमच्या प्रतिनिधीने मतदारांचा कौल जाणून घेतला असता कोपरगाव नगरपरिषद हद्दीत संमिश्र वातावरण आढळून आले आहे.शिवाय नगराध्यक्ष पदाला आमच्या प्रतिनिधीने आधीच जाहीर केल्या प्रमाणे कमळ कमी अधिक फरकाने पुढे राहण्याची व त्या पाठोपाठ घड्याळ राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.मात्र यात आता कालपासून (शिंदे) शिवसेनेचा तिसरा ध्रुव प्रभावीपणे निर्माण झाला असून ते कोणाची मते घटवणार यावर सर्व हारजितीचे समीकरण ठरणार आहे.

   राज्यातील बहुचर्चित कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक आज पार पडली आहे.या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे आदींसह राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आदींनी हजेरी लावली होती परिणामी सर्व वातावरण ढवळून टाकले होते.त्यामुळे या निवडणुकीत कोणाचे घोडेपुढे जाणार कोणाचा गुलाल होणार याकडे राज्यातील राजकीय निरीक्षकांचे आणि नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

श्रीमान गोकुळचंद विद्यालयात राष्ट्रवादीचे उमेदवार आणि पोलिसांत झालेली बाचाबाची दिसत आहे.

  कोपरगाव नगरपालिका निवडणुकीसाठी सकाळच्या सत्रात मतदारांचा संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला.सकाळी ७:३० ते ११:३० या पहिल्या चार तासांच्या कालावधीत एकूण १८.६२ टक्के मतदान झाले होते तर दुपारी 3.30 वाजता एकूण 63 हजार 448 मतदानांपैकी 15 हजार 459 पुरुष तर 15 हजार 339 असे एकूण 30 हजार 799 मतदारांनी आपल्या मतदानाचा म्हणजेच 48.54 टक्के मतदारांनी आपले मतदान केले होते.

विद्या प्रबोधिनी विद्यालय मतदान केंद्रात पाच वाजता मतदारांची लागलेली रांग दिसत आहे.

 

दरम्यान घटलेल्या मतदानाबाबत ईशान्य गडाच्या एका प्रतिनिधीशी संवाद साधला असता त्यांनी “मतदानाच्या आधी मतदारांना त्यांच्या कुटुंबास प्रचार सभेचा मोठा रोजगार मिळाला आहेच पण प्रति कुटुंब दोन ते तीन हजाराचा अर्थप्रसाद याआधीच दिला आहे.मतदार अजून काय अपेक्षा करणार ? असा सवाल केला आहे.मात्र 1972 च्या विधानसभा निवडणुकीत ज्यांनी मतदारांना राज्यात पहिल्यांदा मतदानाचा मोबदला म्हणून पाच रुपयांपासून या व्यसनाची सुरुवात केली असून आज तो दर 500 वर गेला आहे याला जबाबदार कोण ? यावर त्यांनी सविस्तर मौन पाळले आहे.

    दरम्यान आमच्या प्रतिनिधीने आज दुपारी 12 बाजेच्या सुमारास व सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बहुतांशी मतदान केंद्रांना हाती दिल्या असता श्रीमान गोकुळचंद विद्यालय गांधीनगर,माधवराव आढाव माध्यमिक विद्यालयात व निवारा हौसिंग सोसायटी ही तीन मतदान केंद्रे संवेदनशील आढळून आली आहे.या तीन्ही ठिकाणी दिवसभर कार्यकर्त्यांनी गोंधळ घालताना दिसून आले आहे.श्रीमान गोकुळचंद विद्यालयात दुपारी 12.30 वाजेचा सुमारास भाजपच्या कार्यकर्त्याने एका मतदारांचे मत त्याचे मताविरुद्ध स्वतः मारल्याने वाद निर्माण झाला होता.उपस्थित राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित मतदाराला ते मत घड्याळाला द्यायचे असताना तेथील भाजप कार्यकर्त्याने ते भाजपला मारून घेतले असा आक्षेप आहे.त्यामुळे भाजप कोल्हे गट आणि राष्ट्रवादी आ.काळे गटाच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये धुमश्चक्री उडाली होती.मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला आहे.तीच बाब माधवराव आढाव विद्यालयात मतदारांना ने आण करण्यावरून शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक यांच्यात वाद उफाळला होता.मोठी धावाधाव झाली होती.एकमेकाला प्रसाद देण्यापर्यंत मजल गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.त्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती.मात्र त्यांनी संयमाने प्रकरण हाताळले असल्याचे पुढील अनर्थ टाळला आहे.त्याठिकाणी शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांचेसह शहरातील पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेऊन सदर वाद संयमाने हाताळला आहे.तर निवारा परिसरात वादावादी झाली असल्याची माहिती हाती आली आहे.

कृषी मंडलाधिकारी कार्यालय मतदान केंद्रात मतदारांची लागलेली रांग दिसत आहे.

 

दरम्यान मतदानाची आकडेवारी येण्यास जवळपास रात्रीचे ०९ वाजणार असल्याची निवडणूक अधिकाऱ्यांकडून अद्यावत माहिती हाती आली आहे.

   दरम्यान कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत कधी एवढा निरुत्साह आढळून आला आहे.त्याला कारण या आधी पहिल्या टप्प्यात शिर्डी,येवला आदी नगरपरिषद निवडणुकीत मतदानाचा जो भाव फुटला त्याचे पडसाद या नगरपरिषदेत उमटले असून या ठिकाणी ईशान्यगड आणि पश्चिमगड यांच्यात झालेल्या अलिखित करारात दोघांनीही मताचा भाव एक नोटेचा (500) काढल्याने मतदारांचा भ्रमनिरास झाला असल्याचे दिसून आले आहे.त्यातून मतदानाच्या टक्केवारी घसरण्यात झाला असल्याचे मानले जात आहे.याचा परिणाम असा झाला आहे की,”आदल्या दिवशी शिंदे सेनेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जी सांगता सभा झाली त्यात शहरातील मतदारांना या नाराजीतून नगराध्यक्ष पदाचा सक्षम पर्याय म्हणून राजेंद्र झावरे सारखा विकासक चेहरा समोर दिसून आला आहे.परिणामी बरीच मते शिवसेनेकडे वळणार असल्याचे संकेत मिळाले आहे.त्यामुळे सेनेचे उमेदवार व माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांच्या मतदानाच्या टक्केवारीत निर्णायक आणि लक्षवेधी वाढ नोंदवली गेली तर मुळीच आश्चर्य वाटू घेऊ नये अशी स्थिती उद्भवणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

भारत प्रेस रोड वरील नाभिक समाज मंदिर मतदान केंद्रात मतदारांची सायंकाळी पाच वाजता लागलेली लांबच लांब रांग दिसत आहे.त्यावेळी पोलिस निरीक्षक संदीप कोळी आणि त्यांचे सहकारी लक्ष ठेवून असल्याचे दिसत आहे.

  

दरम्यान आताच ११.०८ वाजता आलेल्या माहितीनुसार सायंकाळी ०५ वाजता  एकूण ६३ हजार ४४८ मतदानांपैकी २१ हजार ९७२ पुरुष तर २१ हजार २७४,इतर ०१ असे एकूण ४३ हजार २४७ मतदारांनी आपल्या मतदानाचा म्हणजेच ६८.१६ टक्के मतदारांनी आपले मतदान केले असल्याचे उघड झाले असल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी दिली आहे.

  दरम्यान याबाबत एका ईशान्य गडाच्या एका कोअर समितीच्या कार्यकर्त्याने नाव न छापण्याच्या अटीवर म्हटले आहे की,”मतदानाच्या आधी मतदारांना त्यांच्या कुटुंबास प्रचार सभेचा मोठा रोजगार मिळाला आहेच पण प्रति कुटुंब दोन ते तीन हजाराचा अर्थप्रसाद याआधीच दिला आहे.मतदार अजून काय अपेक्षा करणार ? असा सवाल केला आहे.मात्र 1972 च्या विधानसभा निवडणुकीत ज्यांनी मतदारांना राज्यात पहिल्यांदा मतदानाचा मोबदला म्हणून पाच रुपयांपासून या व्यसनाची सुरुवात केली असून आज तो दर 500 वर गेला आहे याला जबाबदार कोण ? यावर त्यांनी तेथून काढला पाय घेतला आहे.त्याची किंमत पूर्ण राज्याला चुकवावावी  लागली आहे.आज मागास समजल्या जाणाऱ्या विदर्भ आणि मराठवाड्यातही लोक मतदानाचे पैसे मागू लागलेआहे हे विशेष !

   दरम्यान आज आमच्या प्रतिनिधीने मतदारांचा कौल जाणून घेतला असता कोपरगाव नगरपरिषद हद्दीत संमिश्र वातावरण आढळून आले आहे.शिवाय नगराध्यक्ष पदाला आमच्या प्रतिनिधीने आधीच जाहीर केल्या प्रमाणे कमळ कमी अधिक फरकाने पुढे राहण्याची व त्या पाठोपाठ घड्याळ राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.मात्र यात आता कालपासून (शिंदे) शिवसेनेचा तिसरा ध्रुव प्रभावीपणे निर्माण झाला असून ते कोणाची मते घटवणार यावर सर्व हारजितीचे समीकरण ठरणार असल्याने सर्वत्र संमिश्र आणि संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळत आहे.तर बऱ्याच प्रभागात मतदारांनी पक्ष न पाहता उमेदवार पाहून मतदान केल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे खालच्या जागांत सरमिसळ होताना दिसत आहे.उद्या दुपारपर्यंत निकाल हाती येणार असून खरे चित्र समोर येणार आहे.

________________________

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close