निवडणूक
कोपरगावात पुन्हा रंगणार रणसंग्राम…!

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
राज्यातील प्रलंबित असलेल्या कोपरगावसह राज्यातील २४ नगराध्यक्ष आणि १५४ नगरसेवकपदाची पुढे ढकलण्यात आलेली निवडणूक आज निवडणूक आज जाहीर करण्यात आली असून आता पुन्हा एकदा अकाली शिमगा साजरा होणार असल्याचे उघड झाले असून ही प्रक्रिया आता ०४ डिसेंबर पासून ते १० डिसेंबर पर्यंत माघारी पासून पुढे संपन्न होणार आहे.या प्रलंबित नगरपरिषदेच्या निवडणुकांचे मतदान २० डिसेंबर रोजी संपल्यावर २१ डिसेंबरला होणार आहे.त्यामुळे आता पुन्हा एकदा उमेदवारांना कंबर कसून कामाला लागावे लागणार आहे.त्यामुळे आता या कंबरतोड निवडणुकीत किती जण टिकणार व किती जण आपली शस्त्रे म्यान करणार हे लवकरच उघड होणारा आहे.

पूर्वी “राजाच्या घरी जन्म घ्या आणि हवे तसे राज्य करा” अशी एक म्हण होती आता ती “संस्थानिकांच्या (साखर कारखानदारांच्या) घरी जन्म घ्या आणि हवे तसे जनतेला पिळवून घ्या” अशी म्हण उदयाला आली आहे.वर्तमानात लोकांना केवळ कार्यक्षम कारभार नको असतो तर कार्यक्षमतेला लोक जास्त महत्व देतात.सत्ता राबवून मिळवलेल्या संपत्तीच्या बटबटीत प्रदर्शनामुळेच लोकांमध्ये राजकीय नेत्यांबद्दल तिटकारा निर्माण होण्याऐवजी आकर्षण निर्माण होत आहे हे कलीयुगाचे वैशिष्ट्य राहिले आहे.
महाराष्ट्रात नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही ठिकाणी संपल्या आहेत तर काही ठिकाणी अद्याप त्या प्रलंबित आहेत.मात्र,नागपूर खंडपीठाने सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींची एकत्रित मतमोजणी २१ डिसेंबरला करण्याचे आदेश दिला आहे.हा निवडणूक लढवणारे राजकीय पक्ष,उमेदवार आणि कार्यकर्त्यांसाठी मोठा झटका मानला जात आहे.ज्या ठिकाणी छाननीनंतर न्यायालयात अपील झाले होते.त्या ठिकाणी उमेदवारांना तीन दिवस असा पुरेसा वेळ मिळाला नाही असा याचिकाकर्त्यांचा आक्षेप होता.तो गृहीत धरून न्यायालयाने सदर निवडणुका दि.२९ नोव्हेंबर २०२५ रोजी पुढे ढकलल्या होत्या.व पुढील कार्यक्रम दिनाक ०४ डिसेंबर रोजी जाहीर करण्याचे सूचित केले होते.त्या प्रमाणे आज राज्य निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.त्यामुळे इच्छा असो नाही तर नसो आता कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीचा इच्छुकाना सामना करावा लागणार आहे.त्यामुळे पुन्हा एकदा विविध पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना पुन्हा एकदा आपले अस्त्रे शास्त्रे बाहेर काढावी लागणार असल्याचे उघड झाले आहे.

या निवडणुकीचा ठपका राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आ.आशुतोष काळे यांनी माजी आ.स्नेहलता कोल्हे आणि त्यांच्या युवराजांवर ठेवला आहे.आता पुन्हा एकदा त्यावरच रणसंग्राम होणार असल्याचे संकेत मिळत आहे.त्यासाठी नाल,घोडा,मेख,तंग,तोबरा,चंदीची बेगमी करण्यास सुरुवात झाली असून आपली अस्त्रेशस्त्रे जमविण्यास राऊतांची गणती करण्यास सुरुवात झाली आहे.”सुस्ती अजिबात नको…! चे आदेश सुटले आहेत.संस्थानिकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना,” जेवत असल्यास पाणी प्यावयास आम्हापाशी यावे”असे आदेश दिले आहेत.
या निवडणुकीचा ठपका राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आ.आशुतोष काळे यांनी माजी आ.स्नेहलता कोल्हे आणि त्यांच्या युवराजांवर ठेवला आहे.आता पुन्हा एकदा त्यावरच रणसंग्राम होणार असल्याचे संकेत मिळत आहे.त्यासाठी नाल,घोडा,मेख,तंग,तोबरा,चंदीची बेगमी करण्यास सुरुवात झाली असून आपली अस्त्रेशस्त्रे जमविण्यास राऊतांची गणती करण्यास सुरुवात झाली आहे.”सुस्ती अजिबात नको…! चे आदेश सुटले आहेत.संस्थानिकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना,” जेवत असल्यास पाणी प्यावयास आम्हापाशी यावे”असे आदेश दिले आहेत.पुन्हा एकदा इच्छुक उमेदवारांचा घोडा अस्मानातून धावू लागणार आहे.कोपरगाव नगरपरिषदेचा मुलुख सर करण्यासाठी आता ताणतानी सुरू होणार आहे.आता आगामी काळात कोण कोणाच्या मुख मस्तीतला दम काढतो ते उघड होणार आहे.या आधी ईशान्य गडाने सर्व तोफा आ.काळे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे यांच्यावर आधीच डागल्या आहेत.तर कोयटे आणि आ.काळे यांनीही खोडा पार्टी म्हणून माजी आ.कोल्हे गटांची निर्भत्सना केली आहे.आता पुन्हा एकदा निवडणूक लादल्याने आ.काळे यांना आयतीच संधी उपलब्ध झाली असून केवळ टेंभा टेकवायचा उशीर असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे गल्लीगल्लीतील गुलछबू कार्यकर्ते केवळ आदेश सुटण्याच्या आदेशाची वाट पाहत असल्याच्या बातम्या आहेत.पूर्वी “राजाच्या घरी जन्म घ्या आणि हवे तसे राज्य करा” अशी एक म्हण होती आता ती “संस्थानिकांच्या (साखर कारखानदारांच्या) घरी जन्म घ्या आणि हवे तसे जनतेला पिळवून घ्या” अशी म्हण उदयाला आली आहे.वर्तमानात लोकांना केवळ कार्यक्षम कारभार नको असतो तर कार्यक्षमतेला लोक जास्त महत्व देतात.सत्ता राबवून मिळवलेल्या संपत्तीच्या बटबटीत प्रदर्शनामुळेच लोकांमध्ये राजकीय नेत्यांबद्दल तिटकारा निर्माण होण्याऐवजी आकर्षण निर्माण होत आहे हे कलीयुगाचे वैशिष्ट्य राहिले आहे.शहरातील मतदार आता मतपेटीतून व्यक्त होतो की प्रस्थापितांना शरण जातो आता आगामी २० डिसेंबर रोजी तो दिसणार आहे.
दरम्यान या नुसार जिल्हाधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख ०४ डिसेंबर रोजी नामनिर्देशनपत्रे मागे घेण्यास सुरुवात होऊन त्याचा अंतिम दिनांक १० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ०३. वाजेपर्यंत ३ राहणार आहे.तर आवश्यकते प्रमाणे निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक ११ डिसेंबर २०२५ रोजी आहे.तर आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक २०डिसेंबर २०२५ सकाळी ७.३० पासून ते सायंकाळी ५.३० पर्यंत ५ असा आहे.तर त्याची मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दि.२१ डिसेंबर २०२५ सकाळी १०.वाजल्यापासून सुरुवात होणार असल्याची माहिती आज निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे.त्याला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत व सुहास जगताप आदींनी दुजोरा दिला आहे.



