निवडणूक
…तर त्यां मतदारांना ब्रम्हदेवही वाचवू शकणार नाही !

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
राज्याच्या निवडणूक आयोगाने 29 नोव्हेंबर रोजी एक परिपत्रक काढले.या परिपत्रकानुसार,ज्या ठिकाणी जिल्हा कोर्टात अपील सुरू आहे किंवा जिथे अपिलांचा निकाल लागण्यास उशीर झाला आणि उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी फक्त तीन दिवसांचाच अवधी मिळाला,अशा सर्व ठिकाणी निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.त्यात कोपरगाव नगरपरिषदेचा समावेश असून त्यात अनेकांचा भ्रमनिरास झाला आहे.तर अनेकांना निवडणुकीच्या तप्त वातावरणात मोठी हुडहुडी भरली आहे.आता उर्वरित नगरपरिषदाच्या निवडणुकांबाबत निवडणूक आयोग नेमका काय आदेश देतो याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.प्रस्थापिताविरोधात आयुष्य वेचलेल्या मात्र वर्तमानात भरकटलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा या निवडणुकीने घर वापसी करून देण्याची संधी निर्माण करून दिली असल्याचे दिसून येत आहे.

कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीचे आधी सर्वेक्षण करून सत्ताधारी दोन्ही गटांनी त्याप्रमाणे रणनीती आखली होती व ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचा त्यांना धोका होता त्यांचा त्यांनी निवडणूकपूर्व बेत पाहिला असल्याचे दिसून आले आहे.त्यासाठी त्यांनी साम,दाम,दंड,भेद आदी अस्त्रशस्त्रे वापरून विरोधकांना गारद करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे.त्यात सर्वात प्रबळ असलेल्या शिवसेना उबाठा गटाला त्यांनी जायबंदी केले असून त्यांचे निवडणूक मेरिट सर्वात जास्त असल्याचे या पाहण्यांमध्ये उघड झाले असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्यामुळे त्यांना आधी जायबंदी करून पुढील प्यादे वापरले आहे.
महाराष्ट्रातील राजकीय पक्ष,नेते आणि कार्यकर्ते यांना झटका देणारा निकाल उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला असून त्यात त्यांनी आज होणारी मतमोजणी पुढे ढकलली आहे.महाराष्ट्रात नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही ठिकाणी संपल्या आहेत तर काही ठिकाणी अद्याप त्या सुरु आहेत.मात्र,नागपूर खंडपीठाने सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींची एकत्रित मतमोजणी 21 डिसेंबरला करण्याचे आदेश दिला आहे.हा निवडणूक लढवणारे राजकीय पक्ष,उमेदवार आणि कार्यकर्त्यांसाठी मोठा झटका मानला जात आहे.या निकालावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.कारण आज होणारी मतमोजणी आता थेट प्रलंबित.24 नगराध्यक्ष आणि 154 नगरसेवकपदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आलीआहे.नगरपरिषदेच्या निवडणुकांचे मतदान 20 डिसेंबर रोजी संपल्यावर 21 डिसेंबरला होणार आहे.त्यामुळे उर्वरित नगरपरिषदेच्या निवडणुकीकडे राज्यातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.काल ज्या 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी काल मोठ्या उत्साहात मतदान झाले आहे.एकूण 12 हजार 316 मतदान केंद्रांसाठी 62 हजार 108 निवडणूक अधिकारी,कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.मतदान केंद्रांवर पोलिसांमार्फत पुरेशा बंदोबस्त लावण्यात आला आहे.नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या 264 अध्यक्षपदांच्या आणि 6 हजार 42 सदस्यपदांच्या जागांसाठी मतदान झाले असले तरी नगरपालिका आणि नगरपंचायतींची निवडणूक न्यायालयीन कचाट्यात अडकल्याचे दिसते.जिल्हा न्यायालयात या निवडणुकीला आव्हान देण्यात आले होते.24 अध्यक्ष आणि 154 सदस्य पदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती.राज्य निवडणूक आयोगाने सुधारीत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.त्यावर हा आदेश आला असल्याने,’कही खुशी,कही गम ‘ दिसत आहे.

कोपरगाव तालुक्यातीलच नव्हे तर उत्तर नगर जिल्ह्यातील नेते मंडळी स्वतःच्या गड-किल्ल्याकडे जाणारे रस्ते धड करू शकत नाही तेंव्हा इतरांचा प्रश्न येतोच कुठे ? अशा स्थितीत मतदार या नेत्याना जर आपले देवदूत समजणार असतील तर एक दिवस ही प्रस्थापित मंडळी स्वतःला हिरण्यकश्यपू सारखे जिल्ह्याचे अथवा तालुक्याचे ईश्वर म्हणून जाहीर करण्यास मागेपुढे पाहणार नाही.तो दिवस आता फार दूर नाही.
कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत माजी आ.कोल्हे गटाने जिल्हा आणि सत्र न्यायालयात अपील केल्याने उमेदवारांना आपले नामनिर्देशनपत्र माघारी घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही.असा आरोप आ.आशुतोष काळे गटाने केला असून त्या विरोधात काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला आहे.आणि तो रास्त मानला जात आहे.परिणामी त्याचा फटका सर्वपक्षीय नेते आणि उमेदवारांना बसला असून सगळे मुसळ केरात गेले आहे.आता पुन्हा एकदा त्याच मुद्द्यांवर शिमगा साजरा करावा लागणार असल्याने सर्वच पक्षांच्या नेत्यांना आपल्या भात्यात बाण भरावे लागणार आहे.मात्र पहिल्यासारखी मजा या निवडणुकीत येणार की,राजकीय समीकरणे बदलणार याकडे नागरिकांचे आणि राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.कारण या निवडणुकीचे आधी सर्वेक्षण करून सत्ताधारी दोन्ही गटांनी त्याप्रमाणे रणनीती आखली होती व ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचा त्यांना धोका होता त्यांचा त्यांनी निवडणूकपूर्व बेत पाहिला असल्याचे दिसून आले आहे.त्यासाठी त्यांनी साम,दाम,दंड,भेद आदी अस्त्रशस्त्रे वापरून विरोधकांना गारद करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे.त्यात सर्वात प्रबळ असलेल्या शिवसेना उबाठा गटाला त्यांनी जायबंदी केले असून त्यांचे निवडणूक मेरिट सर्वात जास्त असल्याचे या पाहण्यांमध्ये उघड झाले असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.परिणामी त्यांनी शिवसेनेला जेरबंद करण्यासाठी थेट मातोश्री पर्यंत सुरुंग पेरले असल्याचे उघड झाले आहे.परिणामी माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांना उमेदवारी मिळू नये यासाठी मोठी यातायात केली असल्याचे उघड झाले आहे.मात्र कोपरगाव शहरात शिवसेनेचे आणि निष्ठावान भाजपचे हे कायम दुर्दैव राहिले आहे की,कोपरगाव शहर आणि तालुक्यातील जनतेने त्यांना कायम डोक्यावर घेतले असताना त्यांना मात्र वरिष्ठ नेत्यांनी माती चारली असल्याचे इतिहासात डोकावून पाहीले तर दिसून येते.

कोपरगाव तालुक्याचा इतिहास साक्षी आहे.प्रस्थापित नेते हे विकास करणारे आहे असे म्हणणे धाडसाचे होईल.कौटिल्याचे अर्थशास्त्र या आर्य चाणक्याच्या प्राचीन ग्रंथातील उल्लेखाप्रमाणे जनता कायम उपाशी असली तर राजाला राजकारण करणे सोपे जाते या विचारांचा आज अडीच हजार वर्षांनी ही मंडळी मनोभावे जप करत आहे.त्यामुळे त्यांचेकडून विकासाची वेगळी अपेक्षा करणे वेडगळपणाचे ठरेल.
दरम्यान त्यात त्यांनी साखर सम्राटांकडून (पक्षनिधीच्या नावाखाली) पेट्या घेऊन स्थानिक निष्ठावानाचा बळी घेतला आहे.आणि त्यांच्या तीन पिढ्या बरबाद केल्या असल्याचे सहज दिसून येत आहे.आता या निवडणुकीत त्याचा अनुभव आला आहेच.बातमी अशी आहे की,विजयी मेरिट असलेल्या उमेदवाराला आधी त्यांनी पक्ष फोडून जरबंदी केले आहे.ईशान्य गडाने जवळपास पाच सहा जणांना आपल्या गोटात वळवून त्यांना उमेदवाऱ्या दिल्या आहेत.काही जणांना पश्चिम गडावर आधीच जायला भाग पाडले आहे.तर उर्वरित एकाला आर्थिक बळ पुरवून विजयाचे मेरिट असलेल्या उमेदवाराला पर्यायी उमेदवार उभा करण्यासाठी त्यांनी पेट्या पुरवून त्यास पक्षाच्या बाहेर जाण्यास भाग पाडले आहे.त्यात एका मुंबईस्थित दुय्यम नेत्याला हाताशी धरून बळी दिला असल्याचं मानले जात आहे.पक्षप्रमुखाचा विरोध डावलून हा खेळ खेळला गेला असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्यामुळे भाजप सारखीच शहरातील सेना आता होत्याची नव्हती झाली आहे.कोपरगाव शहर आणि तालुक्यात तिसरा ध्रुव निर्माण होऊ नये यासाठी प्रस्थापित दोन्ही गडावरील नेते मोठी काळजी घेत आहे.संपूर्ण प्रचार यंत्रणेत भाजपच्या ज्या माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी विकासात मोठी भूमिका निभावली त्यांना अदखलपात्र केले असून आपापसात आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झाडून त्यांच्यावर अनुल्लेखाचा मारा करून जायबंदी केली असल्याचे दिसून आले आहे.प्रस्थापितांच्या या लढाईचे वर्णन आम्ही बऱ्याच लेखात, ‘रेवडी कुस्ती’ केले आहे.ही प्रस्थापित मंडळी शहर आणि तालुक्यात तिसरा ध्रुव तयार होऊ नये यासाठी कोपरगावच्या विरोधी पक्षाच्या मोकळ्या झालेल्या राजकीय अवकाशात ते कुणालाही शिरकाव करू देत नाही आणि यावेळी खात्रीने तेच घडले आहे.मात्र राजकीय निरीक्षकांना आणि सामान्य जणांना याची साधी कल्पना नाही हे विशेष ! दैवी कृपेने या मतदारांना निवडणूक आयोगाने निष्ठावान शिवसेना आणि भाजप मधील वाट चुकलेल्या पिरांना पुन्हा आपल्या फकिरांकडे आणण्यासाठी निवडणूक पूर्व केलेली चूक सुधारण्यास आणखी एक संधी निर्माण करून दिली आहे.दरम्यान ते यासंधीचा किती फायदा उचलणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.कारण कोपरगाव शहर आणि तालुक्याचा इतिहास साक्षी आहे.प्रस्थापित नेते हे विकास करणारे आहे असे म्हणणे धाडसाचे होईल.कौटिल्याचे अर्थशास्त्र या आर्य चाणक्याच्या प्राचीन ग्रंथातील उल्लेखाप्रमाणे जनता कायम उपाशी असली तर राजाला राजकारण करणे सोपे जाते या विचारांचा आज अडीच हजार वर्षांनी ही मंडळी मनोभावे जप करत आहे.कारण नगर-मनमाड हा अनेक नागरिकांना बळी घेणारा रस्ता या निवडणुकीत मतनारायण विसरले आहे.खरे तर ते विकास मार्गातील धोंड आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये इतकेच.शिर्डीच्या गर्दीच्या काळात वापरला जाणारा झगडेफाटा ते वडगाव पान रस्ता निधी विना तसाच नागरिकांचे बळी घेत राहणार आहे.धामोरी रस्त्याची दूरावस्था संपलेली नाही.लासलगाव रस्त्याची दयनीय अवस्था पाहण्यासारखी आहे.शेती पाण्याचा प्रश्न जैसे थे आहे.पश्चिमेचे पाणी केवळ निवडणुकीत तोंडी लावले जात आहे.गोदावरी कालव्यांखाली असलेल्या शेतकऱ्यांचे शेतीचे ब्लॉक शेती घेऊन संपवले आहे.कोपरगाव शहरात दोन वर्षात पाणी देतो म्हणणारे नेते आता पाच क्रमांकाचा तलाव पूर्ण होऊनही आता त्यांनी एक ते चार क्रमांकाचे गाजर आता पुढे केले आहे.आणि हे असेच पुढे सुरू राहणार आहे.मात्र पाणी चोरी आणि सदोष वितरण व्यवस्थेबाबत कोणीही बोलण्यास तयार नाही.म्हणजे मूळ प्रश्न तसाच आहे.तालुक्यातील रस्त्यांची कुठलीही कवडीची दुरुस्ती झालेली नाही.ही नेते मंडळी यांच्या गड-किल्ल्याकडे जाणारे रस्ते धड करू शकत नाही तेंव्हा इतरांचा प्रश्न येतोच कुठे अशा स्थितीत मतदार या नेत्याना जर आपले देवदूत समजणार असतील तर एक दिवस ही प्रस्थापित मंडळी स्वतःला हिरण्यकश्यपू सारखे तालुक्याचे ईश्वर म्हणून जाहीर करण्यास मागेपुढे पाहणार नाही.शहरातील गटारी,बसस्थानक आदींची साडेसाती संपलेली नाही अशातच सन-2011 साली 10 मार्च रोजी उठवलेल्या 02 हजारहून अधिक विस्थापितांची चूल पेटलेली नाही.गेली चौदा वर्षे मात्र नेते जप करत आहे.हे सर्व महत्वाचे आणि गंभीर प्रश्न विसरून तरीही त्यांनी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून निवडणुकीची दिशा भरकटवली असल्याचे सहज दिसून येईल.दरम्यान तरीही…या नेत्यांच्या गोड बोलण्याला लोभी मतदार त्याला बळी पडत असतील तर या नागरिकांना थेट ब्रम्हदेव अवतरला तरी वाचवू शकणार नाही हेच खरे…!



