निवडणूक
कोपरगावात…हा पक्ष लढणार स्वतंत्र !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक बैठक संपन्न झाली असून या निवडणुकीत स्वतंत्रपणे उडी घेणार असल्याची माहिती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

"यावेळी झालेल्या चर्चेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनिशी उतरणार असून,सर्व ठिकाणी नगरपालिका,पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी काँग्रेस पक्ष स्वबळावर उमेदवार उभे करणार असल्याचे यावेळी निश्चित करण्यात आले आहे"-नितीन शिंदे,अध्यक्ष,कोपरगाव तालुका काँग्रेस.
राज्यातील तब्बल चार वर्षांपासून प्रशासकराज असलेल्या नगरपालिकेची लवकरच निवडणूक होणार असल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांचे याकडे लक्ष लागून राहिले आहे.या आरक्षणामुळे अनेक उमेदवारांचे नशीब उजळणार की त्यांना फटका बसणार याबाबतची नागरिकांची उत्सुकता आता संपली आहे.मोठ्या प्रतीक्षेनंतर ही कोपरगाव नगरपालिकेची निवडणूक होत असल्याने प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू झाली आहे.आरक्षण सोडतीची सर्व उमेदवारांना प्रतीक्षा होती,कारण ती जाहीर झाल्याशिवाय उमेदवारीचे चित्र स्पष्ट होणार नव्हते.आता ही सोडत जाहीर झाल्याने इच्छुकांनी तथा भावी नगरसेवक आणि अध्यक्षांनी आपली कागदी घोडे एकत्र करण्याचे काम सुरू केल्याने दिसून येत आहे.यावेळी एका प्रभागाची अधिकची भर पडली आहे.त्यामुळे नगरसेवकांची संख्या 28 वरून 30 वर जाणार हे ओघाने आलेच.
दरम्यान विविध पक्ष आता एकत्र लढायचे की आघाडी करून लढायचे की युती करून याचे मेळ घालण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे.याआधी न्युजसेवा’ ने यापूर्वीच काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढवेल असा कयास व्यक्त केला होता.तो खरा ठरताना दिसत आहे.याबाबत संगमनेर येथे आज या निवडणुकीबाबत कोपरगाव तालुक्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबत मोठ्या उत्साहात बैठक संपन्न झाली आहे.त्याबाबत त्यांनी ही माहिती दिली आहे.
सदर प्रसंगी तालुकाध्यक्ष नितीन शिंदे,शहराध्यक्ष तुषार पोटे,माजी नगरसेवक बाबुराव पहिलवान ऊर्फ कैलास पंडोरे,किसान काँग्रेसचे विजय जाधव,रौणक अजमेरे,निलेश चांदगुडे,विष्णू पाडेकर,शब्बीर शेख,सचिन होन,राजू भाई पठाण,ज्ञानेश्वर भगत,बाबूराव पवार,सोपान धेनक,सोमनाथ पगारे,संजय त्रिभुवन यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांचे इच्छुक उमेदवार बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी झालेल्या चर्चेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनिशी उतरणार असून,सर्व ठिकाणी नगरपालिका,पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी काँग्रेस पक्ष स्वबळावर उमेदवार उभे करणार असल्याचे यावेळी निश्चित करण्यात आले असल्याची माहिती आहे.पक्ष संघटना बळकट करून एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी मंत्री थोरात यांनी पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याच्या सूचना दिल्या आणि लोकाभिमुख कामे प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले आहे.याबाबत लवकरच कोपरगाव येथे मेळावा घेऊन निरीक्षक नेमून उमेदवार मुलाखत व रणनीती राबवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.दरम्यान या बैठकीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे मानले जात आहे.