निवडणूक
जिल्हा परिषद निवडणूक आली पक्षांतर सुरू !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
शिंगवे येथील नितीन चौधरी,सेवा सोसायटीचे संचालक सुनिल चौधरी,अनिल चौधरी,सुरेश बाभुळके व किरण ठोंबरे आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांच्या प्रसिद्धी कार्यालयाने दिली आहे.

आगामी काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा शिमगा रंगणार आहे.त्यामुळे इच्छुक उमेदवार आणि नाराज कार्यकर्ते आदींच्या पक्षांतराच्या बेडूक उड्या सुरू झाल्याचे दिसत आहे.याची सुरुवात कोपरगाव मतदार संघात शिंगवे या ठिकाणी सुरू झाल्याची चुणूक पहायला मिळाली आहे.
गेल्या तीन वर्षापासून अधिक काळ रखडलेल्या ग्रामीण भागातील महत्वाच्या असणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समित्याच्या निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे.या निवडणुकीसाठी जिल्हा गट आणि गणाची प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.यात २०२२ च्या जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियमातील दुरूस्तीनूसार प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे जास्ती जास्त ७५ तर कमीत कमी ५० गट राहणार आहे.त्यात्या ठिकाणी असणाऱ्या लोकसंख्येच्या प्रमाणात हे गट निश्चित करण्यात येणार आहे.त्याबाबत नागरिकांकडून हरकती मागवल्या असून आगामी काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा शिमगा रंगणार आहे.त्यामुळे इच्छुक उमेदवार आणि नाराज कार्यकर्ते आदींच्या पक्षांतराच्या बेडूक उड्या सुरू झाल्याचे दिसत आहे.याची सुरुवात कोपरगाव मतदार संघात शिंगवे या ठिकाणी सुरू झाल्याची चुणूक पहायला मिळाली आहे.येथील कार्यकर्ते नितीन चौधरी,शिंगवे सेवा सोसायटीचे संचालक सुनिल चौधरी, अनिल चौधरी,सुरेश बाभुळके व किरण ठोंबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.या सर्व कार्यकर्त्यांचे आ.आशुतोष काळे यांनी स्वागत केले आहे.
याप्रसंगी माजी सरपंच ज्ञानदेव चौधरी, पद्माकर सुराळकर,निलेश चौधरी,रवींद्र बाभुळके,बाबासाहेब पवार,चांगदेव चौधरी, बाळासाहेब ठोंबरे,नारायण ठोंबरे,महेश काळवाघे,प्रमोद चौधरी आदी उपस्थित होते.