निवडणूक
कोपरगाव विधानसभेचा उमेदवार कोण ? अजित पवार यांचे सभेनंतर संदिग्धता

न्यूजसेवा
कोपरगाव – (नानासाहेब जवरे)
आम्ही आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या सरकारने विविध योजना जाहीर केल्या असून त्या मोठया प्रमाणावर राबविणार असून आगामी विधासभेची उमेदवार महायुतीचे नेते एकत्र बसल्यावर कोपरगाव विधानसभेचा उमेदवार ठरवू असे आश्र्वासित करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिन्नर येथील सभेसारखे थेट आ.आशुतोष काळे यांना उमेदवार जाहीर करण्याचे टाळले असल्याने तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

“आपण अजित दादांचा लाडका मुलगा म्हणून काम करत आहे.मतदार संघासाठी ०३ हजार कोटींचा निधी दिला आहे.त्यांना आता राज्याचे मुख्यमंत्री करायचे आहे त्यासाठी काम करायचे आहे.पश्चिमेचे घाट माथ्याचे पाणी पूर्वेस कोपरगाव मतदार संघासाठी आणण्यासाठी अजित दादा न्याय देणार आहे.आपल्या मतदार संघातील विविध समस्यामुळे अजितदादांना त्रास दिला त्याबद्दल माफी मागतो आहे.त्यांच्या कडून आगामी काळात वीज,पाणी,रस्ते आदींचे प्रश्न सोडविण्यास मदत करण्याची मागणी केली.व मतदार संघातील एकलव्य,वीर राणा प्रताप यांचे स्मारक करयचे आहे”- आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गुरुवार दि.०८ पासून जनसन्मान यात्रा काढली आहे.राज्यभरात जाणारी हि जनसन्मान यात्रा शनिवार दि.१० ऑगस्ट रोजी दुपारी ०५.३० वाजता कोपरगाव शहरात आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा.प्रफुल्ल पटेल,प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे,महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर,माजी आ.अशोक काळे,कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ.मच्छीन्द्र बर्डे,संभाजी काळे,चैताली काळे,आदींसह विविध संस्थानचे पदाधिकारी आदींसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”आपण राज्यात काढलेली जन सन्मान यात्रा ही जनतेच्या सन्मानाची ही यात्रा आहे.सामान्य महिलांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.लखपती योजना एक ते अठरा वर्षे वय असलेल्या लहान मुलींना आणली आहे.भावाच्या नात्याने आपल्याला महिलानी राख्या बांधल्या आहेत याची माझ्यावर जबाबदारी आली आहे.आपण शब्दाचा पक्का आहे.त्यांना जुलै पासून दोन महिन्यांचे प्रत्येकी १५०० रुपये देण्यास सुरुवात करणार आहे.आधी ०६ हजार कोटींची तरतूद केली मगच बाहेर पडलो आहे.कोपरगाव तालुक्यात ६० हजार महिलांना ही रक्कम दोन हत्याची एकाच वेळी देण्यात येणार आहे.वर्षाला ४६ हजार कोटी देणार आहे.हा विचारपूर्वक निर्णय घेतला आहे.हा निवडणुकीचा मामला नाही असे सांगितले आहे.विरोधक आपल्यावर टीका करत असले तरी आपण यापूर्वी अनेक योजना आणल्या आहेत.निवडणुका आल्यावर विरोधक टीका करत असतात त्या विरोधकांवर विश्वास ठेवू नका.आपण विरोधकांना कृतीतून उत्तर दिले आहे.व हे येऱ्या गबाळ्याचे काम नाही.आर्थिक शिस्त राखून हे काम करणार आहे.त्यासाठी पैशाची अजिबात वानवा नाही.वन नेशन वन टॅक्स मधून मोठ्या प्रमाणावर नागरिक टॅक्स भरतात.ही योजना निवडणुकीनंतर कायम चालणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.त्यासाठी आगामी काळात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला निवडून आणावे लागणार आहे.राज्यातील महिलांना आमचे सरकार आगामी काळात तीन गॅस टाक्या मोफत देणार आहे.मुलींचे उच्च शिक्षण योजना सुरू करून त्यांना उच्च शिक्षण दिले जाणार आहे.अपत्यांची संख्या मर्यादित ठेवा,दोन पेक्षा जास्त नको असे सांगताना त्यांनी ही देवाची कृपा नाही ही कोणाची कृपा आहे मला माहिती आहे,मी ही त्यातून गेलो आहे;अशी मिश्किल टिपणी केली आहे.(हशा)आम्ही भाजप बरोबर का गेलो ? यावर खूप टीका झाली.त्याचे समर्थन करताना ते म्हणाले,”आम्ही सत्तेत नसतो तर कोपरगाव तालुक्याला तीन हजार कोटी मिळाले असते का ? शेजारी सिन्नर तालुक्याला २९०० कोटी त्यांच्या शेजारी निफाड तालुक्याला १८०० कोटी दिल्याचे आकडे सांगितले आहे.या निधीतून विविध विकास कामे मार्गी लावली आहे.यातून विजेची बिले मार्गी लावली.शेतकऱ्यांना आगामी काळात विजेचे बिल येणार नाही त्यांनी आता पुढचे बिल भरायचे नाही.येथून पुढे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यासाठी सौर योजना देणार आहे.विरोधकांनी लाडक्या बहिणीच्या योजनेवर टीका केली व लाडक्या भावाला काय देणार असा कडवा सवाल विचारला आहे.त्यावर उत्तर देताना म्हणाके की,”लाडक्या भावाला आपण रोजगार प्रशिक्षण देऊन त्यांना सहा ते दहा हजार रुपयांची स्टायपेंड देण्याचे ठरवले आहे.रोजगार प्राप्तीसाठी आपण चार लाख मुलांना जर्मनीला पाठवणार आहे.त्यांना तेथे दोन लाख रुपये महिन्याला मिळणार आहे.बाहेरचे कारखाने राज्यात आणणार आहे.त्यासाठी त्यांनी टोयोटा,किर्लोस्कर आदी कारखान्याचे उदाहरण दिले आहे.याशिवाय लॉइडस कंपनी आणणार आहे.राज्यातील साखर कारखान्यांना मदत देत आहे.
दरम्यान कोपरगाव विधानसभेच्या मागील निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले की,”मागच्या निवडणुकीत आ.काळे यांना लई कसेबसे आठशे मतांनी निवडून दिले.आता आगामी निवडणुकीत असे करून चालणार नाही.जातीपातीचा विचार न करता मदत करावी लागेल असे सांगताना त्यांनी आपण योजना देताना काही भेदाभेद केला नाही.तुम्ही विकासाला साथ द्या.आमचे सरकार चोवीस तास काम करते.आमच्या पठ्ठ्या आशुतोष काळे हा आपल्याकडे कामे घेऊन येताना पहाटे पाचला येतो.आपणही यंत्रणेला सूचना दिलेली आहे.कोणाला अडवायचे नाही.त्यामुळे मंजूर बंधाऱ्याला ४१ कोटी देऊन टाकले आहे.आपण त्याचा बालहट्ट पूर्ण करतो.यापुढे आ.काळे यांचा शब्द पडू देणार नाही.कोपरगावात एकलव्य,महाराणा प्रताप स्मारक उभारण्यास मदत करणार ही जबाबदारी आपली आहे.आम्ही आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे नेते एकत्र बसल्यावर कोपरगाव विधानसभेचा उमेदवार ठरवू.पण तुमच्या मनातील माणसाला उमेदवार देऊ,मात्र थेट आ.काळे यांना उमेदवारी देण्याबाबत सूतोवाच केले नाही हे विशेष ! मात्र सिन्नर येथील संभेत मात्र त्यांनी थेट आ.माणिकराव कोकाटे यांचे नाव घेऊन घोषणा केली असल्याचे आढळून अल आहे.
दरम्यान त्यांनी राज्यातील वैनगंगा प्रकल्पाला मंजुरी दिल्याचे सांगून मराठवाडा आणि नगर – नाशिक जिल्ह्यासाठी वरदान ठरणाऱ्या वैतरणा आणि नारपारचे पश्चिमेचे पाणी देण्यास आपण मान्यता दिली त्यातून जायकवाडी,निळवंडे पाणी देणार असल्याचे सूतोवाच केले आहे.मात्र राज्यात केंद्रातील मोदी सरकारच्या विचाराचे सरकार राज्यात आणावे लागेल.आपण समान नागरी कायदा आणणार नाही.राज्यातील अल्पसंख्याक नागरिकांना अंतर देणार नाही,अन्य सर्व जाती पातींचे काम करणार आहे.मौलाना आझाद मंडल आणले आहे व अल्पसंख्यांकांना न्याय दिला आहे.आमचे सरकार आणण्यास विसरू नका.जेथे ज्या महायुतीचे उमेदवार निवडून द्या असे आवाहन केले आहे.शेवटी शेतकऱ्यांना आपण दिलासा दिलां असून त्यांचा कांदा निर्यात बंदी करणार नाही असे आश्वासन दिले आहे.

दरम्यान या सभेसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान महिलांनी संपूर्ण भरून गेल्याचे दिसून आले आहे.मात्र त्यातील बहुतांशी गर्दी ही ३००रुपये रोजंदारीची असल्याची चर्चा उपस्थित नागरिकांत व महिलांत दिसून आली आहे.त्यामुळे उलटसुलट चर्चा मतदार संघात रंगली आहे.
भाषणाच्या प्रारंभी अजित पवार यांनी आपल्या भाषणाला ५.४९ वाजता सुरुवात केली होती.त्यावेळी कार्यक्रमास उशीर झाल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त करून त्यांनी,”प्रभू रामचंद्र यांचे दंडकांरन्याच्या भुमिमुळे हे ठिकाण पवित्र झाले असल्याचे सांगितले आहे.
सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्तविक कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी केले त्यावेळी बोलताना म्हणाले की,”आपण अजित दादांचा लाडका मुलगा म्हणून काम करत आहे.मतदार संघासाठी ०३ हजार कोटींचा निधी दिला आहे.त्यांना आता राज्याचे मुख्यमंत्री करायचे आहे त्यासाठी काम करायचे आहे.पश्चिमेचे घाट माथ्याचे पाणी पूर्वेस कोपरगाव मतदार संघासाठी आणण्यासाठी अजित दादा न्याय देणार आहे.आपल्या मतदार संघातील विविध समस्यामुळे अजित पवारांना त्रास दिला त्याबद्दल माफी मागितली आहे.व आगामी काळात वीज,पाणी,रस्ते आदींचे प्रश्न सोडविण्यास मदत करण्याची मागणी केली.व मतदार संघातील एकलव्य,वीर राणा प्रताप यांचे स्मारक करण्याची मागणी केली आहे.मंजूर बंधारप्रश्न मार्गी लावला आहे.निविदा मार्गी लागणार आहे.क्रीडा संकुल मार्गी लावावे.