जाहिरात-9423439946
निवडणूक

माजी खा.लोखंडेचा आश्चर्यकारक ‘यु’ टर्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   शिर्डी लोकसभा निवडणुकीत आपला पराभव आपण मान्य केला असून यातून योग्य तो बोध घेत आपण आगामी काळातही जनतेच्या हितासाठी काम करत राहणार असल्याचे प्रतिपादन शिर्डी लोक सभा मतदार संघाचे शिवसेना शिंदे गटाचे माजी खा.सदाशिव लोखंडे यांनी नुकतेच केले आहे.मात्र काल स्थानिक नेत्यांवर केलेले आरोप त्यांनी टाळले असून काल केलेल्या आरआरोपांवर ‘यु’टर्न घेतला असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे त्यांचे वरिष्ठ पातळीवरून वरून कान उपटले असल्याचे बोलले जात आहे. 

  

“राज्यातील कांदा व दुध उत्पादक शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला,शेतमालाला कमी भाव मिळाला आदी कारणांचा शिर्डी लोकसभा मतदार संघात आपल्याला फटका बसला आहे”-माजी खा.सदाशिव लोखंडे,शिर्डी.

  शिर्डीत शिवसेना शिंदे गटाचे खा.सदाशिव लोखंडे यांच्यापेक्षा उद्धव सेनेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना उच्चांकी ०४ लाख ७६ हजार ९०० मते मिळाली असून यात त्यांचा खा.लोखंडेवर ५० हजार ५२९ मतांनी तर दक्षिणेत सामान्य गणले गेलेले आ.निलेश लंके यांनी ०६ लाख २४ हजार ७९७ मते मिळवत सुजय विखे यांच्यावर २८ हजार ९२९ मतांनी विजय संपादन केला आहे.यावर राज्यात व जिल्ह्यात पराभवाच्या कारणांची मीमांसा सुरू असताना आज माजी खा.सदाशीव लोखंडे यांनी,’हॉटेल शांती कमल’ येथे आपल्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती.त्यावेळी ते बोलत होते.

    सदर प्रसंगी आ.लहू कानडे,माजी आ.भाऊसाहेब कांबळे,अविनाश आदिक,बाजीराव दराडे,शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते,नितीन औताडे,सीताराम भांगरे,माजी जि.प.सदस्य जालिंदर वाकचौरे,जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे,महिला आघाडीच्या अध्यक्ष विमल पुंड,शेळके,नितीन कापसे,रावसाहेब थोरात,राजेन्द्र सोनवणे,कावेरी नवले,मीनाक्षी वाकचौरे,रमेश काळे,संजय वाकचौरे,रामनाथ रहाणे,रणजित ढेरांगे,आदी भगीरथ होन,आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

    यावेळी पुढे बोलताना माजी खा.लोखंडे म्हणाले की,”निवडणुकीत जय पराजय ठरलेला असतो आपण अनेकदा आमदारकी व खासदारकीचा विजय बघीतला आहे कार्यकर्त्यांनी पराभवाने खचून न जाता या पुढील काळात देखील शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जनतेला न्याय देण्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहण्याचा संकल्प देखील जाहीर केला खा.भाऊसाहेब वाकचौरे हे विजयी झाले आहेत त्यांना भविष्यातील कामासाठी आमच्या नेहमीच शुभेच्छा राहतील त्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील असलेले विविध प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
   दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की,”त्यांनी कांदा,दूध उत्पादक शेतकरी,शेतमालाला कमी भाव आदी कारणे महत्वाची ठरली असल्याची कबुली त्यांनी प्रामाणिकपणे दिली आहे.


   सदर प्रसंगी काल त्यांनी स्थानिक नेत्यांवर आरोप करून त्यांच्या पाडपाडीच्या राजकारणात आपला बळी घेतला असल्याचा गंभीर आरोप केला होता.मात्र आज पत्रकार परिषदेत पत्रकारांनी त्यांना स्थानिक नेत्यांच्या असहकार्याबद्दल फिरून फिरून प्रश्न विचारूनही त्यांनी स्वतःला सावरून काळे,कोल्हे,विखे आदींवर घसरण्याचे टाळले असल्याचे दिसून आले आहे.व महसूल मंत्री विखे,आ.आशुतोष काळे,माजी स्नेहलता कोल्हे आ.किरण लहामटे,माजी मुरकुटे आदींवर आरोप टाळला असून स्वतःकडे आरोपाचे बोट करून स्वतःला सावरून घेतले असल्याने आगामी काळात (श्रीरामपूर विधानसभा डोळ्यासमोर ठेवून) राजकीय अडचणी लक्षात आल्या असाव्या अशी शक्यता वर्तवली जात आहे.

   दरम्यान पुढे बोलताना त्यांनी,”आपण या पराभवांना जराही खचलेलो नाही कालही जनतेचे काम प्रामाणिक केले आणि ह्यापुढेही प्रामाणिकपणे जनतेचे काम करत राहाणार आहोत आपण पडल्याचा दुःख नसून देशात नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होत आहेत याचाच आम्हाला आनंद आहे जनतेने मला भरभरून प्रेम व आशीर्वाद दिला आहे.आपण पदावर असलो कि नसलो तरी जनतेची सेवा करत राहाणार आहे.या निवडणुकीत कोणतीही राजकारण झालं नसून महायुतीच्या सर्व नेत्यांनी मनापासून काम केलं आहे तर पराभव आणि विजय ही आपण अनेकदा अनुभवला असून त्यामुळे कार्यकर्त्यांनी ह्या पुढील काळात एक संघ एक विचाराने विविध प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन आपण काम करत राहणार असल्याचे शेवटी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close