जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

वाळूचोरांची जीवे मारण्याची धमकी,९ जणांविरुद्ध गुन्हा

जाहिरात-9423439946

यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


  “आमच्या वाळू चोरीची माहिती दिली त्यामुळे आमची वाहने पकडली जात असून आमच्या पॉइंटवर तहसीलदार यांनी तलाठी यांची नेमणूक केली” असल्याचा आरोप करून वाळूचोर इसम आप्पा अर्जुन दवंगे आणि अन्य आठ जणांनी आपल्या आई-वडिल आणि आपल्याला शिवीगाळ,धक्काबुक्की करून,”आमच्या नादी लागू नका नाही तर तुम्हाला जीवे ठार मारु अशी धमकी दिली असल्याचा गुन्हा फिर्यादी तुषार उर्फ भैय्या शांताराम दवंगे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.त्यामुळे मळेगाव थडी आणि परिसरात शेतकऱ्यांत खळबळ उडाली आहे.

  

राज्यातील वाळू लिलाव व बेकायदा वाळू उपसा यामागील राजकारण व गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने नवे वाळू धोरण राबवले असले तरी त्यातून काहीही साध्य झालेलं दिसत नाही उलट गुन्हेगारी वाढली असल्याचे दिसून येत आहे.अशीच घटना नुकतीच रवंदे येथे उघडकीस आली आहे.या प्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  राज्यातील वाळू लिलाव व बेकायदा वाळू उपसा यामागील राजकारण व गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने नवे वाळू धोरण गतवर्षी दि.०१ मे २०२३ पासून हाती घेतले होते.त्याची अंमलबजावणी होण्यास काही महिने लागले ती काही महिने झाले नाही तोच सरकारने आचारसंहिता लागण्या आधी वाळूचे दर बेसुमाररित्या वाढवले असून आत अधिकृत वाळू जवळपास ४ हजार ५०० रुपया पर्यंत पोहचली आहे.यात सामान्य माणसाला सलवतीच्या दरात वाळू मिळण्याचे स्वप्न हे दिवास्वप्न ठरले आहे.त्यात लाभार्थ्यांच्या ऐवजी संबंधित मंत्री आणि महसुली अधिकाऱ्यांची चांदी झाल्याचे दुर्दैवाने नागरिकांना पाहायला मिळाले आहे.व सहाशे रुपये दराची वाळू हि दिवास्वप्न ठरले असल्याने नागरिकांत मोठी नाराजी आहे.त्यामुळे स्वाभाविकच चोरट्या वाळूस चंद्रबळ मिळाल्याचे दिसून येत आहे.कोपरगाव,राहाता तालुका त्यास अपवाद नाही.त्यामुळे वाळू डेपो आणि उपसा केंद्राच्या ठिकाणी चोरटी वाळू मोठ्या प्रमाणावर होत आहे.त्यासंबंधी सुरेगाव,सांगवी परिसरातील शेतकऱ्यांनी अनेक वेळा ही वाळू बंद करण्याची अनेकवेळा निवेदने आणि लेखी इशारे देऊनही कोणताही परिणाम झालेला नाही.उलट वाळू चोरी मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचे दिसून येत असून यातून वाळू चोरांचे चंद्र बळ आणखी वाढले असल्याचे दिसून येत आहे.अशीच घटना नुकतीच मळेगाव थडी शिवारात नुकतीच उघडकीस आली आहे.
   यातील फिर्यादी इसम तुषार दवंगे हे दि.०३ मे रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास मालेगाव येथून आपल्या मळेगाव थडी येथील घरी येत असतांना रवंदा चौकात तुषार दवंगे यांच्या ओळखीचा आरोपी आप्पा अर्जुन दवंगे,बाबासाहेब रामदास खोंड,भाऊराव वामन,विशाल अशोक खोंड,वाल्मिक राजगुरू सर्व रा.मळेगाव थडी,या शिवाय हरी कोळपे रा.कोळपेवाडी व इतर दोन अनोळखी इसम आदी उभे होते.आपण घरी जात असताना त्यांनी आपल्याला पाहिले व ओळखले त्यांनतर त्यांनी आपल्याला त्यांनी हाक मारली व बोलवून घेतले होते.व “तुझ्या आई वडिलांना फोन कर व बोलावून घे” अस सांगीतले होते.त्यानुसार आपण आपल्या आई वडिलांना बोलावून घेतले होते.दरम्यान त्यातील आरोपी आप्पा दवंगे,बाबासाहेब खोंड व हरी कोळपे यांनी आपल्या वडिलांना धक्का बुक्की करण्यास सुरुवात केली.त्यामुळे आपण त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपल्याला लोटून दिले होते.व ते आपल्याला म्हणाले की,”तुझ्या आई वडिलांनी तहसील कार्यालय येथे माहिती दिल्याने मळेगाव थडी येथे तलाठी यांच्या ड्युट्या  लागल्या आहेत.त्यामुळे आमचा धंदा होईना असे म्हणून हरी कोळपे याने पुन्हा,”हा माझा पॉईंट आहे.असे म्हणून शिवीगाळ करून धक्काबुक्की केली व आम्हाला,”आमच्या नादी लागू नका नाही तर तुम्हाला जीवे ठार मारिन” अशी धमकी व त्या ठिकाणाहून निघून गेले आहे.

    दरम्यान फिर्यादी यांनी तुषार दवंगे यांनी या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्र.२१४/२०२४ भा.द.वि.कलम.१४३,३२३,५०४,५०६ प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.संदीप बोटे हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close