जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

…इतक्या ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

लोकसभा निवडणुकीत ८५ वयापेक्षा अधिक वय असलेले ज्येष्ठ नागरिक व ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग असलेली व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नये यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने होम वोटिंगची सुविधा उपलब्ध करून दिली. ७ मे ते ९ मे दरम्यान राबविण्यात आलेल्या गृह मतदानात शिर्डी लोकसभा मतदारसंघात ६५० मतदारांनी मतदान केले.

शिर्डी लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदारसंघ अकोले – १३२, संगमनेर – १०२, शिर्डी – ११३, कोपरगाव – १११, श्रीरामपूर – ९६ व नेवासा -९६ असा ६५० मतदारांनी होम वोटींगद्वारे मतदानाचा हक्क बजावला आहे.

  १८ एप्रिल ते २३ एप्रिल दरम्यान शिर्डी लोकसभेत होम वोटिंगसाठी ७०० मतदारांनी बीएलओकडे अर्ज केले होते. पहिल्या दिवशी ३०७ ज्येष्ठ नागरिक व ५७ दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.  दुसऱ्या दिवशी   २४३ ज्येष्ठ नागरिक व ३९ दिव्यांग मतदारांनी मतदानांचा हक्क बजावला.आजच्या तिसऱ्या दिवशी ४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान न झालेल्या ५० मतदारांपैकी १८ मतदार मयत आहेत‌. २२ मतदार घरी आढळून आले नाहीत. यातील बहुतेक मतदार रूग्णालयात दाखल आहेत‌. १० मतदारांनी मतदान करण्यास नकार दिला.

  शिर्डी लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदारसंघ अकोले – १३२, संगमनेर – १०२, शिर्डी – ११३, कोपरगाव – १११, श्रीरामपूर – ९६ व नेवासा -९६ असा ६५० मतदारांनी होम वोटींगद्वारे मतदानाचा हक्क बजावला.होम वोटिंगसाठी मतदारांच्या घरी प्रत्यक्ष बूथ उभारण्यात आला होता. यासाठी पोलीस, दोन निवडणूक अधिकारी, सूक्ष्म निरीक्षक व कॅमेरामन अशी टीमची नियुक्ती करण्यात आली होती. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली आहे ‌.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close