जाहिरात-9423439946
निवडणूक

निळवंडेच्या चाऱ्या करण्यासाठी प्रयत्न करणार-…या उमेदवाराचे आश्वासन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   शिर्डी लोकसभा मतदार संघातील १८२ दुष्काळी गावांना निळवंडे धरणाचे पाणी देण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या उपकालवे व चाऱ्या करण्यासाठी व पश्चिम घाट माथ्याचे पाणी देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे आश्वासन महाआघाडीचे उमेदवार व माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी रांजणगाव देशमुख व वेस येथील प्रचाराचा शुभारंभ करताना दिले आहे.

   

दरम्यान कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील नियोजित कार्यक्रमाआधी वेस-सोयगाव येथील हनुमान मंदिरात माजी खा.वाकचौरे यांना मतदारांनी अडवून त्या ठिकाणी प्रचाराचा नारळ शुभारंभ केला आहे.मात्र त्या ठिकाणी ग्रामस्थानीं स्वयंस्फूर्तीने झोळी फिरवून आर्थिक मदतीने आवाहन केले त्याला मतदारांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.त्याचीच पुनरावृति रांजणगाव देशमुख येथेही झाल्याची पाहायला मिळाली आहे.या उपक्रमाचे सर्वत्र कोतुक होत आहे.

  शिर्डी लोकसभा मतदार संघाचे महाघाडीचे उमेदवार माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचे नामनिर्देशन माजी मंत्री आदित्य ठाकरे,माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,आ.लहू कानडे,आ.शंकरराव गडाख आदींच्या प्रमुख उपस्थित भरल्यानंतर पहिल्याच दिवशी प्रचाराचा नारळ कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख व वेस येथील हनुमान मंदिरात फोडण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

कोपरगाव तालुक्यातील वेस-सोयगाव येथील मतदारांनी महाआघाडीचे उमेदवार माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या लोकवर्गणीसाठी झोळी फिरवली त्यावेळचे छायाचित्र.

   सदर प्रसंगी सेनेचे माजी तालुका उपाध्यक्ष गंगाधर रहाणे,संजय गुंजाळ,कौसर सय्यद,गोपीनाथ घोरपडे,गंगाधर गमे,राजेंद्र निर्मळ,ज्ञानेश्वर वर्पे,रंगनाथ गव्हाणे,ऍड.रमेश गव्हाणे,सुधाकर गाढवे,उत्तमराव घोरपडे,रवींद्र वर्पे,कैलास गव्हाणे,महेंद्र सोनवणे,बाळासाहेब सोनवणे,नरहरी पाचोरे,आप्पासाहेब कोल्हे,सुधाकर गाढवे,प्रवीण कोल्हे,मोहंमद इनामदार,दशरथ पाडेकर,हौशीराम पाडेकर,विलास कोल्हे,दत्तात्रय कोल्हे,भानुदास कोल्हे,विजय गोर्डे,सुनील कोल्हे,अभिजित कोल्हे,सतीश म्हाळसकर,देवचंद खामकर,जालिंदर बडे,नामदेव म्हाळसकर,काशिनाथ पाडेकर,शकील इनामदार,शाहरुख सय्यद,राजू इनामदार,गनिभाई सय्यद,राजेंद्र कोल्हे,गणेश कोल्हे,रमजानस सय्यद,रामदास भडांगे आदीसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील मतदारांनी महाआघाडीचे उमेदवार माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या लोकवर्गणीसाठी झोळी फिरवली त्यावेळचे छायाचित्र.

   त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”निळवंडे प्रकल्प हा जवळपास ५४ वर्षांचा झाला असून शेतकऱ्यांना न्याय मिळणे गरजेचे होते.मात्र आपल्या काळात सन-२०१४ पर्यंत आपण या प्रकल्पाच्या अत्यंत किचकट समजल्या जाणाऱ्या केंद्रिय जल आयोगाच्या १७ पैकी १४ मान्यता मिळवून दिल्या होत्या.उर्वरित तीन मान्यता अप्राप्त होत्या.त्यासाठी निळवंडे कालवा कृती समितीने उच्च न्यायालयात धाव घेऊन त्या मिळवून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मोठे प्रयत्न केले हे नाकारता येणार नाही.आगामी काळात पोट कालवे व चाऱ्या पूर्ण करणे हे आपले ध्येय आहे.त्या साठी आपण जीवाचे रान करू असे त्यांनी आश्वासीत केले आहे. व या भागातील काकडी विमानतळामुळे या भागाचा विकास होणार आहे.या परिसरातून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग,सुरत-हैद्राबाद आदी राष्ट्रीय महामार्ग गेल्याने हा भाग जगाच्या नकाशावर आला आहे.आगामी काळात या ठिकाणी कार्गो हब होऊ शकते,त्यासाठी आपण प्रयत्न करू.मात्र या भागातील शेतकऱ्यांनी जमिनी विकण्याची चूक करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.जमिनी घेणे शेतकऱ्यांना आगामी काळात शक्य होणार नाही याची जाणीव ठेवून या भागातील तरुणांनी आयात निर्यात व्यवसायात संधी शोधाव्या असे आवाहन शेवटी केले आहे.व आपले निवडणूक चिन्ह ‘मशाल’ असल्याचे सांगून आगामी १३ मे रोजी मते देण्याचे आवाहन केले आहे.

   दरम्यान रांजणगाव देशमुख येथील नियोजित कार्यक्रमाआधी वेस-सोयगाव येथील हनुमान मंदिरात माजी खा.वाकचौरे यांना नागरिकांनी अडवून त्या ठिकाणी प्रचाराचा नारळ शुभारंभ केला आहे.मात्र त्या ठिकाणी ग्रामस्थानीं स्वयंस्फूर्तीने झोळी फिरवून आर्थिक मदतीने आवाहन केले त्याला मतदारांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.त्याचीच पुनरावृति रांजणगाव देशमुख येथेही झाल्याची पाहायला मिळाली आहे.त्यामुळे ग्रामस्थांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

  सदर प्रसंगी प्रास्तविक गंगाधर रहाणे यांनी केले तर उपस्थितांना मार्गदर्शन निळवंडे समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे,पाटपाणी समितीचे उपाध्यक्ष उत्तमराव घोरपडे,रंगनाथ गव्हाणे,अप्पासाहेब कोल्हे,सुधाकर गाढवे आदींनी केले तर सूत्रसंचालन कैलास गव्हाणे यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार विजय गोर्डे यांनी मानले आहे.सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी रवींद्र वर्पे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मेहनत घेतली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close