वन व पर्यावरण
…या गावात आपल्या सहकाऱ्यांच्या स्मरणार्थ वृक्ष लागवड

न्युजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील शहापूर ग्रामपंचायत हद्दीत एका अपघातात आपला जीव गमावलेले सहकारी स्व.कार्तिक शरद पाचोरे व अक्षय बाबासाहेब पाचोरे यांच्या स्मरणार्थ स्मशानभूमी परिसरात वृक्ष लागवड केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.या बाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी जंगल गरजेचे आहे.अलिकडच्या काळात जंगल निर्मिती शक्य नसली तरी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करता येते.यातून दुष्काळावर मात करणे शक्य आहे.जवळके ग्रामपंचायतीने वीस वर्षापूर्वी दुष्काळी परिसरात रस्त्याच्या दुतर्फा एक लाखाहून अधिक अशी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली होती.अंजनापूर ग्रामपंचायतीत हा प्रयोग राबवला गेला आहे.त्यामुळे दुष्काळी भाग बहरून आला आहे.आगामी काळात ही वृक्ष लागवड वाढवणे गरजेचे बनले आहे.आता शहापूर येथील तरुणांनी यात पुढाकार घेतला आहे.त्यांनी आपले सहकारी कार्तिक शरद पाचोरे व अक्षय बाबासाहेब पाचोरे यांचे मागील वर्षी एका अपघातात निधन झाल्याने त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ ही वृक्ष लागवड केली आहे.

सदर प्रसंगी बापू डांगे,शरद घारे,प्रमोद रामनाथ पाचोरे,नितीन घारे,संकेत पाचोरे,ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रेय परसराम पाचोरे,सागर भास्कर घारे,भाऊसाहेब घारे,शरद पाचोरे,प्रविण घारे,दत्तात्रय सूर्यभान पाचोरे,पुंजाहारी घारे,सचिन नवनाथ पाचोरे,नितीन पाचोरे आदी मान्यवर उपस्थित होते.त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.