जलसंपदा विभाग
पश्चिमेचे पाणी नगर जिल्ह्यासाठी मृगजळ !

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
गोदावरी खोऱ्यातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी आता अनेकांनी पश्चिमेचे पाणी पूर्वेस वळविण्याचा मंत्र बनवला असून तो किती कचकड्याचा आहे याचे वास्तव उघड झाले असून त्याचा वास्तविक जीवनात कुठलाही संबंध नसल्याचे नाशिक उत्तर विभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या शेतकऱ्यांच्या एका भेटीत उघड झाले आहे.त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील हे साधारण २६ जुलै २०२० मध्ये राहुरी दौऱ्यावर होते.त्यावेळी निळवंडे कालवा कृती समितीस या बैठकीचे माजी खा.प्रसाद तनपुरे यांनी समितीच्या कार्यकर्त्याना निमंत्रण दिले होते.त्यावेळी माजी खा.प्रसाद तनपुरे यांनी त्या ठिकाणी आपल्या वाड्यावर दोन विषयाला हात घातला होता.त्यातील पहिला विषय निळवंडे कालव्यांना निधी देण्या विषयीचा होता.तर दुसरा होता.पश्चिम घाटमाथ्यावरील पाणी पूर्वेस वळविण्याचा होता.तुमच्या जलसंपदा मंत्री पदाच्या कालखंडात आमचे नगर जिल्ह्याचे दोन प्रश्न गत पाच-सहा दशके प्रलंबित असून ते तुम्ही सोडावे अशी गळ म्हणण्यापेक्षा अधिकार वाणीने माजी खा.तनपुरे यांनी सांगितले होते.आणि या प्रश्नास वाचा फुटली हे वेगळे सांगणे न लगे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यासह पर्जन्यछायेतील चाळीसगाव तालुक्यापासून सोलापूर जिल्ह्यातील अकलूज या तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील पर्वतरांगापासून पूर्व बाजूस शंभर कि.मी.अंतरापर्यंत हा भाग हजारो वर्षांपासून दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात होता.त्यावर इंग्रज राजवट आल्यावर या भागात मोठ्या प्रमाणावर भूकबळी होत होते.त्यामुळे हा मुत्युदर असाच सुरु राहिला तर लवकरच केवळ पडक्या भिंतीवर राज्य करावे लागेल अथवा या भागात लवकरच बंडाळी होऊन सरकार चालवणे शक्य होणार नाही याची जाणीव सरकारला झाली होती.म्हणून त्या काळी या भागात शेती सिंचनाचे पाणी फिरविण्यासाठी इंग्रज राजवटीने याभागात धरणे बांधण्यासाठी सर्व्हेक्षण केले होते.त्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी पडणाऱ्या नाशिक जिल्ह्यात धरणे बांधण्याचा निर्णय घेतला होता.त्यातून दारणा,भंडारदरा,नीरा,खडकवासला,आदी धरणाची निर्मिती झाली व पूर्व बाजूस शेती सिंचनासाठी जवळपास १०० कि.मी.कालवे काढून या भागातील कृषि जीवन स्थिरस्थावर केले होते.आज शंभर वर्षांनी मागे वळून पाहताना काय दिसते तर आगामी कालखंडातील राजकीय नेत्यांनी इंग्रजांनी निर्माण केलेले शेती सिंचनाचे पाणी उद्योग आणि महापालिकांना खिरापतीसारखे वाटून दिले आहे.त्यामुळे शेती सिंचनाचा प्रश्न गंभीर झाला आहे.त्यासाठी अनेक दशके शेतकऱ्यांनी येथील राजकीय व्यवस्थेवर विश्वास ठेऊन कसा स्वतःचा विश्वासघात करून घेतला आहे.हे सिद्ध झाले आहे.त्यामुळे या राजकीय व्यवस्थेवरील शेतकऱ्यांचा विश्वास उडाला आहे.
समर्थ रामदास स्वामी आपल्या दासबोधात ‘मूर्ख’ माणसाचे लक्षणे सांगताना म्हणतात,”
आपली आपण करी स्तुती । स्वदेशीं भोगी विपत्ति ।
सांगे वडिलांची कीर्ती । तो येक मूर्ख!!
आजही वर्तमानात काही युवराज आपल्या (वडिलांचे नव्हे) आजोबाचे पराक्रम सांगून आपल्या सत्तेची पोळी भाजू पाहत आहे.ती किती हास्यास्पद आहे हे गावोगावचे शेतकरी उलटसुलट चर्चा करून त्यास वाचा फोडत आहे.
यातूनच काही शेतकऱ्यांनी जलसंपदाच्या उत्तर विभागाचे जलसंपदाचे मुख्यअभियंता ड़ॉ.संजय बेलसरे,नाशिक जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे आदींची भेट घेतली आहे.व नगर जिल्ह्यातील ऊर्ध्व गोदावरी कालव्यांचे पाणी पुनर्स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.व त्यासाठी आयुधे गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यासाठी शिवसेनेचे तारोडी संपर्क प्रमुख व कोपरगाव तालुका सेनेचे नेते प्रवीण शिंदे,मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे,तरुण कार्यकर्ते तुषार विध्वंस आदींनी उपस्थित होते.
त्यावेळी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून वर्तमानात सह्याद्रीच्या घाट माथ्यावरील पश्चिमेस जाणारे पाणी पूर्वेस आणण्यासाठी सारेच राजकीय नेते चर्चा करताना दिसत आहे.मात्र याची सुरुवात मात्र आजपर्यंत कोणीही करू शकले नाही.केवळ निवडणुका पाहून लोकप्रिय घोषणा करण्यापलीकडे कोणीही काही केल्याचे दिसून आले नाही हे वास्तव आहे.
कोपरगाव येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला अनेक धक्कादायक माहिती मिळाली आहे.त्यात पश्चिमेचे पाणी जरी पूर्वेस मिळणार असले तरी त्या प्रकल्प अहवालात उत्तर नगर जिल्ह्यातील कोणाही नेत्याने व लोकप्रतिनिधीने या बाबत अद्याप मागणीच केलेली नाही हे विशेष !आणखी एक बाब पुढे आली आहे.ती अशी की,नाशिक जलसंपदा विभागात बहुतांशी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत.त्याजागी नवीन कर्मचारी भरती होत नाही तो पर्यंत वितरण व्यवस्था सुधारणे कठीण दिसत असल्याची हताशता दिसून आली आहे.
मात्र राज्याच्या जलसंपदा विभागाची धुरा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या हाती आली आणि त्यांनी या विषयाला हात घातला हे किती जणांना माहिती आहे.त्यासाठी कारण बनले माजी खा.प्रसाद तनपुरे यांनी निर्णायक भूमिका निभावली आहे.हे सूर्य प्रकाशा इतके स्वच्छ आहे.अडीच वर्षा पूर्वी ना.जयंत पाटील हे साधारण २६ जुलै २०२० मध्ये राहुरी दौऱ्यावर होते.त्यावेळी निळवंडे कालवा कृती समितीस या बैठकीचे माजी खा.प्रसाद तनपुरे यांनी निळवंडे कालव्यांच्या निधीचा प्रश्न सोडविण्याचा उद्देशाने आमच्या प्रतिनिधीसह निळवंडे कालवा समितीच्या कार्यकर्त्याना निमंत्रण दिले होते.त्यावेळी माजी खा.प्रसाद तनपुरे यांनी त्या ठिकाणी आपल्या वाड्यावर दोन विषयाला हात घातला होता.त्यातील पहिला विषय निळवंडे कालव्यांना निधी देण्या विषयीचा होता.तर दुसरा होता.पश्चिम घाटमाथ्यावरील पाणी पूर्वेस वळविण्याचा होता.तुमच्या जलसंपदा मंत्री पदाच्या कालखंडात आमचे नगर जिल्ह्याचे दोन प्रश्न गत पाच-सहा दशके प्रलंबित असून ते तुम्ही सोडावे अशी गळ म्हणण्यापेक्षा अधिकार वाणीने माजी खा.तनपुरे यांनी सांगितले होते.जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे प्रथम राष्ट्रवादीचे संस्थापक नेते खा.शरद पवार यांचा शब्द प्रमाण मानतात आणि त्या पाठोपाठ ते त्यांचे मेहुणे माजी खा.प्रसाद तनपुरे यांचा शब्द अंतिम समजतात हे बऱ्याच जणांना माहिती आहे.आणि झालेही तसेच.
त्या नंतर त्यांनी अल्पावधीतच त्यांनी घोटी इगतपुरी येथील पश्चिमेचे पाणी वळविण्याच्या ठिकांना भेट देऊन त्याची तातडीची बैठक मुंबई वरून येतानाच नाशिक येथे जलसंपदाच्या उत्तर विभागीय कार्यालयात बैठक घेऊन हा प्रश्न धसास लावण्यासाठी घेतली होती.व नाशिक येथे त्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता.व त्याची जबाबदारी हि मुख्य अभियंता यांच्या खांद्यावर दिली होती.व त्यासाठी त्यांच्याच कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच फलक लावला होता.आता हे कार्यालय स्वतंत्र झाले आहे.हे बऱ्याच जणांना माहिती नाही.व माजी खा.तनपुरे यांनी व स्वतः जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही त्याचा गवगवा केला नाही.नाही त्यांना त्याची उत्तर नगर जिल्ह्यातील पुढाऱ्यासारखी कधी गरज वाटली नाही.असो !
दरम्यान सदर बैठकीत कोपरगाव येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला अनेक धक्कादायक माहिती मिळाली आहे.त्यात पश्चिमेचे पाणी जरी पूर्वेस मिळणार असले तरी त्या प्रकल्प अहवालात उत्तर नगर जिल्ह्यातील कोणाही नेत्याने व लोकप्रतिनिधीने या बाबत अद्याप मागणीच केलेली नाही हे विशेष !आणखी एक बाब पुढे अली आहे.ती अशी की,नाशिक जलसंपदा विभागात बहुतांशी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत.त्याजागी नवीन कर्मचारी भरती होत नाही तो पर्यंत वितरण व्यवस्था सुधारणे कठीण दिसत असल्याची हताशता दिसून आली आहे.
मेंढेगिरी आयोगाच्या अहवाला प्रमाणे जर जायकवाडी जर ६५ टक्के भरले नाही.आणि वरील नगर-नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाणी वरून सोडून दिले.तर वरील धरण आणि त्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना कसा न्याय देणार ? या वर तशी व्यवस्थाच यात नसल्याचे धक्कादायक उत्तर मिळाले आहे.यात वाचकांचे लक्ष वेधून घेऊन इच्छितो की,ज्या वेळी हा समन्यायी कायदा मंजूर झाला त्या वेळी जे आक्षेप नोंदविण्याची गरज होती.त्या पातळीवर कोपरगाव व राहाता संगमनेर तालुक्यातील किंबहुना नगर जिल्ह्यातील नेते नापास आहेत.
या वेळी आमच्या प्रतिनिधीने जलसंपदा विभाग तर हे पाणी मराठवाड्यातील जिल्ह्यांना देणार असल्याच्या बातम्यांकडे लक्ष वेधले असता त्यांनी त्यास हसत सकारात्मक होकारार्थी उत्तर दिले आहे.त्यामुळे उद्या ते मराठवाड्यातील परभणी आणि जालना जिल्ह्यास गेले तर मुळीच आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.कारण या पातळीवर नगर जिल्ह्यातील नेत्यांची पाटी कोरी आहे.केवळ आपल्या निवडणुका काढण्याचा जा फंडा आहे हे या निमित्ताने सिद्ध झाले आहे.
या शिवाय समन्यायी बाबत विचारणा करताना आधी मराठवाडा दुष्काळी की पर्जन्य छायेतील तालुके याबाबत त्यांनी पर्जन्य छायेतील तालुके हे उत्तर दिले असले तरी त्या पातळीवर अग्रहक्क कोणाला दयायला हवा.त्यात अर्थातच पर्जन्य छायेतील तालुक्यांना असे उत्तर आले आहे.मात्र वस्तुस्थिती समन्यायीच्या अहवालात मात्र या उलट आहे.अग्रहक्क हा मराठवाड्याचा आहे.या शिवाय मेंढेगिरी आयोगाच्या अहवाला प्रमाणे जर जायकवाडी जर ६५ टक्के भरले नाही.आणि वरील नगर-नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाणी वरून सोडून दिले.तर वरील धरण आणि त्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना कसा न्याय देणार ? याच आयोगाच्या अहवालात अट क्रं.दोन मध्ये जायकवाडी पस्तीस टक्के झाले तर नगर-नाशिक अर्थात ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात खरीप पिकांना पाणी देता येत असताना वरिष्ठ अधिकारी सविस्तर पणे कानाडोळा करून या मागणीकडे दुर्लक्ष करतात व राजकीय नेते त्यांच्या होत हो मिसळतात हे सर्व धक्कादायक आहे.
दरम्यान यात वाचकांचे लक्ष वेधून घेऊन इच्छितो की,ज्या वेळी हा समन्यायी कायदा मंजूर झाला त्या वेळी जे आक्षेप नोंदविण्याची गरज होती.त्या पातळीवर कोपरगाव व राहाता संगमनेर तालुक्यातील किंबहुना नगर जिल्ह्यातील नेते नापास आहेत.त्यांनी या वेळी सभागृहात कोणतेही आक्षेप नोंदवले नाहीत.तसे ते असतील तर त्यांनी जाहीर करणे लोकहितासाठी कधीही उत्तम.मात्र असे धाडस करण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.
पूर्वी जेव्हा इंग्रज राजवटीच्या कालखंडात धरण व्यवस्था निर्माण झाली नव्हती त्या वेळी कोपरगाव,निफाड,राहाता श्रीरामपूर भागातील किंबहुना पर्जन्य छायेतील शेतकरी हे खान्देश व मराठवाड्यात कापूस वेचण्यास व ऊसाचे गुऱ्हाळावर ‘गुळे’ म्हणून मजुरीने जात असत.आता याबाबत या भागातील शेतकरी जागृत होत आहे हे भविष्य घडविण्यासाठी उत्तम म्हटले पाहिजे.उत्तर नगर जिल्ह्यातील नेत्यांवर,”जो विसंबला त्याचा कार्यभाग संपला” असे म्हणण्याचा अनास्था प्रसंग आगामी काळात येऊ शकतो.त्यामुळे वर्तमानात तरी पश्चिमेचे पाणी हे नगर जिल्ह्यासाठी मृगजळ ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.