जलसंपदा विभाग
निळवंडे पाणी वितरण व्यवस्था प्रगतीपथावर…!

न्यूजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
उत्तर नगर व नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या मुख्य कालव्यांवरील उर्वरील संपूर्ण ६३ हजार १८१ हे. लाभक्षेत्र वितरण प्रणालीचे क्षेत्र पाईप लाइन वितरण (पी.डी.एन.)द्वारे सिंचनाखाली आणणे करिता ऑक्टोबर २०२४ मध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आलेले असून काम कार्यक्षेत्रावर प्रगतीत आहे.सद्यस्थितीत डाव्या कालवा तळेगाव शाखा कालव्यावरील बंद नलिका वितरण प्रणालीचे १३ हजार ८६४.८९ हे.क्षेत्रापैकी १० हजार २९५.१७ हे क्षेत्राचे संकल्पन मंजूर असून कार्यक्षेत्रावर कामे प्रगतीत असून संगमनेर तालुक्यातील चिंचोली गावातील वंचित क्षेत्र पाण्याखाली आणण्यासाठी कालवा कृती प्रयत्न सुरू असल्याची माहिती निळवंडे कालवा कृती समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊसाहेब सोनवणे यांनी दिली आहे.

दरम्यान या माहितीत मात्र निळवंडे धरणाचे पाणी दुष्काळी १८२ गावांना पिण्याचे पाण्यासाठी आरक्षण देण्याबाबत मागणी केली होती.मात्र त्याला त्यांनी बगल दिली असून सह्यादी पर्वताच्या पश्चिम घाट माथ्याचे पाणी अरबी समुद्राला जात असून ते पाणी वळविण्यासाठी मागणी केली होती.त्याची माहिती नंतर देतो असे सांगितले आहे.अद्याप १०-१५ गावे पूर पाण्यासाठी वंचित असल्याची बाब त्यांचे लक्षात आणून दिली आहे.
निळवंडे कालवा कृती समितीने उत्तर नगरसह नाशिक जिल्ह्यातील ०७ तालुक्यातील दुष्काळी १८२ गावांना निळवंडे धरणाचे प्रस्तावित पाणी मिळण्यासाठी रस्त्यावरील लढा सूर केलाच पण केंद्रीय जप आयोगाकडून १४ मान्यता मिळवल्या होत्या तर उर्वरित मान्यतेसाठी औरंगाबाद उच्च न्यायालयात पत्रकार नानासाहेब जवरे,रूपेंद्र काले आदींनी दुष्काळी शेतकऱ्यांना एकत्र करून कालवा कृती समितीच्या वतीने व शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ॲड.अजित काळे यांच्या विधी सहाय्याने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.त्यातून औरंगाबाद उच्च न्यायालयाने सन-२०१९ साली सदर कालव्याचे काम ऑक्टोबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.ते मुदत वाढवून व जलसंपदाचे आर्थिक अधिकार गोठवून अखेर दि.३१ मे २०२३ रोजी निळवंडे लाभक्षेत्रातील बहुतांशी गावांना निळवंडे धरणाचे पाणी सोडण्यात आले.येथील पाझर तलाव,कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरले जात आहे.मात्र जवळके,अंजनापूर,बहादरपूर,धोंडेवाडी,बहादराबाद,शहापूर आदी गावांना तीन वर्षे उलटूनही पाणी मिळालेले नाही.तर संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव गावातील पश्चिमेचा भागातील ३०३.०९९ क्षेत्र वगळले आहे.त्यामुळे या प्रकल्पाची वस्तुस्थिती समोर येण्यासाठी निळवंडे कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे यांनी नुकतीच जलसंपदा विभागाच्या घुलेवाडी संगमनेर येथील कार्यालयाकडे वर्तमानात कामाबाबद माहिती विचारणा केली होती.त्यात ही माहिती उघड झाली आहे.

“संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव गावाचे एकूण ७९५.६७ हेक्टर सिंचन क्षेत्रापैकी ग्रॅव्हिटी बंधिस्त नलिकाद्वारे सिंचन न होणारे ३०३.०९९ हे. क्षेत्र राहते.सदर उर्वरित ३०३.०९९ हे क्षेत्रास तळेगाव शाखा,कालव्यावरून उपसा करून सिंचन निर्मिती करणे बाबतचा प्रस्तावास शासनाची मान्यता मिळणेबाबतचा प्रस्ताव विभागीय स्तरावर प्रगतीत असल्याची माहिती यात मिळाली आहे”-प्रकाश सोनवणे,कार्यकर्ते,चिंचोली गुरव,तालुका संगमनेर.
सदर माहितीत धरण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे यांनी पुढे म्हटले आहे की,”उर्ध्व प्रवरा प्रकल्प हा मोठा पाटबंधारे प्रकल्प असून मौजे निळवंडे,ता.अकोले,जि.अहिल्यानगर येथे प्रवरा नदीवर बांधण्यात आलेला असून धरणाचा एकुण २३६.०० द.ल.घ.मी.(८.३२ टी.एम.सी.) पाणीसाठा निर्मिती झाली आहे.प्रकल्पाला ८५ कि.मी.लांबीचा डावा कालवा व ९२.५ कि.मी.लांबीचा उजवा कालवा असून त्याद्वारे ६८ हजार ८७८ हे.क्षेत्रावर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे.उर्ध्व प्रवरा उजवा कालव्या द्वारे २० हजार ३९५ हे.व डाव्या कालव्याद्वारे ४३ हजार ८६५ हे.लाभक्षेत्रास पाणी देण्याचे नियोजन आहे.मुख्य कालव्यांची कामे पूर्ण झाले असून त्यावरील बंद नलिका वितरण प्रणालीचे कामे प्रगतीपथावर आहेत.बंद नलिका वितरण प्रणालीचे कामे पूर्ण झालेली नसल्याने ओढे,नाले यावरील तलाव बंधारे यामध्ये पाणी सोडून आवर्तन करण्यात येत आहे.उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या मुख्य कालव्यांवरील उर्वरील संपूर्ण ६३ हजार १८१ हे.लाभक्षेत्र वितरण प्रणालीचे क्षेत्र पाईप लाइन वितरण प्रणालीद्वारे (पी.डी.एन.)द्वारे सिंचनाखाली आणणे करिता ऑक्टोबर २०२४ मध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आलेले असून काम कार्यक्षेत्रावर प्रगतीत आहे.सद्यस्थितीत डाव्या कालवा तळेगाव शाखा कालव्यावरील बंद नलिका वितरण प्रणालीचे १३ हजार ८६४.८९ हे.क्षेत्रापैकी १० हजार २९५.१७हे क्षेत्राचे संकल्पन मंजूर असून कार्यक्षेत्रावर कामे प्रगतीत आहेत.सदर शाखा कालव्यावरील बंद नलिका वितरण प्रणालीमुळे डोहाळे,काकडी,कनकुरी,कोऱ्हाळे,केलवड खुर्द,मल्हारवाडी,मनेगाव,नांदुर्खी खुर्द,निघोज,निमगाव, रांजणगाव देशमुख,सावळीविहीर बुद्रुक,सावळीविहीर खुर्द,सोयगाव,वडझरीखुर्द,वाळकी,वेस,कौठे-कमळेश्वर,कासारे,केलवड बुद्रुक,केलवड खुर्द,पिंप्री लोकई,अंजनापूर, बहादाराबाद,धोंडेवाडी,जवळके,मनेगाव,पाथरे खुर्द,पोहेगाव,रांजणगाव,सायाळे,शहापूर,सोयगाव,वडझरी बुद्रुक,वेस,अंजनापूर,हासनाबाद,जुणेगाव,चिंचोली गुरव,देवकौठे,कहांडळवाडी,दुसंगवाडी,मलढोण,सायाळे,तळेगाव दिघे,बहादरपूर,चोरकौठे,शहापूर,पाथरे खुर्द,वारेगाव या गावांना सिंचनाचा लाभ होणार आहे.
दरम्यान संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव गावाचे एकूण ७९५.६७ हेक्टर सिंचन क्षेत्रापैकी ग्रॅव्हिटी बंधिस्त नलिकाद्वारे सिंचन न होणारे ३०३.०९९ हे. क्षेत्र राहते.सदर उर्वरित ३०३.०९९ हे क्षेत्रास तळेगाव शाखा,कालव्यावरून उपसा करून सिंचन निर्मिती करणे बाबतचा प्रस्तावास शासनाची मान्यता मिळणेबाबतचा प्रस्ताव विभागीय स्तरावर प्रगतीत असल्याची माहिती शेवटी कार्यकारी अभियंता प्रदिप हापसे यांनी शेवटी दिली आहे.
दरम्यान या माहितीत मात्र निळवंडे धरणाचे पाणी दुष्काळी १८२ गावांना पिण्याचे पाण्यासाठी आरक्षण देण्याबाबत मागणी केली होती.मात्र त्याला त्यांनी बगल दिली असून सह्यादी पर्वताच्या पश्चिम घाट माथ्याचे पाणी अरबी समुद्राला जात असून ते पाणी वळविण्यासाठी मागणी केली होती.त्याची माहिती नंतर देतो असे सांगितले आहे.अद्याप १०-१५ गावे पूर पाण्यासाठी वंचित असून त्यांना पाणी देण्यासाठी आवश्यक पी.डि.एन.तातडीने करणे गरजेचे असल्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे.



