जलसंपदा विभाग
निळवंडे धरणाची उंची वाढवा;मग पाणी इतरांना वाटा-आवाहन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
उत्तर नगर जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यातील असे एकूण १८२ दुष्काळी गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणातील पाणी अद्याप दुष्काळी गावांना मिळालेले नसताना संबंधित खात्याचे मंत्री विखे आणि संगमनेर तालुक्याचे आ.अमोल खताळ हे खिरापती सारखे वाटण्यास निघाले असून त्यांनी आधी निळवंडे धरणाची उंची वाढवून पाणी निर्माण करावे मगच आपल्या मतपेटीची सोय करावी अन्यथा निळवंडे कालवा कृती समिती या विरोधात आंदोलनाची हाक देईल असा इशारा निळवंडे कालवा कृती समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊसाहेब सोनवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका प्रसिद्धी पत्रिकाद्वारे दिला आहे.

“चिंचोली गुरव ग्रामपंचायत हद्दीतील ८०० हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणार होते मात्र पाईप लाइन नेटवर्क (पी.डी.एन.) मध्ये आता फक्त पूर्व भागाला पाणी मिळणार आहे तर उर्वरित ३०० हेक्टर भाग वंचित राहणार आहे.याबाबत आम्ही गेले वर्षेभर सर्व सत्ताधारी नेत्यांना भेटून आवाज उठवत आहे.मात्र ही आर्त हाक एकाही नेत्याला ऐकू जात नाही की; एकाही नेत्याला थोडीही खंत वाटत नाही.मात्र जिल्हा परिषद निवडणुका पाहून यांना आता कंठ फुटला आहे.आता ही मंडळी मतदारांना चंद्र,तारे,नद्या,नाले सर्व काही द्यायला तयार होतील”-प्रकाश सोनवणे,कार्यकर्ते,निळवंडे कालवा कृती समिती,अ.नगर,नाशिक.
संगमनेर विधानसभा मतदार संघाचे आ.अमोल खताळ यांनी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक पाहून नुकतीच सगमनेर येथील जलसंपदा विभागातील कार्यालयात एक बैठक घेतली असून त्यात त्यांनी,”निळवंडे डावा आणि उजवा कालव्यांमुळे अनेक गावांत पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागत आहे.जलसंपदा विभागाने सर्वेक्षण करून यापूर्वी पाण्यापासून वंचित राहिलेल्या गावांनाही लवकरच पाणी मिळवून दिले जाईल.जलसंपदा विभागाच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून संगमनेरमधील एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही” अशी राणा भिमदेवी घोषणा केली आहे.त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”निळवंडेच्या दोन्ही कालव्यावरून मालदाड,सायखिंडी,मेंढवण,वेल्हाळे,कन्हे,चंदनापुरी,हिवरगाव पावसा,सावरगाव,डिग्रस,कोळवाडे,मालुंजे,शिरापूर या भागांचा सर्वेक्षण करण्याचे आदेश मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिले होते.त्यानुसार अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण पूर्ण केले असून,लवकरच निळवंडे कालव्यावरून पाणीपुरवठा करण्याच्या कामाची सुरुवात होईल तसेच निमगाव पागा व सावरचोळ परिसराचा सर्वेक्षण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून,केवळ सर्वेक्षण न करता प्रत्यक्ष पाणी देण्याचे काम केले जाईल” अशी बढाई मारली आहे.त्यावर निळवंडे कालवा कृती समितीच्या कार्यकर्त्यांमधून तीव्र प्रतिसाद उमटले आहे.त्यांनी एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे त्यात यांनी हे आवाहन केले आहे.

“संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव ग्रामपंचायत हद्दीतील ५०० हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणार होते मात्र पाईप लाइन नेटवर्क (पी.डी.एन.) मध्ये आता फक्त पूर्व भागाला पाणी मिळणार आहे तर उर्वरित ३०० हेक्टर भाग वंचित राहणार आहे.याबाबत आम्ही गेले वर्षेभर सर्व सत्ताधारी नेत्यांना भेटून आवाज उठवत आहे.मात्र ही आर्त हाक एकाही नेत्याला ऐकू जात नाही की; एकाही नेत्याला थोडीही खंत वाटत नाही.मात्र जिल्हा परिषद निवडणुका पाहून यांना आता कंठ फुटला आहे”-प्रकाश सोनवणे,कार्यकर्ते,निळवंडे कालवा कृती समिती,अ.नगर-नाशिक.
सदर प्रसिद्धीपत्रकात त्यांनी म्हटले आहे की,” वास्तविक निळवंडे कालव्यासाठी या घोषणा करणाऱ्या बढाईखोर नेत्यांनी कोणते योगदान दिले आहे हे पहिले जाहीर करावे.ज्यांनी निळवंडे धरण केवळ स्टोअर टैंक होईल असे सांगून सन -१९८४-८५ साली मे महिन्यात कालवे व्हावे व दुष्काळी शेतकऱ्यांना पाणी मिळावे अशा विचारसरणीचे नेते संगमनेर कम्युनिस्ट माजी आ.दत्ता देशमुख यांना लोणी येथील पाणी परिषदेच्या व्यासपीठावरून अपमानास्पदरित्या उतरून दिले होते.त्याचे साक्षीदार आजही जिवंत आहे.त्या बातम्या त्यावेळी महाराष्ट्र टाईम्स व अन्य वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या होत्या.ते नेते आज निळवंडे धरणाला स्टोअर टैंक करण्यास निघालेल्या आपल्या पिताश्रीना जलनायक करण्यास निघाले आहे या सारखा जगात विनोद नाही.आपले निळवंडे धरणाचे कालवे होऊ नये यासाठी या मंत्री आणि त्यांच्या पूर्वजांनी केलेले पाप धुवून टाकण्यासाठी यांनी आपल्या नावाची कोनशिला लावण्यासाठी स्वतःचा स्वाभिमान पायदळी तुडवून अर्ध्या खात्याचे मंत्रिपद मिळविले आहे हे दुष्काळी शेतकरी ओळखून आहे.निळवंडे कालवा कृती समितीने केंद्रीय जल आयोगाकडून खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचे माध्यमातून २०१४ पूर्वी १७ पैकी १४ मान्यता मिळवून आणल्या होत्या.बाकी मान्यता मिळविण्यासाठी राज्यात मंत्रीपद भूषविणाऱ्या मंत्र्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काही झारीतील शुक्राचार्यांची भूमिका निभावली होती हे ही दुष्काळी शेतकऱ्यांना माहिती आहे.कालवा कृती समितीने त्याचे सप्रमाण पुरावे शेतकऱ्यांना दाखवले आहे.आपल्या बंद पडलेल्या पेपर मिलच्या नावावर कोणी पाणी चोरून वापरले याचा भांडाफोड कालवा कृती समितीनं वारंवार केला आहे.कोणी लाभक्षेत्राबाहेरील गावांना पाणी पळविण्याचे षडयंत्र आखले हेही सर्वांना माहिती आहे.अखेर दुष्काळी गावांना आपल्या हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी कालवा कृती समितीने पत्रकार नानासाहेब जवरे आणि विक्रांत रुपेंद्र काले यांच्या नावाने ॲड.अजित काळे यांचे विधी सहकार्याने जनहित याचिका उच्च न्यायालयात (क्रं.- १३३/२०१६) दाखल करून न्याय मिळवून दिला आहे.त्यासाठी आज जलनायक म्हणून घेणाऱ्यांनी पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर १० ऑगस्ट २०१४ साली तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे सभेत कशा लाठ्या काठ्या चालवल्या होत्या हे राज्यातील शेतकरी अद्याप विसरले नाही याची आठवण भाऊसाहेब सोनवणे यांनी करून दिली आहे.

“संगमनेर तालुक्याचे आ.अमोल खताळ यांना आम्ही निवडून आणले” म्हणणाऱ्यानी थोडे भानावर यावे त्यांना निळवंडे कालवा कृती समितीच्या संघर्षाने त्यांना हे यश मिळाले आहे हे विसरू नये.आमदार म्हणून खताळ यांनी जलसंपदा विभागात बैठक घेतली त्या ठिकाणी त्यांना निळवंडे कालव्यात त्यांचे काय योगदान दिले आहे हे एकदा आरशासमोर उभे राहून स्वतःला विचारावे” असे आवाहन कालवा कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.
दरम्यान संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ आम्ही निवडून आणले” म्हणणाऱ्यानी थोडे भानावर यावे त्यांना निळवंडे कालवा कृती समितीच्या संघर्षाने त्यांना हे यश मिळाले आहे” याचे भान विसरू नये असे फटकारले आहे.ज्या आमदार म्हणून खताळ यांनी जलसंपदा विभागात बैठक घेतली त्या ठिकाणी त्यांना निळवंडे धरणे आणि कालव्यात त्यांचे काय योगदान दिले आहे हे त्यांनी एकदा आरशासमोर उभे राहून स्वतःला विचारावे व आत्मपरिक्षण करावे असे आवाहन केले आहे.त्यांना सत्तेचा एवढा अहंकार असेल त्यांनी वरील गावांना बारमाही असलेल्या भंडारदरा धरणातून उपलब्ध करून देण्याचे धाडस दाखवावे.नाही तर निळवंडे धरणांची उंची वाढवून ते पंधरा टी.एम.सी.करून दाखवावे मगच आपल्या जिल्हा परिषद निवडणूक पूर्व घोषणा कराव्या असे आवाहन शेवटी भाऊसाहेब सोनवणे,बाळासाहेब सोनवणे,प्रकाश सोनवणे,सुभाष सोनवणे आदींनी शेवटी केले आहे.
*पत्रकार नानासाहेब जवरे* यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी *’न्यूजसेवा‘* वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा.
https://bit.ly/newsseva2025
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.
दरम्यान चिंचोली गुरव ग्रामपंचायत हद्दीतील ८०० हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणार होते मात्र पाईप लाइन नेटवर्क (पी.डी.एन.) मध्ये आता फक्त पूर्व भागाला पाणी मिळणार आहे तर उर्वरित ३०० हेक्टर भाग वंचित राहणार आहे.याबाबत आम्ही गेले वर्षेभर सर्व सत्ताधारी नेत्यांना भेटून आवाज उठवत आहे.मात्र ही आर्त हाक एकाही नेत्याला ऐकू जात नाही की; एकाही नेत्याला थोडीही खंत वाटत नाही.मात्र जिल्हा परिषद निवडणुका पाहून यांना आता कंठ फुटला आहे.आता ही मंडळी मतदारांना चंद्र,तारे,नद्या,नाले सर्व काही द्यायला तयार होतील मात्र दुष्काळी मतदारांनी सावध होण्याची गरज असल्याचे आवाहन प्रकाश सोनवणे यांनी केले आहे.



