जलसंधारण
गावनिहाय जलसंधारण आराखड्याची गरज – मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
पर्जन्यछायेच्या प्रदेशात असलेल्या कोपरगाव तालुक्यात कमी व अनियमित पर्जन्यमान, भूजल पातळीत होणारी घट आणि सिंचनाच्या मर्यादित सुविधा यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील प्रत्येक गावाचा स्वतंत्र गावनिहाय मृद व जलसंधारण विकास आराखडा तयार करून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी विधानपरिषदेचे आ.विवेक कोल्हे यांनी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचेकडे केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

"कोपरगाव तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश झाला आहे.तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये कमी व अनियमित पाऊस,भूजल पातळीत सातत्याने होणारी घट,पाण्याचा अपुरा साठा आणि शेतीसाठी सिंचनाच्या मर्यादित सुविधा यामुळे शेती व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे-आ.विवेक कोल्हे,कोपरगाव.
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात यांच्या ‘सहकार विकास आघाडी’ने २१ पैकी १७ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे.या विजयानंतर आता सगळ्यांचे लक्ष बँकेच्यादिनाक १२ नोव्हेंबर रोजी संपन्न होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे लागले असून,याचा अंतिम निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असल्याच्या बातम्या असून नुकतेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांची येसगाव येथे तर राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी त्याची काल दुपारी दोन वाजता सहकार महर्षी कोल्हे कारखानास्थळावर पुनरावृत्ती केली असल्याचे समजत आहे.त्यावेळी आ.विवेक कोल्हे यांनी ही मागणी केली आहे.

कोपरगाव तालुक्यातील जलसंधारणाच्या कामांसाठी गावनिहाय आराखडा तयार करण्याच्या मागणीसंदर्भात आवश्यक ती कार्यवाही केली जाईल.संबंधित विभागाच्या माध्यमातून प्रस्तावित कामांचा आढावा घेऊन आवश्यक ते सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले आहे.
तालुक्यातील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून असल्याने पावसाचे पाणी अडविणे, जमिनीत जिरविणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी गावनिहाय नाला खोलीकरण व रुंदीकरण,जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती व मजबुतीकरण,सिमेंट व माती नाला बांधांची उभारणी,पाझर तलाव व लघु जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन तसेच जलसाठ्यांमधील गाळ काढणे आदी कामे प्राधान्याने हाती घेण्याची गरज निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच शेततळे व जलपुनर्भरण संरचनांची निर्मिती,सलग समतल चर,समतल बांध आणि समोच्च रेषांवरील बांधबंदिस्ती यांसारखी कामे करून पावसाचे पाणी अडविणे व जमिनीत मुरविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे.यात प्रत्येक गावाची भौगोलिक परिस्थिती,पाण्याची उपलब्धता आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन स्वतंत्र गावनिहाय मृद व जलसंधारण विकास आराखडा तयार करावा.या आराखड्यातील प्रस्तावित कामांना मंजुरी देऊन त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा.यासाठी संबंधित विभागाला आपल्या स्तरावरून तातडीने आदेश द्यावेत,अशी मागणी आ. विवेक कोल्हे यांनी शेवटी केली आहे.


