जाहिरात-9423439946
जयंती,पुण्यतिथी अभिवादन

…या नेत्याच्या स्मरणार्थ स्वच्छता अभियान !

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

 
   माजी मंत्री स्व.कोल्हे यांच्या स्मरणार्थ स्वच्छता अभियान
माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे हे स्वतःच वक्तशीर होते,त्यांना सातत्यांने नाविन्यपुर्ण गोष्टींचा ध्यास होता,साखर कारखानदारीत प्रगत तंत्रज्ञानावर ते भर देत असल्याचे प्रतिपादन साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांच्या जयंती निमीत्त कोल्हे सहकारी साखर कारखान्यात स्वच्छता अभियान व वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यांत आला तो क्षण.

   सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात त्यांच्या जयंती प्रेरणा दिनानिमीत्त मंगळवारी २४ मार्च रोजी स्वच्छता अभियान व वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यांत आला त्याप्रसंगी ते बोलत होते.

सदर प्रसंगी  याप्रसंगी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे,संचालक,विविध संस्थाचे पदाधिकारी,सर्व खाते प्रमुख,उपखातेप्रमुख,कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
       
   त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी स्व.शंकरराव कोल्हे यांची प्रेरणा घेत साखर कारखानदारीची घौडदौड यशस्वीरित्या सुरू ठेवत देशात सर्वप्रथम बायो सीएनजी,पोटॅश ग्रॅन्युएल खत निर्माती,उसाच्या रसापासुन थेट इथेनॉल,बायोगॅस,सहवीज, विविध रासायनिक उपपदार्थ निर्मातीत अमुलाग्र बदल करत संजीवनीचे वेगळेपण जपले आहे.त्यांच्या सामाजिक,सांस्कृतीक,शैक्षणिक,सहकार,शेती,शिक्षण व सिंचन कामाची अनुभूती संपुर्ण महाराष्ट्र राज्याला ज्ञात असुन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ,राज्य सहकारी साखर संघ,वसंतदादा शुगर इन्स्टीटयुट,नॅशनल हेवी इंजिनियरींग या संस्थेच्या माध्यमातुन साखर उद्योगातील प्रत्येक स्थित्यंतरातील कामाचा देश विदेशातही ठसा उमटलेला आहे.त्यांच्या पुण्यतिथी ते जयंतीनिमीत्त प्रेरणादिन सप्ताह घेवुन त्यांच्या कार्याला उजाळा देण्याचा प्रयत्न असल्याचे ते शेवटी म्हणांले आहे.
 
   सदर प्रसंगी प्रारंभी माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यांत आले.तांत्रीक सल्लागार सिमांचल पांडा यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.याप्रसंगी सुत्रसंचलन एच.आर.मॅनेजर विशाल वाजपेयी,कामगार कल्याण अधिकारी एस.सी.चिने यांनी केले तर भास्करराव बेलोटे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close