जयंती,पुण्यतिथी अभिवादन
आदिवासी कार्यालय …या ठिकाणी होणार!

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगावसह राहाता तालुक्यातील आदिवासी समाजास येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शिर्डीला आदिवासी विकास कार्यालय व्हावे यासाठी आपले प्रयत्न असून जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे व आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उईके यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच केले आहे.

“राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आदिवासींचे श्रद्धास्थान असलेले एकलव्य यांच्या स्मारकासाठी एक कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. त्यासाठी कोपरगाव शहरातील प्रमुख मार्ग असलेल्या धारणगाव रोड येथे मध्यवर्ती ठिकाणी समिती स्थापन करून स्मारक उभारले जाणार आहे”-आ. आशुतोष काळे,कोपरगाव..
आज जागतिक आदिवासी दिना निमित्त कोपरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भगवान एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन आ.आशुतोष काळे यांनी केले त्यावेळी ते बोलत होते.
भारताच्या हरियाणा राज्यातील गुरुग्राम शहरातील सेक्टर ३७ मधील खंडसा गावात एकलव्याच्या सन्मानार्थ एक एकलव्य मंदिर आहे.लोककथेनुसार,हे एकलव्याचे एकमेव मंदिर आहे आणि हे ते ठिकाण आहे जिथे एकलव्याने आपला अंगठा कापला आणि गुरू द्रोणाला अर्पण केले.त्यांना देशभर आदराचे स्थान आहे.
सदर प्रसंगी आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”कोपरगाव तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांसाठी १२५ घरकुल आदिवासी विकास विभागाकडून मंजूर आणले आहे.परंतु आदिवासी बांधवाना घरकुलासाठी जागेची मोठी अडचण आहे.त्याबाबत शासन स्तरावर असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी तहसीलदार,गटविकास अधिकारी यांच्या समवेत बैठक घेवून आदिवासी बांधवांना घरकुल मिळवून देणार असल्याचे सांगून शिर्डीला आदिवासी विकास कार्यालय व्हावे हि भूमिका आणि हा प्रयत्न फक्त प्रशासकीय बदल नाही,तर आदिवासी समाजाचा सन्मान, सोय आणि हक्क यासाठी पुढे टाकलेले एक पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले आहे.