जयंती,पुण्यतिथी अभिवादन
राजमाता जिजाऊ यांच्या पूण्यतिथी निमित्त कोपरगावात अभिवादन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जिजाबाई यांनी स्वराज्य निर्मितीत मोलाची भूमिका निभावली होती.त्यांची पुण्यतिथीनिमित्त कोपरगाव राष्ट्रवादीच्या वतीने अभिवादन करण्यात आले आहे.यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा प्रतिभा शिलेदार यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले आहे.
राजमाता जिजाबाई शहाजी भोसले ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. त्यांना राजमाता,राष्ट्रमाता,जिजाबाई किंवा जिजाऊ म्हणून संबोधले जाते.सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते.जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते.जिजाबाई यांनी स्वराज्य निर्मितीत मोलाची भूमिका निभावली होती.त्यांची पुण्यतिथीनिमित्त कोपरगाव राष्ट्रवादीच्या वतीने अभिवादन करण्यात आले आहे.
सदर प्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहराध्यक्षा प्रतिभा शिलेदार,भाग्यश्री बोरुडे,शितल लोंढे,कु.दिक्षा उनवणे माजी नगरसेवक मंदार पहाडे,राजेंद्र वाकचौरे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास केकाण,गौतम बँकेचे माजी संचालक सुनील शिलेदार,अशोक आव्हाटे,बाळासाहेब रुईकर,राजेंद्र खैरनार,संदीप कपिले,धनंजय कहार,मनोज नरोडे,सचिन गवारे,मुकुंद इंगळे,राजेंद्र आभाळे,विकास बेंद्रे,प्रशांत वाबळे,गणेश बोरुडे,योगेश नरोडे,शंकर घोडेराव, सतिश भुजबळ,सुरेश सोनटक्के आदी उपस्थित होते.