जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
ग्रामविकास

….या ग्रामपंचायतीत पंचायतराज अभियानाचा उत्साहात शुभारंभ !

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यातील बहादराबाद येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आला आहे.

   यावेळी बहादराबाद ग्रामपंचायतच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच अश्विनी पाचोरे यांची भाजपा महिला मोर्चाच्या तालुकाध्यपदी नियुक्ती झाली तसेच बाळासाहेब पाचोरे यांची तालुका कार्यकारिणीवर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

   राज्यच्या मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामविकास विभागातर्फे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. हे अभियान राज्यात ग्रामपंचायत,पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांसाठी सन २०२५-२५ या आर्थिक वर्षापासून तालुका, जिल्हा,महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर राबवण्यात येत आहे.कोपरगाव तालुक्यातील बहादराबाद येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी या अभियानाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला आहे.

  सदर प्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष व बहादराबाद ग्रामपंचायतचे माजी सरपंच विक्रम पाचोरे,सरपंच अश्विनी पाचोरे,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सचिन तारडे,बाळासाहेब पाचोरे,ग्रामपंचायत अधिकारी अनिता दिवे,ग्राममहसूल अधिकारी किशोर गटकळ,आरोग्य अधिकारी सोनाली पानसरे,कृषी सहाय्यक श्रीमती तायडे,अंगणवाडी सेविका,आशा सेविका,ग्रामपंचायत कर्मचारी आदीसह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

    यावेळी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.सदर अभियानाची सविस्तर माहिती ग्रामस्थांना देण्यात येवून स्वच्छता,आरोग्य सुविधा,पाणी पुरवठा,वृक्षारोपण,गावांतर्गत शिवार वाहतूक रस्ते,त्याचबरोबर ग्रामपंचायत करवसुली वेळेत करण्यासोबतच प्रतिवर्षी ३ लाखांपर्यंतची सार्वजनिक कामे लोकसहभागातून करण्याचा अभियानानुरूप निर्णय घेण्यात आला आहे.

  यावेळी पंतप्रधान मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा साजरा करण्याच्या निर्णयानुसार महादेव मंदिर ते हनुमान मंदिर परिसर स्वच्छता करण्यात आली.त्याचबरोबर स्मशानभूमी परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली आहे.

   सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तसेच ग्रामसभेचे विषयवाचन ग्रामपंचायत अधिकारी अनिता दिवे यांनी केले तर उपस्थितांचे आभार  सरपंच अश्विनी पाचोरे यांनी मान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close