ग्रामविकास
…या प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजूरी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव मतदार संघाच्या पूर्व भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी तीळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रास विशेष बाब म्हणून मंजूरी द्यावी व कोपरगाव मतदार संघातून वाहणाऱ्या पवित्र गोदावरी नदीचे संवर्धनासाठी निधी मिळावा अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
मतदार संघाच्या सीमेवरील असलेल्या तीळवणी लगतच्या गावातील नागरिकांना आरोग्याच्या सोयी सुविधा वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे तीळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रास जिल्हा नियोजन बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.मात्र मंत्रालय स्तरावरील मान्यता न मिळाल्यामुळे निधीची तरतूद होवू शकली नाही.त्यामुळे तीळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रास विशेष बाब म्हणून मंजूरी द्यावी.तसेच पवित्र गोदावरी नदी तीरावर वसलेल्या व धार्मिक,ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या कोपरगाव शहराला गोदामाईचा मोठ्या स्वरूपात नदीकाठ लाभलेला आहे.कोपरगाव शहराला वळसा घालणाऱ्या पवित्र गोदावरी नदीकाठ सुशोभित होवून गोदावरी नदीचे संवर्धन व्हावे अशी असंख्य गोदाप्रेमींची व भाविकांची मागील अनेक वर्षांची मागणी आहे.त्या मागणीनुसार पर्यावरणाचे रक्षण होवून गोदावरी नदी संवर्धनासाठी सर्वसमावेशक प्रस्तावास जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी संमती देवून हा प्रस्ताव देखील शासनाकडे सादर करण्यात आला आहे.या प्रस्तावची देखील दखल घेवून गोदावरी नदी संवर्धनासाठी निधी द्यावा अशी मागणी आ.काळे यांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.सदरच्या निवेदनाची दखल घेवून निधी देण्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेवू अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी आ.काळे यांना शेवटी दिली आहे
तीळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रास विशेष बाब म्हणून मंजूरी मिळावी व गोदावरी नदी संवर्धनासाठी निधी मिळावा याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करतांना आ.आशुतोष काळे.