धार्मिक
…या महाजांचा पादुका दर्शन सोहळा होणार संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अ.नगर जिल्हा जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळाच्या वतीने श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा बुधवार दि.२२ नोव्हेंबर रोजी येवला नाका,कोपरगाव येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.उपासक दिक्षा देखील यावेळी देण्यात येणार आहे.जास्तीत जास्त भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन अ.नगर जिल्हा श्री स्व-स्वरूप संप्रदायाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रत्येक धर्मात धर्मगुरु ही सर्वात सर्वोत्तम पदवी आहे.या पदवीनंतर प्रत्यक्षात भगवंतच या धर्माचा शिरोमणी असतो.बुद्ध धर्माचे आराध्य दैवत भगवान गौतमबुद्ध.बौद्ध धर्माचे धर्मगुरु दलाई लामा.ईसाई धर्माचे आराध्यदैवत येशू आणि धर्मगुरु पोप.तसेच आपल्या हिंदूधर्माचे आराध्यदैवत भगवान विष्णू किंवा राम.तसेच नरेन्द्राचार्य भक्त मंडळाचे धर्मगुरु रामानंदाचार्य असलायचे त्यांचे समर्थक मानतात.त्यांचे पादुका पूजन कोपरगावात संपन्न होत आहे.
प्रत्येक धर्मात धर्मगुरु ही सर्वात सर्वोत्तम पदवी आहे.या पदवीनंतर प्रत्यक्षात भगवंतच या धर्माचा शिरोमणी असतो.बुद्ध धर्माचे आराध्य दैवत भगवान गौतमबुद्ध.बौद्ध धर्माचे धर्मगुरु दलाई लामा.मुस्लीम धर्माचे आराध्यदैवत अल्ला तर धर्मगुरु महमद पैगंबर.ईसाई धर्माचे आराध्यदैवत येशू आणि धर्मगुरु पोप.तसेच आपल्या हिंदूधर्माचे आराध्यदैवत भगवान विष्णू किंवा राम.तसेच नरेन्द्राचार्य भक्त मंडळाचे धर्मगुरु रामानंदाचार्य असलायचे त्यांचे समर्थक मानतात.त्यांची त्यांच्यावर नितांत श्रद्धा आहे.त्यांच्या पादुका या देवाच्या निर्गुण स्वरूपातील अवस्था मानली गेली आहे.यामुळे सद्गुरूंच्या पादुका या त्यांच्या शिष्यांसाठी अमोल असा ठेवा मानला जातो.सद्गुरूंचा सहवास असल्याचा भास पादुकांद्वारे होत असतो.कारण एक आध्यात्मिक शक्ती त्यात असते.त्यामुळे भक्त पादुकांप्रती भाव अर्पण करत असतात.जगद्गुरू श्री नरेंद्राचार्य महाराज यांना गुरू म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी नाणीजधाम येथे पादुका पूजन कार्यक्रम दरवर्षी होत असतो.त्याच धर्तीवर कोपरगाव मथुरा एजन्सी शेजारी येवला नाका नगर मनमाड हायवे येथे पुजनाचा सोहळा होणार आहे.या दिवशी जगद्गुरूंच्या सिद्ध पादुकांची शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
सोहळ्याच्या ठिकाणी शोभायात्रेतील पादुकांचे आगमन झाल्यानंतर तेथे प्रथम सिद्ध पादुका पूजन होणार आहे. संस्थानाच्या सामाजिक उपक्रम राबिवला जाणार आहे.यांनतर गुरूपूजन सोहळा होणार आहे.पुजना नंतर आरती सोहळा होणार आहे.भाविकांना सुश्राव्य प्रवचनाचा लाभ घेता येणार आहे.
सदर प्रसंगी उपासकांना दीक्षा दिली जाणार आहे.सिध्द पादुकांचे दर्शन सर्व भाविकांसाठी खुले असणार आहे.पुष्प वृष्टी करून सोहळ्याची सांगता होईल.अ.नगर जिल्ह्य़ातील सर्व भाविकांनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अ.नगर जिल्हा श्री स्व-स्वरुप संप्रदायाच्या वतीने शेवटी करण्यात आले आहे .