कोपरगाव शहर वृत्त
कोपरगाव तहसीलकडे…इतक्या लाखांची विक्रमी थकबाकी,अन्य विभागही मागे नाही

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव नगरपरिषदेने वित्तीय वर्षाच्या अखेर आपली वसुली मोहीम तीव्र केली असून त्यासाठी सर्व विभाग आणि त्यांचे कर्मचारी कामाला लावले आहे.मात्र अद्यापही त्यांना घरगुती पट्टीसह म्हणावे असे यश आलेले दिसत नाही त्यातील शासकीय कार्यालयाकडे असलेली थकबाकीची आकडेवारी आमच्या प्रतिनिधींच्या हाती आली असून त्यातील विक्रमी २० लाख ८२ हजार ३०८ रुपयांची थकबाकी हि एकट्या तहसील कार्यालयाकडे थकीत असून त्या खालोखाल कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाकडे ०६ लाख १३ हजार १४४ तर त्या पाठोपाठ कोपरगाव जलसंपदा उपविभाग यांचेकडे ०५ लाख ७२ हजार ६४४ रुपये असल्याची धक्कादायक माहिती हाती आली असून त्या विरोधात पालिका कोणती भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव नगरपरिषदेचे प्रभारी अधिकारी तथा मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सदर वसूल इष्टांक साधला गेला नसून अजून मोठे उद्दिष्ट बाकी असून ते कमाल ९५ टक्क्यावर जाणे अभिप्रेत असल्याची माहिती दिली असून त्यासाठी उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे आदिसंह सर्व विभाग प्रमुख,कर्मचारी कार्यरत आहे.
कोपरगाव नगरपरिषदेचे पदाधिकारी व नगरसेवक आदींचा कालावधी २९ नोव्हेंबर २०२१ रोजी संपून आता जवळपास सव्वा वर्ष संपुष्टात आले आहे.तह्यात कार्यभार कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांचेकडे जिल्हाधिकारी यांनी सुपूर्त केला आहे.तो पासून आजतागायत पालिकेत प्रशासक आज आहे.मात्र आता वित्तीय वर्ष संपत आले आहे.त्यासाठी विकास कामे करण्यासाठी मोर्चा आणणारे वसुली मोहिमेत किती योगदान देणार हा संशोधनाचा विषय आहे.त्यासाठी खिशात,’आणा’ असणे गरजेचे आहे.मात्र याबाबत पालिका मुख्याधिकारी गोसावी यांनी सावधानता बाळगली असून त्यांनी याबाबत गत महिन्यापासून वसुलीसाठी सर्व विभागाचे अधिकारी,कर्मचारी आदींना कामास लावले आहे.त्यासाठी सर्वच कर्मचारी कामाला लागले असले तरी त्यांनी बाकी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ऐच्छिक काम सोपवले असून तो वसूल हा त्यांच्या विभागाला विकास योजना राबविण्यासाठी देण्याचे खास वचन दिले असल्याची माहिती आहे.हि क्लुप्ती यशस्वी ठरण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान पालिकेने या वसुली मोहिमेसाठी स्वतंत्र चारचाकी भोंग्याची गाडी आणि वसुली अधिकारी आणि कर्मचारी असा ताफा शहरात सर्वत्र कार्यरत असून अनेक वर्षापासून जे नेत्यांचे,विशेष कार्यकर्त्यांचे,नगरसेवक आदींचे लाडके आहेत अशा खास नागरिकांनीं अनेक वर्षांपासून आपली घरपट्टी,पाणी पट्टी,व्यवसाय कर,गाळे भाडे आदी वसुली भरलेली नाही.त्यांच्यावर विशेष करून हा भर देण्यात आला आहे.त्यामुळे आता त्यांना वाचविण्यास आता कोणी नेता पुढे येण्याची शक्यता नाही हा कयास करून हि वसुली मोहीम जोरात सुरु आहे.त्यामुळे अनेकांच्या नळजोडण्या खंडित करण्यात येत आहेत.तर अनेकांनी जे वर्षानुवर्षे गाळे भाडे,व्यवसाय कर आदी कर थकवले आहे.त्यांच्यावर खास वक्रदृष्टी असल्याचे दिसून येत आहे.त्यांच्या चल-अचल संपत्ती जप्ती मोहित राबविण्यात येत आहे.त्यामुळे वसुलीला वेग आला आहे.गत पंधरा वर्षात अशी वसुली मोहीम आढळली नाही अशी प्रतिक्रिया नागरिकांत ऐकायला मिळत आहे.त्यामुळे अनेकांना घाम फूटला आहे.त्यामुळे वसुली मोहीम तीव्र असली तरी अपेक्षित उच्चतम वेग मिळाला असे म्हणता येणार नाही.त्यामुळे आगामी काळात निवडणुका नसल्याने हा वेग आणखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान या वसुली मोहिमेत अन्य कार्यालयांची थकबाकी आकडे प्राप्त झाले असून त्यात कोपरगाव तलाठी कार्यालय थकबाकी आकडे रुपयांत ७२ हजार १०४,कोपरगाव पोलीस ठाणे-९६ हजार २०८,भारत संचार निगम-६३ हजार ७०५ असे शासकीय कार्यालयाकडे एकूण थकबाकी हि ३५ लाख १११ रुपयांची असल्याची धक्कादायक माहिती आहे.
दरम्यान यातील घरपट्टी दि.२८ फेब्रुवारी अखेर थकीत घरपट्टी हि ३ कोटी ०१ लाख २९ हजार २८० रुपयांची असून चालू बाकी हि ३ कोटी ०४ लाख ३० हजार ०२२ इतकी असून त्यातील मागील थकबाकी वसुली हि ६६ लाख ५० हजार ४१५ असून त्यातील २८ फेब्रुवारी अखेर चालू वसुली हि १ कोटी ७२ लाख ८० हजार ७२० इतकी झाली एकूण वसुली २ कोटी ३९ लाख ३१ हजार १३५ झाली आहे.टक्केवारीत हि वसुली हि ३९.५१ टक्के इतकी आहे.तर या खेरीज आर्थिक दुर्बल घटकातील (झोपड पट्टी भाग) वसुली मागणी हि ८९ लाख ५० हजार ८७० असून त्यातील २२ लाख ७५ हजार १९७ इतकी झाली असून यातील थकबाकी हि ६६ लाख ७२ हजार ६३९ इतकी झाली आहे.
कोपरगाव नगरपरिषद सरकारी कार्यालये पाणी पट्टी अहवाल
दरम्यान शासकीय पाणीपट्टी अहवाल प्राप्त झाला असून त्यात सर्वाधिक थकबाकी हि कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद यांची असून ती ७ लाख ७५ हजार ९४७ इतकी आहे.तर त्या खालोखाल जलसंपदा उपविभाग कोपरगाव डावा तट कालवा यांची असून ती ५ लाख ६६ हजार ३५१ इतकी आहे.तर त्यानंतर सार्वजनिक बांधकाम उपविभाग कोपरगाव यांचेकडे १ लाख ०८ हजार ३९६ आहे.तर त्या नंतर कोपरगाव शहर पोलीस ठाणे यांचेकडे पाणीपट्टी हि १ लाख ०३ हजार ३१८ आहे.त्या नंतर तहसील कर्मचारी वसाहत यांचे कडे ५५ हजार १८२ इतकी आहे.त्या शिवाय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नगर यांचेकडे ०८ हजार ०२८ तर तितकीच पाणीपट्टी रक्कम ०८ हजार ०२८ कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम जिल्हा परिषद यांचे कडे आहे.या शिवाय जलसंपदा उपविभाग कोपरगाव यांचेकडे ५ हजार ११५ इतकी आहे.एकात्मिक बालविकास योजना यांचे कडे ०४ हजार ३९६ आहे.ड्रेनेज उपविभागीय अधिकारी यांचेकडे २ हजार १७८ बाकी आहे.अशी सर्व विभाग मिळून एकूण थकीत पाणीपट्टी हि १६ लाख ५५ हजार ८७८ रूपये इतकी आहे.
दरम्यान थकीत पाणीपट्टी हि ३ कोटी ४८ लाख ८६ हजार आहे.तर चालू बाकी हि २ कोटी ७४ लाख २१ हजार ८६३ असुन दोन्ही मिळून बाकी हि ६ कोटी २३ लाख ०८ हजार ०७४ आहे.
यातील फेब्रुवारी अखेर बाकी वसुली हि ७७ लाख २१ हजार ६६ इतकी झाली असून एकूण दोन्ही मिळून वसूल हा २ कोटी ०९ लाख २७ हजार ०२७ झाला आहे.तो टक्केवारीत ३३.५८ टक्के आहे.मात्र तो निर्धारित लक्षापेक्षा निश्चित कमी मानला जात आहे.
दरम्यान यातील मागील थकीत पाणी पट्टी हि २ कोटी ७० लाख ९७ हजार ९१६ होता त्यातील चालू थकबाकी वसूल हा १ कोटी ४१ लाख २७ हजार ४०१ असून एकूण फेब्रुवारी अखेर थकबाकी वसूल रक्कम हि ४ कोटी १२ लाख २५ हजार ३१८ इतका आहे.
दरम्यान घरगुती पाणी पट्टीची आकडेवारी हाती आली असून यातील थकबाकी हि ०३ कोटी ४८ लाख ८६ हजार २११ इतकी असून चालू बाकी हि ०२ कोटी ७४ लाख २१ हजार ८६३ अशी एकून बाकी हि ६ कोटी २३ लाख ०८ हजार ०७४ इतकी आहे.त्यातील गत फेब्रुवारी अखेर वसूल रक्कम अहवाल हा ७७ लाख २१ हजार ६६६ तर चालू बाकी हि १ कोटी ३२ लाख ०५ हजार ३६० वसुल झाली असून ती एकूण २ कोटी ०९ लाख २७ हजार ०२७ अशी करण्यात आली आहे.टक्केवारीत ती ३३.५८ टक्के इतकी म्हणजे निर्धारित पेक्षा कमी असल्याचा पालिकेचा दावा आहे.मागील थकबाकी हि २ कोटी ७० लाख ९७ हजार ९१६ असून चालू थकबाकी हि १ कोटी ४१ लाख २७ हजार ४०१ वसूल झाली असून एकूण वसुली हि ४ कोटी १२ लाख २५ हजार ३१८ इतकी करण्यात आली आहे.
दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव नगरपरिषदेचे प्रभारी अधिकारी तथा मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सदर वसूल इष्टांक साधला गेला नसून अजून मोठे उद्दिष्ट बाकी असून ते कमाल ९५ टक्क्यावर जाणे अभिप्रेत असल्याची माहिती दिली आहे.