कोपरगाव शहर वृत्त
कोपरगावात चलचित्रण व्यवस्था बसवा-…या नेत्याची मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात गुन्हेगारीची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून त्यावर प्रतिबंधात्मक कारवाई बरोबरच शहरातील विविध मोक्याच्या ठिकाणी चलचित्रण करण्यासाठी सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसवणे गरजेचे असून त्यासाठी संजीवनी सहकारी साखर कारखाण्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी पुढाकार घ्यावा अशी महत्वपूर्ण मागणी पश्चिम महाराष्ट्र बजरंग दल-विश्व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते रविकिरण शंकरराव ढोबळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकांनव्ये केले आहे.
“कोपरगाव शहरात अलीकडील काळात वाहन चोरीसह गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचे दिसून येत आहे.त्यासाठी कोपरगाव शहर पोलिसांची कारवाई थिटी पडत असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे.गत सप्ताहात कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे १३ लाख रुपये किमतीच्या तीन कार रात्रीच्या सुमारास चोरी गेल्या आहेत त्यासाठी पोसिसांच्या मदतीला असे कॅमेरे गरजेचे आहे”-रविकिरण ढोबळे,कार्यकर्ते,पश्चिम महाराष्ट्र बजरंग दल-विश्व हिंदु परिषद.
कोपरगाव शहरात वाहन चोरी,अवैध व्यवसाय करणारे दोन नंबरचे भाई वाढले आहे,त्यांची भाईगिरी जनतेची शांतता धोक्यात आणत आहे.छोट्या चोऱ्यामाऱ्या करणारे भुरटे चोरटे,वाहन चोऱ्या,भरधाव वेगात चालुन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणारे भुरटे आदींचा सुळसुळाट झाला आहे.आपल्या ‘बुलेट’ वाहनास ‘फटाका’ सायलंसर लावून शहराचे ध्वनी प्रदूषण करणारे विदूषक उजळ माध्याने वावरत आहे परिणामी दवाखाने व त्यातील रुग्ण आणि लहान बालके यांचे आरोग्य धोक्यात आले असताना त्यांच्यावर कोणतीही कारवाई करताना पोलीस दिसत नाही.
कोपरगाव शहरात अलीकडील काळात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचे दिसून येत आहे.त्यासाठी कोपरगाव शहर पोलिसांची कारवाई थिटी पडत असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे.काही महिन्यात नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ०६ लाखांच्या गुटख्यासह अनेक गुन्हे उघड करून धमाल उडून दिली होती.त्या नंतर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे वारंवार उघड होत असून कोपरगावात नुकतेच एकाच रात्री तीन कार चोरी गेल्या आहेत.त्यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे.त्यासाठी चलचित्रण होणे गरजेचे आहे.
त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की,”शहरातील अनेक प्रश्नांबरोबर शहरात सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.शहरातील असंख्य शाळकरी मुले-मुली,महिला आदींना घरगुती कामानिमित्त शहरात एकट्याने जावे लागते,याखेरीज पायी फिरणारे जेष्ठ नागरिक व तसेच शहरातील दुर्बल घटक,मध्यमवर्गीय,कष्टकरी नागरिक वांरवार दादागिरीचे बळी ठरत आहे.अवैध व्यवसाय करणारे दोन नंबरचे भाई वाढले आहे,त्यांची भाईगिरी जनतेची शांतता धोक्यात आणत आहे.छोट्या चोऱ्यामाऱ्या करणारे भुरटे चोरटे,वाहन चोर,भरधाव वेगात चालुन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणारे भुरटे आदींचा सुळसुळाट झाला आहे.आपल्या ‘बुलेट’ वाहनास ‘फटाका’ सायलंसर लावून शहराचे ध्वनी प्रदूषण करणारे विदूषक उजळ माध्याने वावरत असून त्यामुळे दवाखाने व त्यातील रुग्ण आणि लहान बालके यांचे आरोग्य धोक्यात आले असताना त्यांच्यावर कोणतीही कारवाई करताना पोलीस दिसत नाही.वाहने चोरणारे तसेच काही असामाजिक तत्व आदींचा सुकाळ झाला आहे त्यासाठी चलचित्रण करणे गरजेचे आहे असेही रविकिरण ढोबळे यांनी विवेक कोल्हे यांना पाठवलेल्या निवेदनात शेवटी म्हटलं आहे.