जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

हक्क गाजविताना नागरिकांनी कर्तव्याची जाणीव ठेवावी-…या महिला नेत्याचे आवाहन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषद सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सेवा मिळण्यासाठी तत्पर असणाऱ्या नागरिकांनी आपले कर वेळेवर भरणे हे आपलं कर्तव्य असल्याचे प्रतिपादन शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख विमल पु़ंडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाअन्वये केले आहे.

“शहरातील नागरिकांकडून वसूल होणाऱ्या या करातूनच नगरपालिका आरोग्य,पाणीपुरवठा,बांधकाम,रस्ते,आदी सुविधा आणि विविध विविध विकास कामे करत असते.तेव्हा नागरिकांनी हे आपलं गाव आहे.ही आपली संस्था आहे.आपल्याला कर भरणे चुकणार नाही.उलट उशीरा दंडासह तो कर भरावा लागतो त्यामुळे वेळेवर कर भरणे आपले कर्तव्य आहे”-विमल पुंडे,अध्यक्षा,महिला आघाडी शिवसेना.

कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने संपणाऱ्या वित्तीय वर्षाच्या पार्श्वभूमीवर आपली पाणी पट्टी,घर पट्टी व गाळे भाडे आदी तत्सम वसुली मोहीम तीव्र केली आहे.त्यासाठी नळजोडण्या,गाळे भाडे थकविणाऱ्या नागरिक आदींच्या मालमत्ता जप्त करण्याची मोहीम सुरु केली असून त्या साठी जनजागृती सुरु केली आहे या पार्श्वभूमीवर विमल पुंडे यांनी कोपरगाव शिवसेनेच्या (बाळासाहेबांची) वतीने पालीकेचा कर भरण्यासाठी समाजात प्रबोधन मोहीम सुरु केली आहे.यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी प्रथम स्वतःच्या नावावर असलेला कर पालिकेत कर भरून,या सामूहिक कर भरण्याचा कार्यक्रमाची सुरुवात केली त्या वेळी नागरिकांना आवाहन करताना त्या बोलत होत्या.

सदर प्रसंगी नगरपालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना करापोटी धनादेश प्रदान करण्यात आला.यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख अक्षय जाधव,माजी शहर प्रमुख दत्ता पुंडे,जिल्हा उपप्रमुख मनील नरोडे,युवा सेना शहर प्रमुख सनी गायकवाड,नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक सुनील आरणे,मार्केट विभागाचे रविंद्र वाल्हेकर आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

त्या वेळी त्यांनी पुढे म्हटले आहे की,”शहरातील नागरिकांकडून वसूल होणाऱ्या या करातूनच नगरपालिका आरोग्य,पाणीपुरवठा,बांधकाम,रस्ते,आदी सुविधा आणि विविध विविध विकास कामे करत असते.तेव्हा नागरिकांनी हे आपलं गाव आहे.ही आपली संस्था आहे.आपल्याला कर भरणे चुकणार नाही.उलट उशीरा दंडासह तो कर भरावा लागतो याची जाणीव करून दिली आहे व त्यासाठी आपण सर्व जण नियमित कर भरु या व नगरपालिकेला सहकार्य करू या असे आवाहन शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख विमल पु़ंडे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close